आर.टी. देशमुख
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
मृत्यू तारीख | मे २६, इ.स. २०२५ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद | |||
| |||
![]() |
आर.टी. देशमुख उर्फ जिजा (?? - २६ मे, २०२५) [१] हे भारतीय जनता पक्षातील मराठी राजकारणी होते. ते १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.[२]
देशमुख यांच्या गाडीला २६ मे २०२५ रोजी राष्ट्रीय महामार्ग ३६१ वरून प्रवास करत असताना दुपारी लातूर-तुळजापूर-सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड धाराशिव येथे अपघात झाला. दवाखान्यात दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला. देशमुख हे भाजप चे गोपीनाथ मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी मानले जात होते. वैद्यनाथ कारखान्यावर सुरुवातीपासून ते संचालक पदावर होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Former BJP minister RT Deshmukh dies in road accident in Maharashtra's Latur". Hindustan Times. 26 May 2025 रोजी पाहिले.
- ^ "Majalgaon Election Result 2019: Majalgaon Assembly Election 2019 Results | Majalgaon Vidhan Sabha MLA Result". www.business-standard.com.
- ^ "स्लिप होऊन पलटी, कारचा चेंदामेंदा; भीषण अपघातात मुंडेंचे निष्ठावंत माजी आमदार आर.टी देशमुख कालवश". एबीपी माझा. २७ मे २०२५ रोजी पाहिले.