Jump to content

आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आय.आय.एफ.ए. पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
पुरस्काराची श्रेणी, सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्रीचा पुरस्कार
ह्याचा भागआय.आय.एफ.ए. पुरस्कार संपादन
देशभारत संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.iifa.com/web07/cntnt/iifa.htm संपादन

आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (आय.आय.एफ.ए. किंवा आयफा) तर्फे हिंदी चित्रपटांसाठीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा एक भाग म्हणून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी आय.आय.एफ.ए. पुरस्कार दिला जातो, ज्यामध्ये प्रमुख भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनेत्रीला सन्मानित केले जाते. प्राप्तकर्ता प्रेक्षकांद्वारे निवडली जाते आणि विजेत्याची घोषणा समारंभात केली जाते.

आयफा पुरस्कार हे २००० मध्ये सुरू झाले व पहिला समारंभ लंडन येथे झाला होता.[] त्यानंतर हा पुरस्कार सोहळा दक्षिण आफ्रिका, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, कॅनडा, अमेरिका, अबुधाबी आणि भारतात मुंबई आणि जयपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. २०२० मध्ये, हा पुरस्कार सोहळा मार्चमध्ये इंदूर येथे होणार होता; परंतु तो पुढे ढकलण्यात आला आणि नोव्हेंबर २०२० मध्ये इंस्टाग्रामवर ऑनलाइन विजेत्यांची घोषणा करण्यात आली.[]

ह्या श्रेणीतील पहिल्या पुरस्काराच्या मानकरी हम दिल दे चुके सनम चित्रपटासाठी ऐश्वर्या राय होत्या. आलिया भट्ट आणि राणी मुखर्जी यांनी ४ वेळा हा पुरस्कार जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर विद्या बालन यांचा क्रमांक लागतो ज्यांनी ३ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे. ऐश्वर्या राय, करीना कपूर आणि दीपिका पदुकोण या तीन अभिनेत्रींनी दोनदा हा पुरस्कार जिंकला आहे. पदुकोण यांच्या नावावर सर्वाधिक ११ नामांकने आहेत.

