Jump to content

आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
国際インド映画アカデミー賞 最優秀新人女優賞 (ja); IIFA Award/Beste Debütantin (de); IIFA 올해의 여자 스타 데뷔 상 (ko); IIFA Award for Star Debut of the Year – Female (en); جائزة الأكاديمية الهندية الدولية للأفلام لأفضل ظهور للنجم لهذه العام ‑ سيدات (ar); বর্ষসেরা নবাগত তারকা অভিনেত্রী বিভাগে আইফা পুরস্কার (bn); आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री (mr) Annual award of the International Indian Film Academy (en); আন্তর্জাতিক ভারতীয় চলচ্চিত্র অ্যাকাডেমি কর্তৃক প্রদত্ত বাৎসরিক পুরস্কার (bn); Annual award of the International Indian Film Academy (en) 国際インド映画アカデミー賞 新人女優賞 (ja)
आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री 
Annual award of the International Indian Film Academy
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारपुरस्काराची श्रेणी
ह्याचा भागआय.आय.एफ.ए. पुरस्कार
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. २०००
[ अधिकृत संकेतस्थळ]
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी द्वारे वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून दिला जातो, ज्याने तिच्या पदार्पणाच्या चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रीला सन्मानित केले जाते. मूळतः "आयफा अवॉर्ड फॉर फ्रेश फेस ऑफ द इयर (महिला)" म्हणून ओळखले जाणारा हा पुरस्कार, २००५ मध्ये अधिकृतपणे त्याला नवीन शीर्षक देण्यात आले.

आयफा पुरस्कार हे २००० मध्ये सुरू झाले व पहिला समारंभ लंडन येथे झाला होता.[] त्यानंतर हा पुरस्कार सोहळा दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कॅनडा, अमेरिका, अबुधाबी आणि भारतात मुंबई आणि जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये, हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये इंदूर येथे होणार होता; परंतु तो पुढे ढकलण्यात आला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर ऑनलाइन विजेत्यांची घोषणा करण्यात आली.[]

२००१ मध्ये ह्या श्रेणीच्या पहिल्या वर्षात, चार वेगवेगळ्या अभिनेत्रींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला - करीना कपूर, किम शर्मा, प्रीती झंगियानी आणि शमिता शेट्टी.

विजेते

[संपादन]
वर्ष विजेते चित्रपट भूमीका
२००१ करीना कपूर रेफ्युजी नाजनीन "नाज" अहमद
किम शर्मा मोहब्बतें संजना पॉल
प्रीती झंगियानी किरण खन्ना
शमिता शेट्टी इशिका धनराजगीर
२००२ बिपाशा बासू अजनबी सोनिया/नीता
ग्रेसी सिंग लगान गौरी
२००३ ईशा देओल कोई मेरे दिल से पूछे ईशा सिंग
२००४ अमृता राव इश्क विश्क
२००५ आयेशा टाकिया तारझान: द वंडर कार प्रिया
२००६ विद्या बालन परिणीता ललिताच्या
२००७ कंगना राणावत गँगस्टर सिमरन
२००८ दीपिका पडुकोण ओम शांती ओम शांतीप्रिया/संध्या "सँडी"
२००९ असिन तोट्टुंकल गजनी कल्पना शेट्टी
२०१० जॅकलीन फर्नांडिस अलादिन जस्मिन
माही गिल देव. डी परमिंदर "पारो"
२०११ सोनाक्षी सिन्हा दबंग रज्जो
२०१२ परिणीती चोप्रा लेडीज वर्सेस रिक्की बहल डिंपल चड्ढा
२०१३ यामी गौतम विकी डोनर आशिमा रॉय अरोरा
२०१४ वाणी कपूर शुद्ध देसी रोमान्स तारा
२०१५ कृती सेनॉन हिरोपंती डिम्पी
२०१६ भूमी पेडणेकर दम लगा के हईशा संध्या वर्मा[]
२०१७ दिशा पटानी एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी प्रियंका झा
२०१८ पुरस्कार नाही
२०१९ सारा अली खान केदारनाथ मंदाकिनी "मुक्कू" मिश्रा
२०२० अनन्या पांडे स्टुडंट ऑफ द इयर २ श्रेया रंधावा[]
२०२१-२२ शर्वरी वाघ बंटी और बबली २ सोनिया "बबली" रावत[]
२०२३ खुशाली कुमार धोखा: राउंड डी कॉर्नर सांची सिन्हा[]
२०२४ अलिझेह अग्निहोत्री फॅरे नियती सिंग
२०२५ प्रतिभा रांता लापता लेडीज जया त्रिपाठी-सिंग / पुष्पा राणी

इतर माहिती

[संपादन]

पाच अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराचे पण नामांकन मिळाले होते; कालक्रमानुसार त्या आहेत, ग्रेसी सिंग (२००२), विद्या बालन (२००६), कंगना राणावत (२००७), दीपिका पडुकोण (२००८) आणि असिन तोट्टुंकल (२००९). तसेच फक्त तीन अभिनेत्रींना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीत नामांकन मिळाले होते; कालक्रमानुसार त्या आहेत, बिपाशा बासू (२००२), परिणीती चोप्रा (२०१२) आणि दिशा पटानी (२०१७). परिणीती चोप्रा ही एकमेव अभिनेत्री आहे जिने एकाच वर्षी दोन्ही पुरस्कार जिंकले.

करीना कपूर, विद्या बालन, कंगना राणावत, कृती सेनॉन आणि दीपिका पडुकोण या पाच अभिनेत्री आहेत ज्यांना नंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार देखील मिळाला. कंगना राणौत आणि परिणीती चोप्रा या अशा दोनच अभिनेत्री आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार देखील मिळाला आहे. कंगना राणावत ही एकमेव अशी अभिनेत्री आहे जिला सर्वोत्कृष्ट पदार्पण, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे तिन्ही पुरस्कार मिळाले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "When Shah Rukh Khan charmed the heck out of Angelina Jolie, made her crack up with joke about Aishwarya Rai". indianexpress.com. २९ एप्रिल २०२२. १३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "21st IIFA Awards ceremony in Indore to be hosted by Salman Khan, postponed". www.seelatest.com (इंग्रजी भाषेत). 2 April 2020. 2020-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-17 रोजी पाहिले.
  3. ^ "IIFA Awards 2016: The Complete List of Winners". News18. 26 June 2016. 27 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 July 2016 रोजी पाहिले.
  4. ^ "IIFA Awards 2020 - Popular Award Winners". IIFA Awards. 25 November 2021. 26 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 November 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "IIFA Awards 2022:a list of all the winners". IIFA (इंग्रजी भाषेत). 4 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-06-05 रोजी पाहिले.
  6. ^ "IIFA Awards 2023 Winners". 11 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 December 2024 रोजी पाहिले.