आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे गुण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


"आयुषः सम्बन्धी वेदः आयुर्वेदः" अशी आयुर्वेदाची व्याख्या आचार्य वाग्भट यांनी आपल्या "अष्टाङ्गहृदयं" य ग्रन्थत केली आहे. आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे - १. जो स्वस्थ असेल त्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे. २. रोग्याची रोगापासून मुक्तता करणे. यात मुख्य प्रश्न असा कि जो स्वस्थ आहे, त्याला हे रोग येतात कुठून? जर कारणच नाहीसं झालं तर रोग होणारच नाहीत. य सर्व रोगांचे मूळ कारण म्हणजे वात, पित्त आणि कफ या तिघांचा असमतोल. म्हणून यांना त्रिदोष असेही म्हणतात. या त्रिदोषांचे गुण पुढील प्रमाणे आहेत.

वाताचे गुण - "तत्र रक्षो लघुः शीतः खरः सूक्ष्मश्चलो अनिलः।

      रुक्ष म्हणजे कोरडा, लघु म्हणजे हलका, शीत म्हणजे थंड, खर म्हणजे ओबडधोबड किंवा कठोर, सूक्ष्म म्हणजे अत्यंत छोटा आणि चल म्हणजे सदा गतिशील. हा शरीरात स्थित असलेला वायू, थंडीत थंड तर गर्मीमध्ये गरम प्रतीत होतो. अर्थात जसा ऋतू असेल, वातदोषाचे लक्षणंही तसेच जाणवते. वास्तविक पाहता, वायू (अनिल) हा अनुष्णशीत आहे. म्हणजे तो ना थंड असतो ना गरम. शास्त्रात यास योगवाही असेही म्हंटले आहे. पण थंडपणाने वायू वाढतो आणि उष्णतेने कमी होतो. म्हणून आयुर्वेदानुसार वायूला शीत प्रकृतीचा, थंड प्रकृतीचा मानलं आहे. 

पित्ताचे गुण - पित्तं सस्नेहतीक्षनोष्णं लघु विस्त्रं सरं द्रव्यम्।

      थोडा स्निग्ध म्हणजे चिकटसर, तीक्ष्ण म्हणजे तिखट, उष्ण म्हणजे गरम,लघु म्हणजे हलका, सर म्हणजे पसरणारे गतिशील आणि पातळ द्रव्य आहे. सर आणि द्रव्य हे पित्ताचे गन आहेत. जेव्हा वामनक्रियेत. पित्त हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे पडते, त्याचा जो गंध असतो त्यास वस्त्र असे म्हणतात. हा गंध अतिशय अप्रिय असा असतो. 

कफाचे गुण - "स्निग्धः शीतोगुरुर्मन्दः श्लाक्ष्णो मृत्स्नः स्थिरः कफः।

     कफ हा स्निग्ध म्हणजे थोडा चिकट, शीत म्हणजे थंड प्रकृतीचा, गुरु म्हणजे जड, मंद म्हणजे हळूहळू परिणाम करणारा, श्लाक्ष्ण म्हणजे स्वच्छ किंवा साफ, स्थिर म्हणजे अचल, आणि मृत्स्न म्हणजे माती सारखा ( चिक्कण माती सारखा थोडा स्निग्ध ) असतो. 

अशा या तीन गुणांच्या कमीअधिकते मुळे शरीरात रोग बळावतात. याप्रमाणे आयुर्वेदात ( "अष्टाङ्गहृदयं मध्ये" ) , या प्रमाणे त्रिदोषांच्या गुणांचे वर्णन केले आहे.