आय.एन.एस. दुनागिरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आय.एन.एस. दुनागिरी (F36) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका ५ मे, इ.स. १९७७ ते २० ऑक्टोबर, इ.स. २०१० अशी ३४ वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती.

ही युद्धनौका मुंबईच्या माझगाव डॉक्समध्ये बांधली गेली. जवळजवळ पाच वर्षे बांधकाम चाललेल्या या नौकेतील अनेक प्रणाली भारतात बनविलेल्या होत्या. १९९०मध्ये ही नौका ४० महिने देखभालीकरता सेवेतून बाहेर होती. २००६मध्ये दुनागिरी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या एम.व्ही. किटी या मालवाहू नौकेला धडकली व त्यात तिचे मोठे नुकसान झाले.