आर्खिप कुइंद्झी
Russian landscape painter (1842-1910) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | जानेवारी २७, इ.स. १८४१ Mariupol uyezd | ||||
| मृत्यू तारीख | जुलै २४, इ.स. १९१० सेंट पीटर्सबर्ग | ||||
| चिरविश्रांतीस्थान |
| ||||
| नागरिकत्व | |||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय |
| ||||
| नियोक्ता |
| ||||
| कार्यक्षेत्र | |||||
| चळवळ |
| ||||
| कर्मस्थळ | |||||
| |||||
आर्खिप इव्हानोविच कुइंद्झी (२७ जानेवारी, (जुन्या पद्धतीने १५ जानेवारी) १८४१ - २४ जुलै (जुन्या पद्धतीने ११ जुलै), १९१०) हे उरुम (क्रिमियन ग्रीक) वंशाचे एक रशियन [a] निसर्गचित्रकार होते.[३]
जन्मतारीख
[संपादन]कुइंद्झीची नेमकी जन्मतारीख ज्ञात नाही. साधारणतः त्यांचा जन्म १८४२ मध्ये झाल्याचा समज आहे. नवीन संशोधनानुसा त्यांचा जन्म १८४१ मध्ये झाला असण्याची शक्यता आहे. कुइंद्झीने सेंट पीटर्सबर्ग कला अकादमीला आपली जन्मतारीख कळवताना ती १८४१ असल्याचे स्पष्टपणे १८४१ लिहिले, परंतु नंतर त्यात अनेक खाडाखोडा केल्या.[४]
संशोधकांच्या मते त्याचा जन्म जानेवारी ते मार्च १८४१ च्या दरम्यान झाला असावा. सर्वसाधारणपणे २७ जानेवारी ही तारीख मानली जाते. कुइंद्झी आपला नामदिन १९ फेब्रुवारी रोजी साजरा करत असे. हा दिवस बिशप अर्किप्पसचा सण म्हणून साजरा केला जातो.[४]
चरित्र
[संपादन]
आर्खिप कुइंद्झी यांचा जन्म मारियुपोल उएझ्ड (रशियन साम्राज्याच्या येकातेरिनोस्लाव्ह गव्हर्नरेटच्या उपविभागांपैकी एक) येथे झाला, परंतु त्यांनी आपले बालपण तागानरोग शहरात घालवले. त्यांचे ख्रिश्चन नाव हे ग्रीक शब्द "आर्किपोस" म्हणजे " घोडा " यांपासून बनलेला आहे जो "घोड्यांचा स्वामी" असे आहे. हे रशियन रूपांतर आहे आणि त्यांचे आडनाव त्यांच्या आजोबांच्या व्यावसायिक टोपणनावावरून आले आहे, ज्याचा क्रिमियन तातार ( उरुम) भाषेत "सोनार" असा अर्थ होतो. तो एका गरीब कुटुंबात वाढला; त्याचे वडील, इव्हान ख्रिस्तोफोरोविच कुइंद्झी (इतरत्र एमेन्झी [३] एक पॉन्टिक ग्रीक चांभार होते. आर्खिप सहा वर्षांचा असताना त्याने आपले आई-वडील गमावले, त्यामुळे त्याला चर्चच्या बांधकाम स्थळावर काम करून, पाळीव जनावरे चारून आणि धान्याच्या व्यापाऱ्याच्या दुकानात काम करून उदरनिर्वाह करणे भाग पडले. त्याला कुटुंबातील एका ग्रीक मित्राकडून, जो शिक्षक होता, प्राथमिक शिक्षण मिळाले आणि त्यानंतर तो स्थानिक शाळेत गेला.
