आरोग्य सेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आरोग्य सेतु या पानावरून पुनर्निर्देशित)


आरोग्य सेतू
आरोग्य सेतू लोगो
आरोग्य सेतू लोगो
विकासक राष्ट्रीय माहिती केंद्र, भारत सरकार
प्रारंभिक आवृत्ती एप्रिल 2020; अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "०" (2020-०४)
संगणक प्रणाली
  • अँड्रॉईड
  • आय ओएस
प्लॅटफॉर्म
  • गुगल प्ले
  • अ‍ॅप स्टोअर (आय ओएस)
संचिकेचे आकारमान ३.७ एम बी
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम , पंजाबी, बंगाली, ओडिया, गुजराती आणि आसामी
सॉफ्टवेअरचा प्रकार आरोग्य सेवा
संकेतस्थळ www.mygov.in/aarogya-setu-app/

आरोग्य सेतू (रोगापासून मुक्तीसाठी असलेला पूल) हा भारतीय अनुप्रयोग (ॲप) आहे. हे कोविड-१९ च्या माहीतीचा मागोवा घेण्यासाठी बनवलेले मोबाईल एप्लिकेशन आहे. जे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले आहे. ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

आढावा[संपादन]

या अ‍ॅपचा उद्देशित उद्देश कोविड-१९ रोगाबद्दल जागरूकता पसरवणे आणि त्या संबंधित आरोग्य सेवांना भारतातील लोकांशी जोडणे हा आहे.[१] हे अ‍ॅप कोविड-१९ आरोग्य विभागाच्या पुढाकारांना आणि चांगल्या पद्धती आणि सल्ले यांना समाविष्ट करतो. हे एक ट्रॅकिंग ॲप आहे जे कोरोनाव्हायरस संक्रमणाचा मागोवा घेण्यासाठी स्मार्टफोनच्या जीपीएस आणि ब्लूटूथ वैशिष्ट्यांचा वापर करतो. हे अ‍ॅप अँड्रॉईड[२] आणि आय ओएस मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमसाठी उपलब्ध आहे.[३] जर कोविड-१९ संक्रमित व्यक्ती सहा फूटांच्या आत आल्यास धोका असल्याची जाणीव करून देतो. यासाठी हे ॲप ब्लुटूथचा वापर करतो. यासाठी तो संपूर्ण भारतातील ज्ञात प्रकरणांच्या डेटाबेसद्वारे स्कॅन करून घेतो. स्थान माहिती (जी पी एस) वापरून, ते उपलब्ध असलेल्या डेटाच्या आधारे ठराविक ठिकाण संक्रमित क्षेत्रापैकी आहे की नाही हे निर्धारित करते.[१]

हे अ‍ॅप पूर्वीच्या कोरोना कवच नावाच्या ॲपची अद्ययावत आवृत्ती आहे. कोरोना कवच आता बंद करण्यात आला आहे. कोरोना कवच ॲप भारत सरकारने यापूर्वी जारी केला होता.[४]

कार्यात्मक तपशील[संपादन]

आरोग्य सेतूचे चार विभाग आहेत.

  • आपली स्थिती (वापरकर्त्यांसाठी कोविड-१९ च्या संक्रमणाचा धोका दर्शवतो)
  • स्व-मूल्यांकन (वापरकर्त्यास संसर्ग होण्याचा धोका कळू शकतो)
  • कोविड-१९ची अद्यतने (स्थानिक व राष्ट्रीय कोविड-१९ प्रकरणांशी निगडित अद्यतने देते)
  • ई-पास (ई-पाससाठी अर्ज केल्यास तो उपलब्ध होईल)[५]

वापरकर्त्याकडून ५०० मी, १ किमी, २ किमी, ५ किमी आणि १० किमीच्या परिघात किती कोविड-१९ संक्रमित प्रकरणे आहेत हे सांगते. अ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) प्रदान करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे जेणेकरून इतर संगणक प्रोग्राम, मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि वेब सेवा आरोग्य सेतूमध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांचा आणि डेटाचा वापर करू शकतील.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "Govt launches 'Aarogya Setu', a coronavirus tracker app: All you need to know". Livemint (इंग्रजी भाषेत). 2020-04-02. 2020-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Aarogya Setu – Apps on Google Play". play.google.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Aarogya Setu Mobile App". MyGov.in (इंग्रजी भाषेत). 2020-04-05 रोजी पाहिले.
  4. ^ "Govt discontinues Corona Kavach, Aarogya Setu is now India's go-to COVID-19 tracking app". The Financial Express (इंग्रजी भाषेत). 2020-04-05. 2020-04-05 रोजी पाहिले.
  5. ^ "Aarogya Setu New UI and Features". SA News Channel. 15 April 2020.