Jump to content

इरूला भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरूलर
இருளா
स्थानिक वापर भारत
प्रदेश निलगिरी पर्वतरांग
वांशिकता इरुलर
लोकसंख्या ११,८७० []
बोलीभाषा कसबा (उत्तर इरुलर), दक्षिण इरुलर (मलनाड , वट्टे कडा), उरलै इरुलर
भाषाकुळ
द्रविड भाषासमूह
लिपी तमिळ
भाषा संकेत
ISO ६३९-३ iru
भाषिक प्रदेशांचा नकाशा

इरूलर ही भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमधील निलगिरी पर्वतरांगांच्या परिसरात राहणाऱ्या इरुलर लोकांची द्रविड भाषा आहे. [] या भाषेचा तमिळ भाषेशी जवळचा संबंध आहे. ही भाषा, बहुधा, तमिळ लिपीत लिहिली जाते.

उदभव

[संपादन]

१९५५ मध्ये इरुलर भाषा ही एक स्वतंत्र दक्षिण द्रविड भाषा आहे जी तमिळशी, विशेषतः जुन्या तमिळशी संबंधित असून, या भाषेत काही काही कन्नड भाषेसारखी वैशिष्ट्ये असल्याचे सिद्ध करून भारतशास्त्रज्ञ कामिल झ्वेलेबिल यांनी पहिल्यांदा या भाषेचे वर्णन आणि वर्गीकरण केले होते. त्याआधी, पारंपारिकपणे या भाषेचे स्वतंत्र नाकारले जात होते किंवा त्यावर शंका घेतली जात होती आणि इरुलरचे वर्णन तमिळ आणि कन्नड यांचे कच्चे किंवा भ्रष्ट मिश्रण म्हणून केले जात होते.

कामिल झ्वेलेबिल यांच्या एका तात्पुरत्या गृहीतकानुसार, इरुला लोकसंख्यनेने मोठ्या प्रमाणात द्रविड-पूर्व लोकसंख्येने मानववंशशास्त्रीयदृष्ट्या एक प्राचीन पूर्व- किंवा प्रोटो-तमिळ बोली बोलण्यास सुरुवात केली, जी जवळजवळ पूर्णपणे त्यांच्या मूळ द्रविड-पूर्व भाषेवर लादण्यात आली होती. त्यानंतर हाच भाषेचा आधार बनलाआणि नंतर नीलगिरी परिसरातील इतर आदिवासी भाषांशी तसेच कन्नड, तमिळ आणि मल्याळम सारख्या मोठ्या आसपासच्या भाषांशी जावळी असल्यामुळे इरुलर भाषेवर या भाषांचा प्रभाव झाला असावा. [] []

ध्वनीशास्त्र

[संपादन]

या सारण्यांमध्ये इरुलरचे स्वर [] आणि व्यंजन [] [] [] स्वनिम आहेत.

स्वर

[संपादन]
समोर मध्यवर्ती मागे
ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ ऱ्हस्व दीर्घ
उच्च i ɨ ɨː ʉ ʉː u
मध्य e ə əː ɵ ɵː o
कमी a

झ्वेलेबिल आणि पेरियालवार यांनी स्वनव्यवस्थेत केंद्रीकृत <a, ǟ> ला आधी सूचीबद्ध केले होते. <a, ǟ> आणि <a, ā> वेगळे करणारा खरा दर्जा स्पष्ट नाही.

व्यंजने

[संपादन]
ओष्ठ्य दंत दंतप्रवर्धीय मूर्धन्य तालव्य कंठ्य
अनुनासिक m n ɳ
रोधक अघोष p t ʈ t͡ʃ k
सघोष b d ɖ d͡ʒ ɡ
घर्षक s
अंदाजे. central ʋ j
lateral l ɭ
rhotic ɾ, r ɽ
  • या भाषेत /d/ आणि /r/ हे वेगवेगळे स्वनिम कसे आहेत हे अजून स्पष्ट नाही.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Statement 1: Abstract of speakers' strength of languages and mother tongues - 2011". www.censusindia.gov.in. Office of the Registrar General & Census Commissioner, India. 2018-07-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Perialwar (1979).
  3. ^ "Irula communities: Spread over the three southern States with a language marked". indiantribalheritage.org.
  4. ^ "Irula (Kerala Tribal Series - 4)". exoticindiaart.com.
  5. ^ Zvelebil (2001).
  6. ^ Krishnamurti (2003).

पुढील वाचन

[संपादन]
  • The Irula language, Volumes 1-3, 1973

साचा:Dravidian languagesसाचा:Languages of Tamil Naduसाचा:Languages spoken in Kerala