१८५५ मध्ये, वयाच्या १३-१४ व्या वर्षी, कुइंद्झी इव्हान आयवाझोव्स्की यांच्याकडे कला शिकण्यासाठी फियोदोसियाला गेले; तथापि, ते फक्त रंग मिसळण्यात व नवे रंग बनवण्यात गुंतले होते.[५] त्यांनी आयवाझोव्स्कीचे विद्यार्थी असलेल्या ॲडॉल्फ फेसलर यांच्याकडे शिक्षण घेतले.[६] १९०३ च्या एका ज्ञानकोशीय लेखात म्हटले आहे: "जरी कुइंद्झीला आयवाझोव्स्कीचा विद्यार्थी म्हणता येत नसले तरी, त्याच्या कार्याच्या सुरुवातीच्या काळात आयवाझोव्स्कीचा त्याच्यावर निःसंशयपणे काही प्रभाव होता; त्याने आपल्या चित्रकलेच्या शैलीत त्यांच्याकडून बरेच काही घेतले आहे".[७] इंग्रज कला इतिहासकार जॉन ई. बोल्ट यांनी लिहिले की "आयवाझोव्स्कीच्या सूर्यास्त, वादळे आणि उसळणाऱ्या महासागरांशी संबंधित प्रकाश आणि आकाराच्या मूलभूत जाणिवेने तरुण कुइंद्झीवर कायमस्वरूपी प्रभाव टाकला आहे."[५]
१८६० ते १८६५ या काळात कुइंद्झीने टागान्रोग येथील सिमिओन इसाकोविच यांच्या फोटोग्राफी स्टुडिओमध्ये काम केले. त्याने स्वतःचा फोटोग्राफी स्टुडिओ उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. त्यानंतर, कुइंद्झी टागान्रोग सोडून सेंट पीटर्सबर्गला गेला.
त्याने प्रामुख्याने स्वतंत्रपणे आणि सेंट पीटर्सबर्ग कला अकादमीमध्ये (१८६८ पासून; १८९३ पासून पूर्ण सदस्य) चित्रकलेचा अभ्यास केला. तो 'प्रवासी कला प्रदर्शने' ( पेरेडविझ्निकी ) या गटाचा सह-भागीदार होता. हा गट रशियातील वास्तववादी कलाकारांचा होता, ज्यांनी शैक्षणिक निर्बंधांच्या निषेधार्थ एक कलाकार सहकारी संस्था स्थापन केली. ही १८७० मध्ये 'प्रवासी कला प्रदर्शने संस्था' (पेरेडविझ्निकी) म्हणून विकसित झाली. १८७२ मध्ये, कुइंद्झीने अकादमी सोडली आणि एक स्वतंत्र कलाकार म्हणून काम केले. 'ऑन द वलाम आयलंड' हे चित्र पावेल ट्रेत्याकोव्हने आपल्या कलादालनासाठी विकत घेतलेली पहिली कलाकृती होती. १८७३ मध्ये, कुइंद्झीने आपले 'द स्नो' हे चित्र प्रदर्शित केले, ज्याला १८७४ मध्ये लंडन येथील आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात कांस्य पदक मिळाले. १८७० च्या दशकाच्या मध्यात, त्याने पेरेडविझ्निकीच्या धर्तीवर अनेक चित्रे तयार केली, ज्यात निसर्गचित्रण हे विशिष्ट सामाजिक संबंधांसाठी तयार केले होते. ह्यात काही चित्र होते - फॉरगॉटन व्हिलेज (१८७४), चुमाक पाथ इन मारियुपोल (१८७५) - हे दोन्ही ट्रेत्याकोव्ह गॅलरीत आहे.
आपल्या परिपक्व काळात कुइंद्झी यांनी नैसर्गिक परिस्थितीचे सर्वात अभिव्यक्त प्रकाशमय पैलू टिपण्याची आकांक्षा बाळगली. त्यांनी विहंगम दृश्ये तयार करण्यासाठी संमिश्र रचनांचा (उदा. उंच क्षितिज) वापर केला. प्रकाशाचे परिणाम आणि मुख्य छटांमध्ये दर्शविलेल्या तीव्र रंगांचा वापर करून, त्यांनी प्रकाशाचा भ्रम चित्रित केला जसे की इव्हनिंग इन युक्रेन (१८७६); अ बर्च ग्रुव्ह (१८७९); आफ्टर अ थंडरस्टॉर्म (१८७९); या तिन्ही कलाकृती ट्रेत्याकोव्ह गॅलरीत आहेत. मुनलिट नाईट ऑन द द्नीपर (१८८०) जे रशियन संग्रहालय, सेंट पीटर्सबर्ग येथे आहे. त्यांची नंतरची कामे रंगरंगोटीच्या सजावटीच्या परिणामांसाठी उल्लेखनीय आहेत.
