Jump to content

इति त्यागी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इति त्यागी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावIti संपादन
आडनावTyagi संपादन
जन्म तारीख20. शतक संपादन
व्यवसायdesigner संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

इति त्यागी या एक भारतीय कल्पक (डिझायनर) आणि सामाजिक उद्योजिका आहेत. २०१५ मध्ये, त्यांनी क्राफ्ट व्हिलेजची स्थापना केली ज्याचा उद्देश हस्तकला बनवणाऱ्या कारागिरांना थेट खरेदीदार आणि ग्राहकांशी जोडणे आहे. त्यागी यांना स्त्री सक्षमीकरणाच्या या कार्याबद्दल २०१८ चा नारी शक्ती पुरस्कार मिळाला.

प्रारंभिक आयुष्य

[संपादन]

त्यागी यांनी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था येथून फॅशन डिझाईन आणि क्लोदिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला.[१] त्यानंतर त्यांनी लंडनमधील केएलसी स्कूल ऑफ डिझाइन येथून गृहशोभन अर्थात इंटिरियर डिझाइनचा अभ्यास केला.[२]

कारकिर्द

[संपादन]

त्यागी या धातूकाम, लाकूडकाम, काचचे ओतीव काम आणि भरतकाम या क्षेत्रात पारंगत असून त्यांना शाश्वत विकासातही रस आहे.[३] २०१७ आणि २०१८ मध्ये, तिचे काम सिमेंटच्या वापराभोवती केंद्रित असलेल्या टू क्राफ्ट बेटन लक्झरी कलेक्शनमध्ये प्रदर्शित झाले.[४][५] यामुळे २०२० मध्ये क्राफ्ट बेटनच्या दिल्ली गॅलरीसाठी वस्तू बनवणाऱ्या उत्पादकांशी भागीदारी झाली.[६] २०१९ मध्ये, तिने लुई क्विंझ शैलीमध्ये सिमेंटपासून बनवलेले टेबल प्रदर्शित केले.[२] तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटसोबत देखील काम केले आहे.[१]

२०१५ मध्ये त्यागी यांनी पती सोमेश सिंग यांच्यासोबत क्राफ्ट व्हिलेज हा सामाजिक उपक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश हस्तकला बनवणारे कारागीर आणि ग्राहक यांच्यात थेट संपर्क जोडून,[७][८] ग्रामीण कारागिरांना शहरी ग्राहकांशी जोडून मदत करणे हा होता.[९] तित्यांनींडिया क्राफ्ट वीक, इंटरनॅशनल क्राफ्ट डे आणि इंटरनॅशनल क्राफ्ट अवॉर्ड्सची स्थापना देखील केली.[८] २०२४ पर्यंत भारतीय हस्तकला उद्योग $६० अब्ज डॉलर्सचा होण्याची अपेक्षा आहे आणि २०१८-२०१९ आर्थिक वर्षात क्राफ्ट व्हिलेजचे उत्पन्न ₹२.६७ कोटी होते.[८] क्राफ्ट व्हिलेजच्या माध्यमातून, त्यागी यांनी बालकट्टी, फिरोजाबाद, कच्छ, मुरादाबाद आणि सहारनपूर येथील हस्तकला कामगारांना प्रशिक्षण दिले.[१०]

कोविड-१९ महामारीच्या दरम्यान, त्यागी यांनी आरोग्य व्यावसायिकांसाठी सिमेंट फॅब्रिक वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) सूट डिझाइन केले जे ५०% नैसर्गिक आणि ५०% कृत्रिम पदार्थांपासून बनवले जातात. सामान्य सूट १००% कृत्रिम असल्याने, विल्हेवाट लावल्यास या सूटचा पर्यावरणावर कमी परिणाम होतो.[११] इंडिया क्राफ्ट वीकची तिसरी आवृत्ती २०२० साठी ऑनलाइन झाली.[१२]

२०२१ मध्ये, इंडियन क्राफ्ट वीक पुन्हा एकदा ब्रिटिश कौन्सिल बिल्डिंग आणि नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस येथे प्रत्यक्ष कार्यक्रमात सादर झाला. ब्रिटिश कौन्सिलच्या भागीदारी द्वारे हे आयोजन करण्यात आले होते.[१३]

प्राणी हक्क

[संपादन]

त्यागी यांनी पाळीव प्राणी पालक संघटना या गटाची स्थापना केली जी पाळीव प्राणी आणि त्यांच्या मालकांच्या हक्कांना प्रोत्साहन देते. गुरुग्राम आणि नवी दिल्ली येथे राहणाऱ्या कुत्र्यांच्या मालकीणी म्हणून त्यांच्या अनुभवांनी त्यांना प्रेरणा मिळाली.[१४] हा गट भटक्या कुत्र्यांची काळजी घेतो, प्राण्यांच्या कल्याणाला प्रोत्साहन देतो आणि निवासी कल्याण संघटनांशी मतभेद असताना मालकांचे प्रतिनिधित्व करतो.[१४] [१५]

पुरस्कार आणि मान्यता

[संपादन]
इति त्यागी नारी शक्ती पुरस्कार स्वीकारताना

महिला सक्षमीकरणाच्या त्यांच्या कार्याची दखल घेत, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यागी यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला.[१०] यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, "मी प्रत्येक महिलेला त्यांच्या कवचातून बाहेर पडण्याचे आणि स्टिरियोटाइप तोडण्याचे आवाहन करते".[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 Staff writer (23 October 2019). "Craft Cues". Sakal Times. 20 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  2. 1 2 Bose, Indrani (17 February 2019). "Storytelling with cement: Designers are increasingly experimenting with cement". The Financial Express. 17 February 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  3. ↑ "Concrete love". The Asian Age. 26 November 2017. 18 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  4. ↑ Shah, Devanshi (12 May 2017). "Let's talk about Bauhaus: new interpretations of cement". Architectural Digest India. 30 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  5. ↑ Kale, Ridhi (12 January 2018). "Set in stone". India Today (इंग्रजी भाषेत). 18 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  6. ↑ Narayanan, Chitra (21 February 2020). "Who says cement is grey and stodgy?". The Hindu (इंग्रजी भाषेत). 27 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  7. ↑ Shankar, Avantikar (18 December 2019). "Delhi: Here's a recap of India Craft Week that celebrated traditional craft practitioners from across the country". Architectural Digest India. 24 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  8. 1 2 3 BW Online Bureau (14 March 2020). "Making Of A Craft Ecosystem". BW Businessworld (इंग्रजी भाषेत). 14 March 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  9. ↑ Staff writer (3 December 2018). "Craft Village has been established to bridge the gap between rural and urban communities: Iti Tyagi". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 10 December 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  10. 1 2 3 Staff writer (11 March 2019). "Iti Tyagi honoured with Nari Shakti Puraskar". The Statesman. 18 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  11. ↑ Kashyaap, Sindhu (19 July 2020). "How Delhi's Craft Village is ensuring COVID warriors have 'concrete' PPE amidst the pandemic". Yahoo News (इंग्रजी भाषेत). 19 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  12. ↑ "Delhi's India crafts week goes digital amid coronavirus". The New Indian Express. Express News Service. 15 June 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  13. ↑ "RARE India partners with the India Craft Week 2021". Hotelier India. 16 Feb 2021.
  14. 1 2 Saksena, Shalini (17 March 2019). "Women of substance". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2024-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.
  15. ↑ Tuli, Aanchal (29 May 2014). "A daily battle faced by pet owners in Gurgaon – Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 18 April 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 December 2020 रोजी पाहिले.