आर्मिडा फर्नांडिस
आर्मिडा फर्नांडिस या वैद्यकशास्त्र विभागात पद्मश्री पुरस्कार प्राप्त एक महिला डॉक्टर आहेत.
जीवन व कारकीर्द
[संपादन]आर्मिडा यांचा जन्म हुबळी धारवाड मध्ये झाला आणि त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हुबळी धारवाड मध्ये झाले. त्यांचे वडील कर्नाटक महाविद्यालयात प्राचार्य होते. त्यांचे वैद्यकीय शिक्षण हुबळी येथील केएमसी मेडिकल कॉलेज मध्ये झाले.इसवी सन १९६७ मध्ये त्यांनी बालरोग शाखेत एम डी. करण्यासाठी मुंबई येथील केईएम रुग्णालयात प्रवेश घेतला. पुढे त्या मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात लेक्चरर म्हणून रुजू झाल्या.इसवी सन २००१ मध्ये प्राध्यापक आणि रुग्णालयातील त्यांच्या शेवटच्या वैद्यकीय सेवा समाप्तीच्या तीन वर्षे त्या रुग्णालयाच्या अधिष्ठाता म्हणून कार्यरत होत्या. इसवी सन १९८७ मध्ये त्यांना फेलोशिपसाठी ब्रिटन येथे जाण्यास मिळाले.तिथे त्यांनी एका रुग्णालयात अद्ययावत दुग्धबँक पाहिली आणि तशीच दुग्धबँक आपल्या भारतातील रुग्णालयात असावी असे त्यांना वाटले. त्यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालयात डॉ. नाडकर्णी ह्या अधिष्ठाता होत्या. त्यांनी या कल्पनेला पाठिंबा दिला. त्याचवेळी ताज गृप ऑफ हॉटेल च्या सहकार्याने लोकमान्य टिळक रुग्णालयात देशातील पहिली दुग्धबँक चालू केली. नंतर त्यांनी स्नेहा ही संस्था चालू केली. केईएम रुग्णालयात वन स्टॉप सेंटर सुरू झाले. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि कूपर रुग्णालयात पँलेटिव्ह केअर ओपीडी चालू केली.त्यांची मुलगी कर्करोगाने गेली. त्या वेदनेतून त्यांनी रोमिला पँलेटिव्ह केअर संस्था चालू केली. आजही ८२ वर्षांच्या आर्मिडा फर्नांडिस लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत.
पुरस्कार
[संपादन]त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने इ.स.२०२६ साली पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरव केला आहे. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, रविवार,१ फेब्रुवारी २०२६