आयदा अल-काशेफ
Egyptian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | जुलै १७, इ.स. १९८८ कैरो | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
वडील |
| ||
भावंडे |
| ||
| |||
![]() |
आयदा अल-काशेफ ही एक स्त्रीवादी इजिप्शियन चित्रपट निर्माती आणि अभिनेत्री आहे.[१] तिच्या अभिनय कामांमध्ये शिप ऑफ थिसियस आणि वलाद डब्ल्यू बेंट या चित्रपटांचा समावेश आहे.[२]
सामाजिक कार्य
[संपादन]अल-काशेफ २०१०-११ च्या तहरीर चौकातील निदर्शनांमध्ये सहभागी होती, जिथे तिने अरब स्प्रिंगच्या घटनांचे चित्रीकरण केले होते. ती तहरीर वर कब्जा करणाऱ्या पहिल्या निदर्शकांपैकी एक होती जिथे तिने तंबू उभारला होता.[३][४] अनेकदा स्वतःची वैयक्तिक सुरक्षा धोक्यात घालून तिने निषेधांदरम्यान झालेल्या महिलांवरील आक्रमक हल्ल्यांचे दस्तऐवजीकरण देखील केले होते.[२][५]
अल-काशेफने बनवलेले महिलांवरील लैंगिक अत्याचार करणारे पुरुषांचे चित्रपट जगभर दाखवण्यात आले आणि अल-काशेफ आणि तिच्या मैत्रिणींनी संरक्षणासाठी इलेक्ट्रिक यंत्रे आणि चाकू घेऊन लढण्याची शपथ घेतली आहे.[६] "नागरिकांसाठी लष्करी खटले नको" या निषेधात सहभागी झाल्यामुळे तिला अटक करण्यात आली आणि ताब्यात घेण्यात आले. निषेधांचा आणखी एक पैलू म्हणजे कैरोमधील झेनहोम शवागृहवर त्यांच्या प्रियजनांना शेवटचे भेटण्यासाठी छापा टाकणाऱ्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखाचे चित्रीकरण करण्यात तिचा सहभाग होता.[७]
चित्रपट
[संपादन]२००८ मध्ये अल-काशेफने रॅप्सोडी इन ऑटम नावाचा एक लघुपट बनवला होता. अल-काशेफने २०१२ मध्ये आलेल्या हिंदी/इंग्रजी भारतीय चित्रपट शिप ऑफ थिसियस मध्ये काम केले होते, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन आनंद गांधी यांनी केले होते. त्यात नीरज काबी आणि सोहम शाह यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ती एका इजिप्शियन छायाचित्रकाराची भूमिका साकारत आहे, जी दृष्टीदोष आहे. कॉर्निया प्रत्यारोपणानंतर तिची दृष्टी परत येते. पण आता तिला तिच्या नवीन दृष्टीशी जुळवून घेण्यात अडचण येत आहे आणि त्यामुळे तिच्या छायाचित्रणाशी ती असमाधानी आहे. २००८ मध्ये अम-काशेफ आणि दिग्दर्शन आनंद गांधी यांची भेट हॅनोव्हर चित्रपट महोत्सवात झाली होती, जेथे अल-काशेफचा रॅप्सोडी इन ऑटम प्रदर्शित होत होता. त्यांनी सोबत अजून कही काम केले व नंतर गांधींनी अल-काशेफला ही भूमीका साकारण्यास दिली. चित्रपट प्रसिद्धीआधी अल-काशेफ इजिप्टमध्ये निषेध करत असताना भारतात शिप ऑफ थिसियसच्या प्रमोशनला चुकली.[८] २०१४ मध्ये, एल-काशेफला शिप ऑफ थिसियसमधील तिच्या भूमिकेसाठी भारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधून सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.[९] सोबतच तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणचा स्क्रीन पुरस्कार देखील मिळाला.[१०][११] २०१२ मध्ये शिप ऑफ थिसियसमधील तिच्या भूमिकेसाठी तिने दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मुहर आशिया आफ्रिका फीचर श्रेणीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.[१२]
संदर्भ
[संपादन]- ^ Salem, Mostafa; Ashraf, Fady; Gulhane, Joel (26 November 2013). "NoMilTrials Protest Dispersed; Prominent Activists Detained". Daily News Egypt. 23 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ a b Devi Dundoo, Sangeetha (19 July 2013). "'It's our revolution too'". The Hindu. 5 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 October 2016 रोजी पाहिले.
- ^ Scott, A.O. (24 October 2013). "Brave Optimism of Tahrir Square Meets Other Fierce Forces". The New York Times. 25 January 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Gohar, Anicee (19 February 2014). "Egypt — Looking for a Conscience". Inter Press Service. 16 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Mullender, Rosie (12 June 2013). "The Female Fightback". Cosmopolitan. Hearst Magazines UK. 23 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Ward, Clarissa (27 March 2013). "Egyptian Women Fight Back as Sexual Assaults Skyrocket". CBS Evening News. 16 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ Fathi, Yasmine (2 September 2013). "Guardians of the Betrayed Dead: Inside Cairo's Zeinhom Morgue". Ahram Online. 16 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Egyptian-Based Actress Aida El Kashef to Visit India for Ship of Theseus". Indiaglitz. 13 July 2013. 13 August 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "'Ship of Theseus' Wins Indian National Film Award". Variety. 16 April 2014. 16 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "The 20th Annual Screen Awards 2014 Nominations". Screen Awards. Indian Express Limited. 11 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "The 20th Annual Screen Awards 2014 Winners". Screen Awards. Indian Express Limited. 21 January 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Egyptian Stars Win Big at Dubai Film Fest". Albawaba English. 17 December 2012. 24 July 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.