कुइंद्झीने सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात शिकवणाऱ्या रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव्ह यांच्याशी घनिष्ठ मैत्री केली.[८] कुइंद्झी एक श्रोता किंवा विद्यार्थी म्हणून त्यांच्या वर्गांना उपस्थित राहत असे. तो वारंवार मेंडेलीव्ह आणि त्यांच्या पत्नीच्या साप्ताहिक मेळाव्यांना भेट देत असे आणि त्याला प्रकाश, रंग आणि आकलन यांच्या अभ्यासात आयुष्यभराची आवड निर्माण झाली.[९]
कुइंद्झी यांनी सेंट पीटर्सबर्ग कला अकादमीमध्ये व्याख्याने दिली ते १८९२ पासून प्राध्यापक व १८९४ पासून निसर्गचित्र कार्यशाळेचे प्राध्यापक-प्रमुख होते. परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनांना पाठिंबा दिल्यामुळे १८९७ मध्ये त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले. अर्काडी रायलोव्ह, निकोलस रोएरिच, कॉन्स्टँटिन बोगाएव्स्की आणि इतर कलाकार त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये होते. कुइंद्झी यांनी १९०९ मध्ये 'सोसायटी ऑफ आर्टिस्ट्स'च्या स्थापनेचा पुढाकार घेतला, नंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले.
चित्रांची चोरी
[संपादन]जानेवारी २०१९ मध्ये, त्यांचे ऐ-पेट्री. क्रिमिया हे चित्र मॉस्कोच्या ट्रेत्याकोव्ह गॅलरीमधून चोरीला गेले होते. परंतु दुसऱ्याच दिवशी ते सापडले आणि सुरक्षितपणे परत मिळवण्यात आले.[१०] चित्र चोरणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.[११]
२१ मार्च २०२२ रोजी, युक्रेनवरील रशियन आक्रमणादरम्यान, मारियुपोलच्या वेढ्यात झालेल्या रशियन हवाई हल्ल्यात कुइंद्झी कला संग्रहालयाचे नुकसान झाले.[१२][१३] संग्रहात असलेली कुइंद्झीची तीन मूळ चित्रे— रेड सनसेटचे एक रेखाचित्र आणि एल्ब्रस व ऑटम या दोन तयारीच्या कलाकृती—बॉम्बस्फोटापूर्वी संग्रहालयाच्या तळघरात ठेवण्यात आली होती आणि त्यांना नुकसान झाले नाही. तरीही रशियाने आपल्या लुटीच्या मोहिमेचा भाग म्हणून ती ताब्यात घेतली.[१४][१५][१६][१७]
गॅलरी
[संपादन]- क्राइस्ट इन द गार्डन ऑफ गेथसेमाने (१९०१)
- लेक लदोगा (१८७३)
- इव्हनिंग इन युक्रेन (१८७८–१९०१)
- अ बर्च ग्रुव्ह (१८७९)
- द्नीपर इन द मॉरनिंग (१८८१)
- मुन लाईट ऑन द द्नीपर (१८८०)
- सर्फ ॲन्ड क्लाऊडस (१८८२)
- सी. क्रिमिया (१८९८–१९०८)
- एल्ब्रस (१८९०-१८९५)
- रेनबो (१९००-१९०५)
- मुनस्पॉट्स इन द फॉरेस्ट, विंटर (१८९८–१९०८)
- नाइट (१९०५-१९०८)
- बर्च ग्रोव्ह (१९०१)
- रेड सनसेट ऑन द द्नीपर (१९०५)
- चुमाक्स पाथ इन मारियुपोल (१८७५)
नोंदी
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Письма Въ Редакцiю". Novoye Vremya (रशियन भाषेत). No. 10055. March 15, 1904. p. 5. September 12, 2024 रोजी पाहिले – Bibliothèque nationale de France द्वारे. Unknown parameter
|trans-quote=ignored (सहाय्य); Unknown parameter|script-quote=ignored (सहाय्य) - ↑ "Смѣхъ и Горе". Mir iskusstva (रशियन भाषेत). No. 3. 1904. p. 73. September 11, 2024 रोजी पाहिले – Nekrasov Central Library द्वारे.
