आयना का बायना (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयना का बायना
दिग्दर्शन समित कक्कड
निर्मिती अमर कक्कड,
पुष्पा कक्कड,
समित कक्कड
कथा राजू कुष्टे,
सुचित्रा सावंत
पटकथा समित कक्कड
संवाद हेमंत एदलाबादकर,
भालचंद्र झा,
सचिन दरेकर,
प्रदीप राणे
संकलन राहुल भातणकर
छाया संजय जाधव
गीते बाबा चव्हाण,
जितेंद्र जोशी
संगीत अजित परब,
समीर म्हात्रे
नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव,
रोहन रोकडे
वेशभूषा स्वप्नील कांबळे,
दीपा आश्विन मेहता,
अनिता संझगिरी
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २९ नोव्हेंबर, इ.स. २०१२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ


आयना का बायना हा इ.स. २०१२ साली प्रदर्शित झालेला, समित कक्कड दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. हिपहॉप नृत्यशैलीतील नाचांमुळे विशेष प्रसिद्ध पावलेल्या या चित्रपटात ९ युवक नृत्यकलाकारांसोबत सचिन खेडेकर, अमृता खानविलकर, संतोष जुवेकर, राकेश बापट आणि गणेश यादव यांनी अभिनय केला आहे.

पात्रयोजना[संपादन]

कलाकार पात्राचे नाव नाते/टिप्पणी
अखिलेश विश्वकर्मा बाइक राजा
संकेत फराद जोसेफ
दिनेश कांबळे पुत्रन
राहुल कुलकर्णी
आनंद चव्हाण
प्रवीण नायर टोचन
निखिल राजे महाडिक पेले
सिद्धेश पै चुट्टन
रोहन रोकडे सॅंपल
सचिन खेडेकर हर्षवर्धन साठे बालसुधार गृहाचा मुख्याधिकारी
अमृता खानविलकर शिवानी साठे हर्षवर्धन साठे याची मुलगी
राकेश बापट सागर
गणेश यादव किशोर कदम पोलीस अधिकारी
संतोष जुवेकर स्पर्धेचा सूत्रसंचालक
जयवंत वाडकर चुट्टनचे वडील
छाया कदम चुट्टनची आई
सुलभा आर्य पुत्रनची आई

वाद[संपादन]

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर संवादलेखकांच्या श्रेयनामावलीवरून संवादलेखक सचिन दरेकर व दिग्दर्शक समित कक्कड यांच्यादरम्यान मतभेद व वाद उद्भवले [१][२]. चित्रपटाचे सर्व संवाद आपण नव्याने लिहून दिले असतानाही[१], आपल्यासह अन्य तीन संवादलेखकांचीही नावे चित्रपटाच्या श्रेयनामावलीत आहेत, असे दरेकरांचे म्हणणे होते. तर चित्रपटासाठी ज्यांनी केवळ दोन प्रसंगही लिहून दिलेले असतील, अशांचाही उल्लेख श्रेयनामावलीत आवश्यक होता, असे समित कक्कडांचे मत होते [२].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b "'आयना का बायना' संवादलेखनावरुन वाद". २५ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "'आयना का बायना', वाद काही मिटे ना!". २५ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]