आयझॅक किहीमकर
आयझॅक किहीमकर हे निसर्गातील फुलपाखरांचे निरीक्षण करणारे आणि त्यांच्या नोंदी करणारे एक अभ्यासक होते आणि निसर्ग संवर्धन तज्ञ होते आणि त्या विषयांवर लेखन करणारे लेखक होते.
बालपण
[संपादन]त्यांचा जन्म मुंबई त झाला आणि लहानपण गोवंडी येथे गेले. त्यांचे बाबा त्यांना मुंबईतील पदपथावर असलेल्या पुस्तक विक्रेत्यांकडून प्राणी आणि त्यांची चित्रे असलेली आणि तत्सम पुस्तके आणून देत असत.त्याकाळी काही ठिकाणी मुंबईत शेती केली जात असे. उन्हाळ्यात त्या ठिकाणी उघड्या शेतात ते सवंगड्यांसोबत क्रिकेट खेळत असत. लहानपणीच वडिलांनी त्यांना एक कँमेरा आणून दिला होता आणि त्यामुळे त्यांना निसर्गातील छायाचित्रे घेण्याचा छंद लागला.पावसाळ्यात ते स्थानिक मच्छिमार समाजातील मुलांबरोबर मासे आणि खेकडे पकडत असत आणि ते खेकडे व मासे पाळत असत.पावसाळ्यात अनेकदा ते शाळेला न जाता बेडूक, मासे, आणि फुलपाखरे पकडत असत.साहजिकच त्यांना निसर्गाबद्दल एक आगळीवेगळी गोडी लागली.
तरुणपण व शिक्षण
[संपादन]त्यांनी मुंबई येथील एस आय ई एस ह्या महाविद्यालयातून राज्यशास्त्र आणि मानसशास्त्र ह्या विषयांत पदवी घेतली आणि एका सौंदर्य प्रसाधनांच्या कंपनीत नोकरी पकडली. तिथे ते विक्री विभागात काम करीत होते. पुढे त्यांना बी एन एच एस या संस्थेने भरविलेल्या सर्प प्रदर्शनात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याच संस्थेत त्यांना कमी पगारावर नोकरी करण्यासाठी बोलावले. तेव्हा समाधान आणि आनंद देणारी नोकरी असल्याने त्यांनी आपली जास्त पगाराची नोकरी सोडून बीएनएचएस मध्ये ग्रंथालय सहाय्यक म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.
कारकीर्द
[संपादन]बीएनएचएस मध्ये त्यांना भरपूर पुस्तके वाचावयास मिळाली आणि निसर्ग संवर्धन व लेखन क्षेत्रातील मान्यवर लोकांचा सहवास लाभला. डॉ.सलीम अली चा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षण आणि संशोधन आणि त्यावर लेखन करण्यासाठी प्रेरणा मिळाली.लेखक व्यंकटेश माडगूळकर हे त्यांच्या सत्तांतर ह्या पुस्तकाचे लेखन करीत असताना माकडांबद्दल माहिती मिळवण्यासाठी बीएनएचएस संस्थेत येत असत.बिट्टू सहगल हे सँक्युअरी एशिया चे संपादक असताना त्यांनी किहीमकर ह्यांना फुलपाखरांवर संशोधन करण्यासाठी प्रेरणा दिली. फुलपाखरे ह्या विषयावर निरीक्षण आणि संशोधन करून त्यांनी खालील पुस्तके लिहिली.
- कॉमन बटरफ्लाइज ऑफ इंडिया-इसवी सन १९९२.डब्ल्यू डब्ल्यू एफ इंडिया साठी.
- द बुक ऑफ इंडियन बटरफ्लाइज इसवी सन २००८ बीएनएचएस साठी.
त्यांनी फुलपाखरे निरीक्षण करण्यासाठी ताबो,हिमाचल प्रदेश-अपोलो फुलपाखरू, आणि ईशान्येकडील जंगलात जळवा, रानटी हत्ती वगैरे ह्यांच्या अडथळ्यांना तोंड देऊन इतर अनेक फुलपाखरे शोधण्यासाठी प्रवास केला. [१]
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, सोमवार,३० जून २०२५