Jump to content

इप्सिता बिस्वास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ipsita Biswas (es); ইপসিতা বিশ্বাস (bn); Ipsita Biswas (fr); Ipsita Biswas (ast); इप्सिता बिस्वास (mr); Ipsita Biswas (de); Ipsita Biswas (pt); Ipsita Biswas (sq); Ipsita Biswas (pt-br); Ipsita Biswas (id); Ipsita Biswas (nl); ᱤᱯᱥᱤᱛᱟ ᱵᱤᱥᱣᱟᱥ (sat); ਇਪਸਿਤਾ ਬਿਸਵਾਸ (pa); Ipsita Biswas (en); ইপ্সিতা বিশ্বাস (as); ఇప్సితా బిస్వాస్ (te); இப்சிதா பிசுவாசு (ta) Indian terminal ballistics scientist (en); భారతీయ టెర్మినల్ బాలిస్టిక్స్ శాస్త్రవేత్త (te); Indian terminal ballistics scientist (en); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱛᱷᱟᱨᱢᱟᱞ ᱵᱮᱞᱮᱥᱴᱤᱠ ᱥᱟᱬᱮᱥᱤᱭᱟᱹ (sat); Indiaas wetenschapster (nl)
इप्सिता बिस्वास 
Indian terminal ballistics scientist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
नियोक्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

इप्सिता बिस्वास या एक भारतीय टर्मिनल बॅलिस्टिक्स शास्त्रज्ञ आहेत. २०१९ मध्ये त्यांना भारताच्या सशस्त्र दलांमध्ये, निमलष्करी दलांमध्ये आणि महिला सक्षमीकरणात संरक्षण, संशोधन आणि विकासात दिलेल्या योगदानाबद्दल नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भारतातील सर्वोच्च नागरी महिलांसाठीचा पुरस्कार आहे.

जीवन

[संपादन]

बिस्वास यांचा जन्म आणि संगोपन कोलकाता येथे झाले.[] त्यांनी १९८८ मध्ये जाधवपूर विद्यापीठातून उपयोजित गणितात (applied mathematics) पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.[] पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेचच त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) मध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि १९८८ मध्येच त्यांची निवड झाली. १९९८ मध्ये त्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरी (TBRL) मध्ये सामील झाल्या आणि आता त्या प्रयोगशाळेत तीन विभागांचे नेतृत्व करत आहेत.[]

बिस्वास या जीवनरक्षक उपकरणे, संरक्षणात्मक प्रणाली आणि नाजूक गोळ्यांचे मूल्यांकन करणे आदी प्रकारची कामे करण्यात पारंगत आहेत. २०१६ मध्ये, त्यांनी TBRL टीमचे नेतृत्व केले. या टीम ने कमी प्राणघातक प्लास्टिक गोळ्या विकसित केल्या. या गोळ्या भारतीय निमलष्करी दलांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये गर्दी नियंत्रित करण्यासाठी वापरल्या. या प्लास्टिक गोळ्या सुरक्षा दलांच्या सध्याच्या शस्त्रांमध्ये वापरल्या जाऊ शकतात.[]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

मार्च २०१९ मध्ये, त्यांना संरक्षण संशोधन आणि विकासातील महिला सक्षमीकरणात आणि भारताच्या सुरक्षा दलांसाठी बुलेटप्रूफ जॅकेट आणि इतर संरक्षणात्मक प्रणालींवरील त्यांच्या कामासाठी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारताचा सर्वोच्च नागरी महिला पुरस्कार, नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[][][] त्यांना 'अग्नि पुरस्कार फॉर एक्सलन्स इन सेल्फ रिलायन्स' आणि 'हाय एनर्जी मटेरियल सोसायटी ऑफ इंडिया (HEMSI) टीम अवॉर्ड फॉर मेरिटोरियस सर्व्हिस' देखील प्रदान करण्यात आला आहे. या प्लास्टिकच्या गोळ्या AK-47 रायफल्समध्ये देखील वापरल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे या गोळ्यांनी कमी मृत्यू होतात.[]

बिस्वास आणि त्यांच्या टीमने अशा नाजूक गोळ्या विकसित करण्यातही सहभाग घेतला आहे ज्या कठीण पृष्ठभागावर आदळल्यास तुटतात. या ॲप्लिकेशनमुळे स्काय मार्शलना विमानातील अपहरणकर्त्यांना गोळ्या घालण्यासाठी या गोळ्यांचा वापर करण्याची परवानगी मिळाली. याचा आणखी एक फायदा म्हणजे विमानाला मोठे नुकसान होत नाही.[] एर इंडिया १९९९ पासून स्काय मार्शल वापरत आहे.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f Sharma, Aakriti (2019-05-23). "Meet Ipsita Biswas, scientist who developed non-lethal plastic bullets". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-05-09 रोजी पाहिले.
  2. ^ "TBRL scientist awarded for contribution to research". Tribune India (इंग्रजी भाषेत). 9 March 2019. 2020-05-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "TBRL scientist bags award from President | Chandigarh News". The Times of India (इंग्रजी भाषेत). 9 March 2019. 2020-05-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Nari Shakti Puraskar - Gallery". narishaktipuraskar.wcd.gov.in. 2020-04-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Private airlines brace to meet hijack threats". The Times of India. 11 October 2001. 23 May 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 May 2020 रोजी पाहिले.