आवारा पागल दिवाना
| गट-प्रकार | action comedy film, विनोदपट |
|---|---|
| प्रकाशन तारीख | 2002 |
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | विक्रम भट्ट |
| पटकथा | Neeraj Vora |
| चित्रीकरण दिग्दर्शक | Pravin Bhatt |
| संगीतकार | अन् नू मलिक |
| निर्माता | Firoz A. Nadiadwala |
| Narrative location | अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत |
आवारा पागल दीवाना हा २००२ मध्ये प्रदर्शित झालेला विक्रम भट्ट दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन हास्य चित्रपट आहे. समीरच्या गीतांसह अनू मलिक यांनी या चित्रपटाचे संगीत दिले आहे. हा चित्रपट २००० च्या अमेरिकन चित्रपट द होल नाइन यार्ड्स वर आधारित आहे.[१] द मॅट्रिक्स आणि हाँगकाँग अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणारे डिओन लाम हे ह्या चित्रपटाचे स्टंट दिग्दर्शक होते.[२] या चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, परेश रावल, जॉनी लिव्हर, प्रीती झंगियानी, आरती छाब्रिया, अमृता अरोरा आणि राहुल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
आवारा पागल दिवाना हा चित्रपट २० जून २००२ रोजी जगभरातील प्रेक्षकांसाठी प्रदर्शित झाला. समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. हा चित्रपट भव्य आणि आकर्षक गाण्यांच्या दृश्यांसाठी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या अॅक्शन दृश्यांसाठी आणि परेश रावळ आणि जॉनी लीवर यांच्या विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध झाला.[३][४]
पुरस्कार
[संपादन]| २००३ | परेश रावळ | फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार[५] | विजयी |
| झी सिने पुरस्कार - सर्वोत्तम विनोदी भूमिका | विजयी | ||
| २००४ | स्क्रीन पुरस्कार - सर्वोत्तम विनोदी भूमिका | विजयी | |
| जॉनी लीवर | नामांकन |
|}
संदर्भ
[संपादन]- ↑ Jha, Shubhash K. (19 May 2003). "Whose movie is it anyway?". Rediff.com. 20 April 2020 रोजी पाहिले.
- ↑ Renuka, Methil (16 July 2001). "Hong Kong-based stunt director Dion Lam to choreograph 'Aawara Paagal Deewana'". India Today. 11 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 April 2020 रोजी पाहिले.
- ↑ "15 weirdest character names in Bollywood films". filmfare.com (इंग्रजी भाषेत). 19 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-08-19 रोजी पाहिले.
- ↑ "Khakee (2004) - Akshay Kumar's successful action films | The Times of India". The Times of India. 27 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-06-04 रोजी पाहिले.
- ↑ "48th Manikchand Filmfare Awards 2002 - Winners". The Times of India. 21 February 2003. 13 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 November 2022 रोजी पाहिले.