इंगा रुगिनीने
| लिंग | महिला |
|---|---|
| नागरिकत्व | लिथुएनिया |
| स्थानिक भाषेतील नाव | Inga Ruginienė |
| जन्म-नाव | Inga Raitelaitytė |
| दिलेले नाव | Inga |
| आडनाव | Ruginienė |
| जन्म तारीख | २४ मे 1981 |
| जन्मस्थान | Trakai |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | लिथुएनियन भाषा |
| व्यवसाय | राजकारणी, trade unionist |
| पद | Member of the Seimas, Litvánia miniszterelnökeinek listája, Minister of Social Security and Labour |
| शिक्षण घेतलेली संस्था | व्हिल्नियस विद्यापीठ, Mykolas Romeris University |
| राजकीय पक्षाचा सभासद | Social Democratic Party of Lithuania |
इंगा रुगिनीने (पूर्वीची इंगा राइतेलाइतिते; २४ मे, १९८१:त्राकाइ, लिथुएनिया, सोव्हिएत संघ - ) या लिथुएनियाच्या कामगार संघटक आणि राजकारणी आहेत. या २५ सप्टेंबर २०२५ पासून लिथुएनियाच्या १९व्या पंतप्रधान आहे. रुगिनीने पंतप्रधान होण्यापूर्वी सामाजिक सुरक्षा आणि कामगार मंत्री होत्या.
रुगिनीनेचा जन्म सोव्हिएत संघाच्या आधिपत्यातील लिथुएनियामधील त्राकाई येथे झाला. [१] [२] त्यांचे लहानपण ग्रिगिशकेसमध्ये गेले आणि त्या उन्हाळांत पूर्व युक्रेनमधील क्रामाटोर्स्कमध्ये जात असत.. [३] [४]
२००५ मध्ये रुगिनीने यांनी व्हिल्नियस विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. [१] [२] त्यांनी २००५ ते २००८ पर्यंत राज्य पर्यावरण आरोग्य केंद्रात सार्वजनिक आरोग्य तज्ञ म्हणून काम केले [१] [२] रुगिनीने यांनी २००८ ते २०१० पर्यंत एस स्टॅटा कंपनीसाठी व्हिल्नियस प्रदेश संचालक म्हणून काम केले. [१] [२]
इंगा रुगिनीने यांचे लग्न व्हिस्मांतास रुगिनीस यांच्याशी झाले आहे. हे अनेक छपाई पुरवठा कंपन्यांचे संचालक आहेत. [५] [६] रुगिनीनेची आई डायना राइतेलाइतीने या लिथुएनियन फेडरेशन ऑफ फॉरेस्ट अँड वुड वर्कर्स ट्रेड युनियन्सच्या अध्यक्षा आहेत. [६] रुगिनीनेचे काही दूरचे नातेवाईक मॉस्कोमध्ये राहतात परंतु त्यांचा त्यांच्याशी फारसा संपर्क नाही. [४] रुगुनीने अस्खलित लिथुएनियन, इंग्लिश आणि रशियन भाषा बोलतात. [१] [२]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 4 5 "2024 parliamentary elections. Candidate biography: Inga RUGINIENĖ" (लिथुआनियन भाषेत). Central Electoral Commission. 2024.
- 1 2 3 4 5 "Inga Ruginienė". Seimas (लिथुआनियन भाषेत). 7 August 2025 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "lrs" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ Liubertaitė, Agnė (9 August 2025). "Lrytas apsilankė Grigiškėse, kur augo ir gyvena I. Ruginienė: ką apie ją sako gyventojai?". Lrytas.lt (लिथुआनियन भाषेत).
- 1 2 Jakučionis, Saulius (7 August 2025). "Lithuanian PM candidate Ruginienė addresses past trips to Russia, family ties to Ukraine". LRT.lt (इंग्रजी भाषेत). चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "jakucionis" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ "New Social Democrat candidate for prime minister: who is Inga Ruginienė?". LRT.lt (इंग्रजी भाषेत). 7 August 2025.
- 1 2 "2024 parliamentary elections. Candidate's declared private interests: Inga RUGINIENĖ" (लिथुआनियन भाषेत). Central Electoral Commission. 2024.