आर्थर मॅलेट
ऑर्थर हे ब्रिटिश असामी बॉम्बे सिव्हिल सर्विस मध्ये काम करीत होते.
| सर ऑर्थर मँलेट | |
|---|---|
| जन्म |
ऑर्थर इसवी सन १८०८ |
| मृत्यू |
इसवी सन १८८८ |
| राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
| नागरिकत्व | इंग्लंड |
| पेशा | सिव्हील सर्विस |
| कारकिर्दीचा काळ | इसवी सन १८२६ ते १८६०. |
| पदवी हुद्दा | सर |
| वडील | सर चार्ल्स मँलेट |
बालपण
[संपादन]ऑर्थर यांचा जन्म इसवी सन १८०८ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर चार्ल्स मँलेट असे होते. वडील पेशवे दरबारात काम करीत होते. ऑर्थर हा चार्ल्स यांचा पाचवा मुलगा होता. त्यांचा धाकटा भाऊ ह्युग मँलेट याने इसवी सन १८५० मध्ये नेरळ जवळील माथेरान हे थंड हवेचे ठिकाण शोधले.
कारकीर्द
[संपादन]इसवी सन १८२६ ते १८६० पर्यंत ऑर्थर हे बॉम्बे सिव्हील सर्विस मध्ये काम करीत होते. इसवी सन १८५५ ते १८६० पर्यंत ते काऊन्सिलचे सदस्य होते.त्यांना मुंबईत कोरड्या गोदी आणि ओल्या गोदी असाव्यात असे वाटे.भाऊच्या धक्क्याजवळच मँलेट बंदर आहे.
ऑर्थर सीट
[संपादन]महाबळेश्वर येथील ऑर्थर सीट पॉइंट हा ऑर्थर यांच्या नावावरून पडले आहे.असे म्हणतात की सर ऑर्थर यांची पत्नी व एक महिन्याची मुलगी यांना बाणकोट ला घेऊन जाणारी बोट सावित्री नदीत बुडाली.[[बाणकोट किल्ला|बाणकोट किल्ल्याजवळ त्या दोघींचे स्मारक पाहायला मिळते.त्या दोघींच्या निधनाची बातमी सर ऑर्थर यांना ते महाबळेश्वर येथे होते तेव्हा मिळाली.सर ऑर्थर महाबळेश्वर येथे एका विशिष्ट जागी येऊन बसत असत.तिथे ते त्या दोघी परत येतील अशा आशेने बसत आणि त्यामुळे त्या जागेला ऑर्थर सीट हे नाव पडले.
रस्ता
[संपादन]मुंबई येथे मँलेट बंदर ते भाऊचा धक्का ला जाणाऱ्या रस्त्याला मँलेट रोड हे नाव दिलेले आहे.[१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ↑ महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, मंगळवार,२४ डिसेंबर २०२४