Jump to content

आर्थर कोसलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्थर कोसलर (इ.स. १९०५इ.स. १९८३) एक हंगेरियन मुळाचे ब्रिटिश लेखक होते. विज्ञान व राजकारणावरील लेखनाकरीता ते नावाजलेले आहेत. १९३१ ते १९३८ च्या दरम्यान कोसलर जर्मन कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. १९३८ मध्ये जर्मन कम्युनिस्ट पक्षाने जर्मन समाजवादी पक्षाला निवडणुकीत हरविण्याच्या हेतुने राष्ट्रवादी सामाजवाद्यांवरोबर -- म्हणजेच नात्झी पक्षाबरोबर -- केलेल्या युतीच्या विरोधात जाऊन कोसलर यांनी कम्युनिस्ट पक्ष सोडला व पुढे दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. डार्कनेस ॲट नून ही स्टालिनवादाच्या विरोधात लिहीलेली त्यांची कादंबरी व द स्लीपवॉकर्स हा युरोपियन खगोलशास्त्राचा इतिहास ही कोसलरची दोन पुस्तक विशेषकरून उल्लेखनीय आहेत.