इरिडीअम प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इरिडिअम प्रकल्पातील उपग्रह

‘इरिडीअम सॅटेलाईट’ या कंपनीने अवकाशात पाठविलेले हे ६६ उपग्रह पृथ्वीभोवती उपग्रहांचं एक जाळंच निर्माण करतात. १९९८ पासून कार्यरत असलेली ही उपग्रह प्रणाली जगभर सॅटेलाईट फोन सेवा पुरवते. संपूर्ण पृथ्वीवर कोठेही इरीडीअम फोन सेवा पुरविली जाते. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत असा एकही भाग नाही की जेथे इरीडीअम फोन सेवा मिळत नाही.

प्रकल्प[संपादन]

सहा अब्ज डॉलरच्या या प्रकल्पामध्ये ७७ उपग्रह असतील, अशी सुरवातीची योजना होती. इरीडीअम हे एक मूलद्रव्य आहे. त्याचा अणूक्रमांक ७७ आहे. इरिडीअम अणूच्या केंद्राभोवती ज्याप्रमाणे ७७ इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्याप्रमाणे पृथ्वीभोवती ७७ इरिडीअम उपग्रह फिरतील, अशी कल्पना प्रकल्पाच्या आयोजकांनी केली होती. पुढे प्रकल्पाची किंमत प्रमाणापेक्षा जास्त वाढू लागल्याने उपग्रहांची संख्या ६६ वर मर्यादित ठेवण्यात आली. यातला इरिडिअम ३३ हा उपग्रह अपघातात नष्ट झाल्याने आता इरीडिअम उपग्रहांची संख्या ६५ वर आली आहे.

संदर्भ[संपादन]

http://en.wikipedia.org/wiki/Iridium_satellite_constellation