इरा सरकार
इरा सरकार - (मृत्यू - २५ जुलै २०१५, वय ७८)[१] श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित लहान मुलांसाठीच्या वसतिगृहाच्या प्रमुख म्हणून ओळखल्या जातात. सुमारे ४० वर्षे त्या ही जबाबदारी सांभाळत होत्या. या नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शक, गायिका होत्या.
जीवन
[संपादन]१९४० साली मामा अनिलबरन रॉय यांच्या समवेत इरा या पाँडिचेरी येथे वास्तव्यास आल्या. आश्रमातील अनु पुराणी यांच्याकडून त्या नृत्य तर सहाना देवींकडून गायनाचे शिक्षण घेतले. [२]
नवीन वसतिगृहास श्रीमाताजींनी 'इराज होम' हे नाव दिले आणि इरा यांच्यावर प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली. येथे राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना इरा गायन व नृत्याचे शिक्षण देत असत. त्या कुस्ती-प्रशिक्षकदेखील होत्या. पहिली वीस वर्षे त्या मुले आणि मुली दोघांच्या वसतिगृहाचे काम सांभाळत असत. आणि नंतरची वीस वर्षे त्यांच्यावर प्राथमिक शाळेतील मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.[२] अनेक वर्षे त्या एक ज्येष्ठ आश्रमवासी नोलिनी कांत गुप्ता यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांचे गायन व नृत्याचे कार्यक्रम सादर करत असत. नंतरच्या काळात त्यांनी बंगाली नव-वर्ष निमित्ताने असे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली.
संदर्भ
[संपादन]- ^ "Ira-di by Sunayana Panda – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2015-08-10. 2025-03-25 रोजी पाहिले.
- ^ a b "Ira Sarkar". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-25 रोजी पाहिले.