इंदर मलहोत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदर मलहोत्रा (इ.स. १९३०:चंदीगड, पंजाब, ब्रिटिश भारत - ११ जून, इ.स. २०१६:दिल्ली, भारत) हे एक इंग्लिश पत्रकार होते. त्यांना नेहरू फेलो व व्रुडो विल्सन फेलो या विद्यावृत्ती मिळाल्या होत्या.

मलहोत्रांच्या ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला यूपीआयचे वार्ताहर म्हणून काम केले. द स्टेट्समन, टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांत त्यांनी बराच काळ पत्रकारिता केली. द गार्डियनचे भारतातील प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले. तटस्थ निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी बातमीचा स्रोत कधीही उघड केला नाही. त्यांना आपल्या आयुष्यातील घटनांच्या नोंदी ठेवण्याची सवय होती.

इंदर मलहोत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये रियर व्ह्यू हा स्तंभ बराच काळ लिहिला. त्यात त्यांनी समकालीन भारताच्या इतिहासातील अनेक घटनांबद्दल लेखन केले. आणीबाणी, बांगला देश युद्ध अशा अनेक विषयांवर त्यांनी मते मांडली. नेहरूवादी असूनही त्यांनी चीन युद्धाच्या वेळी त्यांच्या धोरणावर परखड टीका केली होती.

पुस्तके[संपादन]

  • इंदिरा गांधी : अ पर्सनल ॲन्ड पॉलिटिकल बायॉग्राफी
  • डायनॅस्टीज ऑफ इंडिया ॲन्ड बियाँड (२००३)

पुरस्कार[संपादन]

  • रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्कार (२०१३)