इंद्रजित सिंग बिंद्रा
Indian cricketer | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | इ.स. १९४१, इ.स. १९४२ | ||
|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | जानेवारी २५, इ.स. २०२६ | ||
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| |||
इंद्रजित सिंग बिंद्रा, (१९४१/१९४२ - २५ जानेवारी, २०२६), उर्फ आयएस बिंद्रा हे एक क्रिकेट प्रशासक होते जे १९९३ ते १९९६ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष होते.
जीवन आणि कारकिर्द
[संपादन]एकेकाळी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी असलेले बिंद्रा १९७५ पासून क्रिकेट प्रशासनावर चार दशकांहून अधिक काळ कार्यरत होते.
बिंद्रा हे जवळजवळ तीन दशके पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) चे अध्यक्ष होते. १९८० च्या दशकात ते भारताचे राष्ट्रपती झैल सिंग यांचे विशेष सचिव म्हणून कार्यरत होते.
१९८७ मध्ये रिलायन्स विश्वचषक आयोजित करण्यात आणि भारतीय क्रिकेट टेलिव्हिजन बाजारपेठ खुली करण्यात बिंद्रा यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आर्थिक ताकद वाढल्याने जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे स्थान प्रचंड वाढले.
बिंद्रा यांनी १९७८ ते २०१४ पर्यंत पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए) चे चेअरमन म्हणून काम पाहिले. त्या नंतर २०१५ मध्ये, त्यांची पीसीए चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.[१]
१९९३ मध्ये बिंद्रा यांची बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि १९९६ पर्यंत ते या पदावर होते. १९८७ आणि १९९६ मध्ये भारतीय उपखंडात क्रिकेट विश्वचषक आयोजनाचे अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी बिंद्रा, एन.के.पी. साळवे आणि जगमोहन दालमिया यांच्यावर होती.[२][३] शरद पवार जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष होते तेव्हा बिंद्रा यांनी त्यांचे प्रमुख सल्लागार म्हणूनही काम केले.[४]
ललित मोदी वर जेव्हा मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते तेव्हा बिंद्रा यांनी त्यांची बाजू घेतली. यावरून तसेच क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या सीईओ पदासाठी हारून लोर्गट यांना मान्यता दिल्याबद्दल बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी बिंद्रावर टीका केली होती.[५] २०१४ मध्ये ते क्रिकेट प्रशासनातून निवृत्त झाले.[६]
२०१५ मध्ये, साहिबजादा अजित सिंह नगर/मोहालीतील पीसीए स्टेडियमचे नाव बिंद्रा यांच्या नावावरून इंद्रजित सिंह बिंद्रा स्टेडियम (पंजाब क्रिकेट असोसिएशन आय.एस. बिंद्रा मैदान) असे ठेवण्यात आले.[७] ते इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या निर्मितीमध्ये सल्लागार होते आणि नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) प्रमुख सल्लागार होते.
२५ जानेवारी २०२६ रोजी बिंद्रा यांचे दिल्लीतील राहत्या घरी आजारपणामुळे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८४ वर्षे होते.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Inderjit Singh Bindra unanimously elected as Punjab Cricket Association chairman". Zee News. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Inderjit Singh Bindra unanimously elected as Punjab Cricket Association chairman". Zee News. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ Mathur, Amrit (24 January 2015). "Working the World Cups". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-03-23 रोजी पाहिले.
- ^ "IS Bindra calls time, steps aside from cricket administration". The Indian Express. 24 August 2014. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Inderjit Singh Bindra unanimously elected as Punjab Cricket Association chairman". Zee News. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Inderjit Singh Bindra unanimously elected as Punjab Cricket Association chairman". Zee News. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ "Inderjit Singh Bindra unanimously elected as Punjab Cricket Association chairman". Zee News. 27 September 2015 रोजी पाहिले.
- ^ Kanthwal, Gaurav (25 January 2026). "Former BCCI president IS Bindra dies at 84". The Tribune. 25 January 2026 रोजी पाहिले.