- 1 2 "Biography of Arkhip Ivanovich Kuinji (1842-1910), Russian Artist". 2000. 8 May 2021 रोजी पाहिले.
- 1 2 Марина Молошна (January 27, 2022). "Що не так з датою народження Куїнджі, та чому Google помилився, привітавши всіх з його 180-річчям". www.0629.com.ua (युक्रेनियन भाषेत). 0629.com.ua. January 27, 2022 रोजी पाहिले.
- 1 2 Bowlt, John E. (1975). "A Russian Luminist School? Arkhip Kuindzhi's "Red Sunset on the Dnepr"". Metropolitan Museum Journal. Metropolitan Museum of Art. 10: 123–125. doi:10.2307/1512704. JSTOR 1512704.
- ↑ Manin, Vitaly (2000). Архип Куинджи (रशियन भाषेत). Moskva: Belyĭ gorod. p. 6. ISBN 978-5-7793-0219-7.
в Феодосию к знаменитому Айвазовскому. Куинджи прибыл в тихую Феодосию, по-видимому, летом 1855 года. ... Устройством Куинджи занялся Адольф Фесслер, ученик и копиист Айвазовского. Жил Архип во дворе под навесом в ...
- ↑ "Куинджи Архип Иванович". Russian Biographical Dictionary (रशियन भाषेत). Saint Petersburg: Imperial Russian Historical Society. 1903.
Хотя Куинджи и нельзя назвать учеником Айвазовского, но последний имел на него, несомненно, некоторое влияние в первый период его деятельности; от него он заимствовал многое в манере писать, в выборе тем, в любви к широким пространствам.
- ↑ Gordin, Michael D. (2019). A well-ordered thing : Dmitrii Mendeleev and the shadow of the periodic table (Revised ed.). Princeton. p. 182. ISBN 9780691172385.
- ↑ Paranyuk, Viktoria (2019). "Painting Light Scientifically: Arkhip Kuindzhi's Intermedial Environment". Slavic Review. 78 (2): 456–480. doi:10.1017/slr.2019.97.
- ↑ "Painting stolen in Tretyakov Gallery heist 'not damaged', source says". TASS.
- ↑ "Three Years For Stealing Painting From Moscow's Tretyakov Gallery". rferl.org. 25 September 2019.
- ↑ "Mariupol museum dedicated to 19th-century artist Arkhip Kuindzhi destroyed by airstrike". The Art Newspaper (इंग्रजी भाषेत). 23 March 2022. 2022-03-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 25 March 2022 रोजी पाहिले.
- ↑ "In Mariupol occupiers destroyed an art museum that housed original works by Aivazovsky". Hromadske Radio (इंग्रजी भाषेत). 24 March 2022. 2022-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-01 रोजी पाहिले.
- ↑ Sorokina, Yanina (2022-07-06). "How Russia 'Removed' Priceless Kuindzhi Artworks from Ukraine's Mariupol". The Moscow Times (इंग्रजी भाषेत). 2023-03-24 रोजी पाहिले.
- ↑ "Culture war: Russia ransacks art to rub out Ukraine's history". POLITICO (इंग्रजी भाषेत). 2022-12-06. 2023-03-24 रोजी पाहिले.
- ↑ Bushard, Brian (2023-01-14). "These Are Some of the Most Famous Ukrainian Works of Art Looted by Russia". Forbes (इंग्रजी भाषेत). 2023-03-25 रोजी पाहिले.
- ↑ Назарова, Ганна (2023-01-27). "Сгоревшие коллекции и украденные картины Архипа Куинджи: что стало с Мариупольским художественным музеем после открытого вторжения". Вільне радіо (रशियन भाषेत). 2024-12-21 रोजी पाहिले.