आमिष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आमिष म्हणजे एखाद्या प्राण्याने विशिष्ट अपेक्षित कृती करावी व सापळ्यात अडकावे म्हणुन देण्यात येणारे एक प्रकारचे प्रलोभन आहे. शक्यतोवर त्या यासाठी एखादे खाद्य वा जिवंत प्राणी आमिष म्हणुन ठेवले जाते.वाघ वा सिंह पिंजऱ्यात पकडण्यासाठी बकरीचे आमिष ठेवण्यात येते.तसेच मासा गळाला लागावा म्हणुनही त्यात आमिष अडकविण्यात येते.उंदीर पिंजऱ्यात अडकावा म्हणुन पिंजऱ्यात तुप लावलेली पोळी ठेवण्यात येते.गैरकानुनी काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तिस आर्थिक आमिष दाखविण्यात येते. एखाद्याने स्पर्धा जिंकावी म्हणुन त्यास बक्षिसाचे आमिष दाखविण्यात येते.