आलेखशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ऐतिहासिक साधने म्हणून शिलालेख, द्वारलेख, ताम्रलेख, कोरीव लेख, यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आलेखशास्त्र (Graphology) असे म्हणतात. आलेखशास्त्रात ऐतिहासिक माहिती मिळविता येते.[१]

आलेखशास्त्र या शास्त्रामध्ये व्यक्तीच्या हस्ताक्षरावरून तिचा स्वभावधर्म समजू शकतो. एखाद्या व्यक्तीच्या अनेक पत्रांचा संग्रह तपासला असता त्या व्यक्तीचा स्वभाव निश्चित समजू शकतो. उदा. एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर शब्दाच्या शेवटी जर वर वर जाणारे असेल तर ती व्यक्ती महत्त्वाकांक्षी असते असा निष्कर्ष निघतो. अर्थात् निष्कर्ष ढोबळ मानाने काढलेले असतात. म्हणून वापरलेला कागद, त्या व्यक्तीचे वय, त्याचे लिंग व मनोवृत्ती यांचा अभ्यास केला पाहिजे. काही वेळा हेतुपूर्वक दिशाभूल करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारची अक्षरे काढली जातात. बऱ्याच वेळां अतिशय कामात व्यग्र असणाऱ्या माणसाचे हस्ताक्षर अतिशय खराब असते. उदा. पत्रकार व डॉक्टर. एकंदरीत या शास्त्राच्या अभ्यासावरून एवढे निश्चित समजू शकेल की तो मनुष्य सावधान चित्ताने लिहीत होता की घाईने लिहीत होता.[२]

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाराष्ट्र शासन (२०१३). "प्रथम : २१वे शतक आणि उपयोजित इतिहासाचे महत्त्व". उपयोजित इतिहास (इयत्ता १२वी). पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. pp. २.
  2. ^ "संशोधन पद्धती आणि इतिहासाची साधने" (PDF). mu.ac.in (Marathi भाषेत). 10 November 2022. p. 42. Archived from the original (PDF) on 10 November 2022. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)