विजेते आणि नामांकन

[संपादन]
विजेता
वर्षअभिनेत्रीचित्रपटभूमिका
२००० ऐश्वर्या रायहम दिल दे चुके सनमनंदिनी
ऐश्वर्या रायतालमानसी शंकर
काजोलहम आपके दिल में रहते हैंमेघा
करिश्मा कपूरबीवी नं १पूजा मेहरा
सोनाली बेंद्रेसरफरोश सीमा
२००१ करिश्मा कपूरफिझाफिझा इक्रमुल्ला
माधुरी दीक्षितपुकारअंजली
प्रीती झिंटाक्या कहनाप्रिया बक्षी
शिल्पा शेट्टीधडकनआंजली
तबूअस्तित्त्व अदिती पंडीत
२००२ तबूचांदनी बारमुमताज अली अन्सारी
अमीशा पटेलगदर: एक प्रेम कथासकिना
ग्रेसी सिंगलगानगैरी
काजोलकभी खुशी कभी गमअंजली शर्मा
प्रीती झिंटादिल चाहता हैशालिनी
२००३ ऐश्वर्या रायदेवदासपार्वती "पारो"
अमीशा पटेलहमराझप्रिया सिंघानिया
करिश्मा कपूरशक्ती: द पावरनंदिनी
माधुरी दीक्षितदेवदासचंद्रमुखी
राणी मुखर्जीसाथियासुहानी शर्मा
२००४ प्रीती झिंटाकल हो ना होनैना कॅथरीन कपूर
हेमा मालिनीबागबानपूजा मल्होत्रा
प्रीती झिंटाकोई... मिल गयानिशा
राणी मुखर्जीचलते चलतेप्रिया चोपडा
ऊर्मिला मातोंडकरभूतस्वाती
२००५ राणी मुखर्जीहम तुमरिया प्रकाश
करीना कपूरऐतराजप्रिया सक्सेना
प्रियंका चोप्रामुझसे शादी करोंगीरानी सिंह
शिल्पा शेट्टीफिर मिलेंगेतमन्ना सहानी
ऊर्मिला मातोंडकरएक हसीना थीसारिका वर्तक
२००६ राणी मुखर्जीब्लॅकमिशेल मॅकनेली
कोंकणा सेन शर्मापेज थ्रीमाधवी शर्मा
प्रीती झिंटासलाम नमस्तेअंबर मल्होत्रा
राणी मुखर्जीबंटी और बबलीविम्मी "बबली"
विद्या बालनपरिणीताललिता
२००७ राणी मुखर्जीकभी अलविदा ना कहनामाया तलवार
ऐश्वर्या रायधूम २सुनैहरी
काजोलफनाझूनी बैग
कंगना राणावतगॅगस्टरसिमरन
करीना कपूरओमकारा डॉली मिश्रा
विद्या बालनलगे रहो मुन्ना भाईजान्हवी
२००८ करीना कपूरजब वी मेटगीत धिल्लन
ऐश्वर्या रायगूरूसुजाता देसाई
दीपिका पडुकोणओम शांती ओमशातीप्रिया / सॅन्डी
कतरिना कैफनमस्ते लंडनजस्मीत "जीत" मल्होत्रा
तबूचीनी कमनीना वर्मा
विद्या बालनभूल भुलैयाअवनी चतुर्वेदी
२००९ प्रियंका चोप्राफॅशन मेघना माथूर
ऐश्वर्या रायजोधा अकबरजोधा बाई
असिन तोट्टुंकलगजनीकल्पना शेट्टी
बिपाशा बासूरेससोनिया मार्तीन
कतरिना कैफसिंघ इज किंगसोनिया सिंग
२०१० करीना कपूर३ इडियट्सपिया सहस्त्रबुद्धे
विद्या बालनपाविद्या
दीपिका पडुकोणलव्ह आज कलमीरा पंडीत
माही गिलदेव डीपरमिंदर "पारो"
प्रियंका चोप्राकमिनेस्विटी
२०११ अनुष्का शर्माबँड बाजा बारातश्रुती कक्कड
ऐश्वर्या रायगुजारिशसोफिया डी'सुजा
करीना कपूरगोलमाल ३डब्बू
कतरिना कैफराजनीतीइंदू प्रताप सिंग
विद्या बालनइश्कियाकृष्णा वर्मा
२०१२ विद्या बालनद डर्टी पिक्चररेश्मा / सिल्क
कंगना राणावततनू वेड्स मनूतनूजा "तनू" त्रिवेदी
करीना कपूरबॉडीगार्डदिव्या
माही गिलसाहेब, बिवी और गॅग्स्टरमाधवी देवी
प्रियंका चोप्रा७ खून माफसुजॅना ॲना-मेरी जोन्स
२०१३ विद्या बालनकहानीविद्या बागची
दीपिका पडुकोणकॉकटेलवेरोनिका मलानी
हुमा कुरेशीगॅग्स ऑफ वासेपूर - २मोहसिना
करीना कपूरहिरोइनमाही अरोरा
प्रियंका चोप्राबर्फी!झिलमील चॅटर्जी
श्रीदेवीइंग्लिश विंग्लिशशशी गोडबोले
२०१४ दीपिका पडुकोणचेन्नई एक्सप्रेसमिनालोचनी "मिना" अळगसुंदरम
दीपिका पडुकोणगोलियों की रासलीला राम-लीलालिला सानेरा
दीपिका पडुकोणये जवानी है दीवानीनैना तलवार
निम्रत कौरद लंचबॉक्सइला
श्रद्धा कपूरआशिकी २आरोही शिर्के
सोनाक्षी सिन्हालूटेरापाखि रॉय चौधरी
२०१५ कंगना राणावतक्वीन रानी मेहरा
आलिया भट्टटू स्टेट्सअनन्या स्वामीनाथन
अनुष्का शर्मापी.के.जगत "जग्गू" साहनी
दीपिका पडुकोणहॅपी न्यू इयरमोहीनी जोशी
प्रियंका चोप्रामेरी कोममेरी कोम
राणी मुखर्जीमर्दानीशिवानी रीय
२०१६ दीपिका पडुकोणपिकूपिकू बॅनर्जी
दीपिका पडुकोणबाजीराव मस्तानीमस्तानी
कंगना राणावततनू वेडस मनू रिटर्न्सतनू / कुसूम
प्रियंका चोप्रादिल धडकने दोआएशा मेहरा
श्रद्धा कपूरएबीसीडी २विन्नी
२०१७ आलिया भट्टउडता पंजाबबावरी / मेरी जेन
आलिया भट्टडियर जिंदगीकायरो "कोको"
अनुष्का शर्माए दिल है मुश्किलअलेझी
सोनम कपूरनीरजानीरजा भनोत
तापसी पन्नूपिंकमिनल अरोरा
२०१८ श्रीदेवीमॉमदेवकी सबरवाल
आलिया भट्टबद्रीनाथ की दुल्हनियावैदेही त्रिवेदी
भूमी पेडणेकरशुभ मंगल सावधानसुगंधा जोशी
विद्या बालनतुम्हारी सुलूसुलोचना "सुलू"
झायरा वसीमसिक्रेट सुपरस्टारइन्सिया मलिक
२०१९ आलिया भट्टराझीसेहमत खान
दीपिका पडुकोणपद्मावतरानी पद्मावती
नीना गुप्ताबधाई होप्रियंवदा कौशिक
राणी मुखर्जीहिचकीनैना माथूर
तबूअंधाधुनसिमी
२०२०[] आलिया भट्टगल्ली बॉयसफीना फिरदौसी
करीना कपूरगुड न्यूजदीप्ती बत्रा
प्रियंका चोप्राद स्काय इज पिंकअदिती चौधरी
तापसी पन्नूबदलानयना सेठी
विद्या बालनमिशन मंगलतारा शिंदे
२०२१–२२[][] कृती सेनॉनमिमीमिमी राठोड
कियारा अडवाणीशेरशाहडिंपल चीमा
तापसी पन्नूथप्पडअमृता सभरवाल
सान्या मल्होत्रापगलैटसंध्या गिरी
विद्या बालनशेरनीविद्या व्हिन्सेंट
२०२३[] आलिया भट्टगंगुबाई काठियावाडीगंगुबाई काठियावाडी
आलिया भट्टडार्लिंग्जबद्रुनिसा
शेफाली शाहडार्लिंग्जशमशुनिसा
तब्बूभूल भुलैया २अंजुलिका चॅटर्जी / मंजुलिका चॅटर्जी
यामी गौतमअ थर्सडेनयना जैस्वाल
२०२४[][] राणी मुखर्जीमिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वेदेबिका चॅटर्जी
आलिया भट्टरॉकी और रानी की प्रेम कहानीराणी चॅटर्जी
दीपिका पडुकोणपठाणरुबिना मोहसिन
कियारा अडवाणीसत्यप्रेम की कथाकथा कपाडिया
तापसी पन्नूडंकीमनू रंधवा
२०२५[] नितांशी गोयललापता लेडीजफूल कुमारी
आलिया भट्टजिगरासत्यभामा "सत्या" आनंद
कतरिना कैफमेरी ख्रिसमसमारिया
श्रद्धा कपूरस्त्री २- पात्रास नाव नाही -
यामी गौतमकलम ३७०झुनी हक्सर

