आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आल्बर्ट दुसरा किंवा दिलदार आल्बर्ट (१० ऑगस्ट, इ.स. १३९७ - २७ ऑक्टोबर, इ.स. १४३९) हा हंगेरी आणि क्रोएशियाचा राजा होता. हा इ.स. १४३७पासून मृत्यूपर्यंत या स्थानी होता. याशिवाय याने बोहेमियाचा राजा, जर्मनीचा राजा, लक्झेंबर्गचा ड्यूक आणि ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक या राजगाद्याही सांभाळल्या.