आयएसएसएन

आंतरराष्ट्रीय मानक क्रमिक क्रमांक तथा आयएसएसएसएन हा आठ अंकी संख्यात्मक कोड नियतकालिकांची (मासिक, जर्नल किंवा वृत्तपत्र) नेमकी ओळख प्रस्थापित करण्यासाठी वापरला जातो.[१] एकच नावाच्या अनेक नियतकालिकांमधील फरक कळण्यासाठी याचा वापर होतो. नियतकालिकांच्या मागणी‑व्यवस्थापन, वर्गीकरण, ग्रंथालयांमधील परस्पर देवाणघेवाण तसेच इतर ग्रंथालयशास्त्रीय प्रक्रियांमध्ये आयएसएसएसएनचा व्यापक वापर केला जातो.[२]
आयएसएसएन प्रणाली १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना (आयएसओ) आंतरराष्ट्रीय मानक म्हणून तयार करण्यात आली आणि १९७५ मध्ये आयएसओ ३२९७ म्हणून प्रकाशित करण्यात आली. [३] याचे व्यवस्थापन आयएसओ उपसमिती टीसी ४६/एससी ९ करते.
संकेताचे प्रारूप
[संपादन]हा आठ अंकी संकेत '-' जोडचिह्नाने दोन चार-अंकी संख्यांमध्ये विभागला जातो. [४] शेवटचा अंक ०-९ किंवा X असतो. हा शेवटचा अंक पहिल्या सात अंकांवरून ठरतो आणि त्याने पूर्ण संकेताचा आकडा वैध असल्याचे कळते. प्रत्येक नियतकालिकाला त्यांचा संकेत आयएसएसएन राष्ट्रीय केंद्रांच्या जाळ्याद्वारे दिले जातात. अशी केन्द्रे देशाच्या राष्ट्रीय ग्रंथालयांमध्ये असतात. पॅरिसमधील आयएसएसएन आंतरराष्ट्रीय केंद्र ) यांचे समन्वयन करते. हे आंतरराष्ट्रीय केन्द्र १९७४मध्ये युनेस्को आणि फ्रेंच सरकार यांच्यातील कराराद्वारे स्थापन झालेली एक आंतरसरकारी संस्था आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "What is an ISSN?". Paris: ISSN International Centre. 16 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 July 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Collection Metadata Standards". British Library. 15 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 July 2014 रोजी पाहिले.
- ↑ "Collection Metadata Standards". British Library. 15 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 14 July 2014 रोजी पाहिले.
- ↑ "What is an ISSN?". ISSN International Centre. 16 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 July 2014 रोजी पाहिले.