आयेशा सिद्दिका
| आयशा | |
|---|---|
| जन्म |
आयशा बिंत अबू बकर c. 605/614 मक्का, हेजाझ (आता सौदी अरेबिया) |
| मृत्यू |
678 मदिना, हेजाझ |
| धर्म | इस्लाम |
| जोडीदार | मोहम्मद |
| वडील | अबू बकर |
| आई | उम्म रुमान |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
आयशा बिंत अबू बकर (अरबी: عائشة بنت أبي بكر)[१] इस्लामी पैगंबर मोहम्मद यांची तिसरी आणि सर्वात लहान पत्नी होती. इस्लामिक लिखाणांमध्ये, तिच्या नावाचा उपसर्ग "मदर ऑफ द बिलिव्हर्स" या शीर्षकाने केला जातो म्हणजे आस्तिकांची आई. मोहम्मदच्या आयुष्यात आणि मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या इस्लामिक इतिहासात आयशाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. सुन्नी परंपरेत, आयशाला विद्वान, हुशार आणि जिज्ञासू म्हणून चित्रित केले आहे.[२]

आदरणीय आयेशा सिद्दिका यांच्या विवाहासंबंधी विवाद जगप्रसिद्ध आहे . आयेशा सिद्दिका यांचा विवाह आदरणीय प्रेषित मुहम्मद सलअम यांच्याशी त्या फक्त सहा वर्षांच्या असतांना झाला, असे काही इतिहासकार मानतात . त्यासाठी ते खालील हदीस (प्रेषित वचन)चा आधार घेतात. त्या हदीसमध्ये प्रेषितांनी आदरणीय अबू बकर यांची मुलगी आदरणीय आयेशांसोबत सहाव्या वर्षी लग्न केले , नवव्या वर्षी गौना (पाठवणी) झाली आणि वयस्क झाल्यानंतर वैवाहिक संबंध प्रस्थापित केल्याचा उल्लेख आहे. कमी वयात लग्न झाल्याचा पुरावा म्हणून जी हदीस सादर केली जाते , ती हदीसदेखील अनधिकृत असल्याचे अनेक इस्लामी विचारवंत मानतात . कारण एका हदीसचे एकापेक्षा जास्त निवेदक, साक्षीदार असावे लागतात कि , खरंच ते वचन प्रेषितांनी सांगितलेले आहे . या हदीसचे निवेदक फक्त एकच सापडतात आणि तेही सीरियाचे रहिवासी होते . लग्न मक्केत झाले आणि यासंबंधी मक्केतला कुणी निवेदक सापडू नये , तर शेकडो मैल दूरच्या इराकमधील एकमेव निवेदक सापडावा हे अविश्वसनीय वाटते.[३]
हदीस संकलन करत असतांना अरबीत अशरसित्ता (१ ६ ) चे सित्ता (६ ) झाल्याची संभावना काही इस्लामी विचारवंत व्यक्त करतात.[४] प्रेषितपत्नी आदरणीय आयेशा सिद्दिका यांच्या एक भगिनी आदरणीय अस्मा त्यांच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठ्या होत्या. आयेशा सिद्दिका यांच्यासोबत प्रेषितांचा विवाह हे मदिन्याला स्थलांतर करण्याच्या काही दिवसांपूर्वीच झाला होता (जवळपास वर्षभरापूर्वी). त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच हिजरी सन २ मध्ये त्यांची प्रेषितांच्या घरी विदाई (पाठवणी) झाली होती . हिजरी सन हे प्रेषितांच्या या स्थलांतरानंतरच सुरू झालेले आहे. आदरणीय अस्मा यांचे हिजरी सन ७ ३ मध्ये वयाची शंभर वर्षे पूर्ण करून निधन झाले. यावरून स्पष्ट होते कि , प्रेषितांच्या स्थलांतरावेळी त्यांचे वय (शंभरमधून ७ ३ वजा) २ ७ वर्षे होते . म्हणजेच आयेशा सिद्दिका बिंत अबू बकर यांचे वय (त्यांच्यापेक्षा १ ० ने कमी) १ ७ वर्षे होते . हिजरतच्या २ वर्षांनी म्हणजेच १ ९ वर्षे वय माता आयेशा यांचा गौणा (विदाई ए पाठवणी) झाला.[५]
वयाची आकडेवारी वादग्रस्त असली तरी मात्र यावर सर्व इतिहासकारांचे एकमत आहे कि , आयेशा सिद्दीका बिंत अबू बकर यांचे आदरणीय प्रेषित मुहम्मद सलअम यांच्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित झाले, त्यावेळी माता आयेशा या पूर्ण वयस्क होत्या . काही इस्लामी विचारवंतांनी नक्कीच हे मान्य केले कि , प्रेषितांचे लग्न आयेशा सिद्दिका यांचं वय सहा असतांना झाले. पण त्यांनी त्याचे स्पष्टीकरण असे दिले कि, उष्ण हवामानात मुली लवकर वयस्क होतात . जुन्या काळी लोकं लवकर वयस्क आणि शारीरिक दृष्टीने मजबूत राहत होते.[६]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Aisha". कॉलिन्स इंग्रजी शब्दकोश. हार्पर कॉलिन्स. 6 May 2019 रोजी पाहिले.
- ↑ Nadvi, Sayyad Suleman (2014). हजरत आयशा (रजि.) की जीवनी. Azamgarh: Darul-Musannefin Shibli Academy. pp. 260–270. ISBN 978-93-82201-30-4.
- ↑ Malik, Faraz (4 October 2018). "The age of Aisha (ra): Rejecting historical revisionism and modernist Presumptions". yaqeeninstitute.org.
- ↑ Ghamedi, Javed (23 June 2018). "Age of Ayesha (ra) at the time of her marriage with Prophet Muhammad (saw) by Javed Ahmad Ghamidi". www.youtube.com.
- ↑ Malik, Faraz (4 October 2018). "The Age of Aisha (ra): Rejecting Historical Revisionism and Modernist Presumptions". yaqeeninstitute.org.
- ↑ Mol, Arnold Yasin (3 October 2018). "Aisha (ra): The Case for an Older Age in Sunni Hadith Scholarship". yaqeeninstitute.org.