आर्जेन्टिना राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्जेन्टिना फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
आर्जेन्टिनाचा ध्वज
टोपणनाव आल्बिसेलेस्तेस (पांढरे-निळे)
राष्ट्रीय संघटना Asociación del Fútbol Argentino (आर्जेन्टिना फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
कर्णधार लायोनेल मेसी
सर्वाधिक सामने जाबिये जानेती (१४५)
सर्वाधिक गोल गॅब्रियेल बातिस्तुता (५६)
प्रमुख स्टेडियम Estadio Monumental Antonio Vespucio Liberti, बुएनोस आइरेस
फिफा संकेत ARG
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(मार्च २००७)
फिफा क्रमवारी नीचांक २४ (ऑगस्ट १९९६)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(१९२६-१९६६ दरम्यान अनेकदा,
१९८६-७, १९९२-३, २००२, २००४-५, २००७)
एलो क्रमवारी नीचांक २८ (जून १९९०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे २ - ३ आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
(मॉंटेव्हिडियो, उरुग्वे; मे १६ १९०१)
सर्वात मोठा विजय
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना १२ - ० इक्वेडोर Flag of इक्वेडोर
(मॉंटेव्हिडियो, उरुग्वे; जानेवारी २२ १९४२)
सर्वात मोठी हार
चेकोस्लोव्हाकियाचा ध्वज चेकोस्लोव्हाकिया ६ - १ आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
(हेलसिंगबॉर्ग, स्वीडन; जून १५ १९५८)
उरुग्वेचा ध्वज उरुग्वे ५ - ० आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
(ग्वायाक्विल, इक्वेडोर; डिसेंबर १६ १९५९)
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना ० - ५ कोलंबियाचा ध्वज कोलंबिया
(बॉयनोस एर्स, आर्जेन्टिना; सप्टेंबर ५ १९९३)
फिफा विश्वचषक
पात्रता १४ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९७८ आणि १९८६
कोपा अमेरिका
पात्रता ३७ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९२१, १९२५, १९२७, १९२९,
१९३७, १९४१, १९४५, १९४६, १९४७,
१९५५, १९५७, १९५९, १९९१, १९९३
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता ३ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९९२
आर्जेन्टिना फुटबॉल संघ 1964
आर्जेन्टिना फुटबॉल संघ 2018
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
रौप्य १९२८ ॲम्स्टरडॅम संघ
रौप्य १९९६ अटलांटा संघ
सुवर्ण २००४ अथेन्स संघ
सुवर्ण २००८ बीजिंग संघ

आर्जेन्टिना राष्ट्रीय फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Argentina) हा आर्जेन्टिना देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आर्जेन्टिनाने आजवर चार वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. ह्यांपैकी १९७८ आणि १९८६ साली आर्जेन्टिनाने अजिंक्यपद मिळवले. १९८६ च्या स्पर्धेमध्ये आर्जेन्टिनाचे नेतृत्व दिएगो मारादोनाने केले होते. कोपा आमेरिका ह्या दक्षिण अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये आर्जेन्टिनाला प्रचंड यश मिळाले असून ही स्पर्धा त्यांनी १४ वेळा जिंकली आहे. आर्जेन्टिना जगामधील सर्वात बलाढ्य व लोकप्रिय संघांपैकी एक मानला जातो.