इतर माहिती

[संपादन]

२०१८ मध्ये जेव्हा श्रीदेवीला तिच्या मॉम चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला तेव्हा ती एकमेव अशी अभिनेत्री झाली जिला मरणोत्तर हा पुरस्कार मिळाला आहे.

राणी मुखर्जी, कंगना राणावत, अनुष्का शर्मा, तब्बू आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्री आहेत ज्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार देखील मिळाला आहे. मुखर्जी ही एकमेव अभिनेत्री आहे जिने एकाच वर्षी (२००५) दोन्ही पुरस्कार जिंकले. करीना कपूर, विद्या बालन, कंगना राणावत, दीपिका पडुकोण आणि कृती सेनॉन यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा आयफा पुरस्कार मिळाला आहे. कंगना राणावत ही एकमेव अभिनेत्री आहे जिने तिन्ही मोठ्या श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले: सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण .

२००७ (कभी अलविदा ना कहना) आणि २०२४ ( मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे) या १७ वर्षांच्या कालावधीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांमधील सर्वात जास्त अंतराचा विक्रम राणी मुखर्जीच्या नावावर आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. "When Shah Rukh Khan charmed the heck out of Angelina Jolie, made her crack up with joke about Aishwarya Rai". indianexpress.com. २९ एप्रिल २०२२. १३ मार्च २०२५ रोजी पाहिले.
  2. "21st IIFA Awards ceremony in Indore to be hosted by Salman Khan, postponed". www.seelatest.com (इंग्रजी भाषेत). 2 April 2020. 2020-03-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-05-17 रोजी पाहिले.
  3. "IIFA Awards 2020 - Popular Award Winners". IIFA Awards. 25 November 2021. 26 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 November 2021 रोजी पाहिले.
  4. "IIFA 2022 Nominations: Shershaah takes the lead with 12 Nominations, Ludo and 83 emerge as strong contenders; check out the complete list". 1 April 2022.
  5. "IIFA Awards 2022 complete list of winners: Vicky Kaushal, Kriti Sanon win top acting honours". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-06-05 रोजी पाहिले.
  6. "IIFA 2023 nominations announced: Brahmastra, Gangubai Kathiawadi and Bhool Bhulaiyaa 2 lead the list". द इंडियन एक्सप्रेस. 27 December 2022. 27 December 2022 रोजी पाहिले.
  7. "IIFA 2024 full list of nominations: Ranbir Kapoor, Ranveer get Best Actor nods; Deepika Padukone, Alia Bhatt for Actress". हिंदुस्तान टाइम्स. 19 August 2024. 19 August 2024 रोजी पाहिले.
  8. Sonali, Kriti (28 September 2024). "IIFA 2024 full list of winners: Shah Rukh Khan and Rani Mukerji win big; Animal bags 5 awards. See photos and videos". द इंडियन एक्सप्रेस. 29 September 2024 रोजी पाहिले.
  9. "IIFA Awards 2025: Laapataa Ladies Sweeps With 10 Awards. Kartik Aaryan Named Best Actor. Check Full List Of Winners". www.ndtv.com (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.

साचा:IIFA Awards