Jump to content

इझ्झी शार्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इसोबेल ग्रेस शार्प (जन्म १ डिसेंबर २००४) ही न्यू झीलंडची क्रिकेटपटू आहे. ती सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यू झीलंड महिला क्रिकेट संघासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये कँटरबरी संघासाठी खेळते. ती उजव्या हाताने फलंदाजी करते. त्याशिवाय ती यष्टिरक्षक आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये, श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी तिची न्यू झीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात पहिल्यांदाच निवड झाली.त्यानंतर, लॉरेन डाउनच्या जागी त्याच मालिकेसाठीच्या एकदिवसीय संघातही तिचा समावेश करण्यात आला. तिने १४ मार्च २०२५ रोजी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

संदर्भयादी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]