आप्पा जळगावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

अप्पासाहेब जळगावकर हे एक प्रसिद्ध हार्मोनियमवादक होते. त्यांनी अनेक कलाकारांच्या गायनात संवादिनीची संगत केली आहे. हे 'आप्पा' या टोपण नावाने ओळखले जात.

आप्पा जळगांवकर ऊर्फ सखाराम प्रभाकर जळगावकर (जन्म : जळगाव-जालना, १ जानेवारी १९२२; मृत्यू : पुणे, १६ सप्टेंबर २००९) हे हार्मोनिअमवर लीलया फिरणार्‍या बोटांनी स्वरास्वरांतून सुगंध भरणारे हार्मोनियमवादक होते.

आप्पा एक वर्षाचे असतानाच मातापित्यांचे छत्र हरपल्याने त्याच गावातील प्रभाकरबुवा यांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचा सांभाळ केला. कौटुंबिक जीवन त्यांना फारसे मिळाले नाही. स्थानिक मठात त्यांना आसरा मिळाला. सतत कष्ट, संघर्ष यांचा सामना करत त्यांनी आपली संगीताची आवड जोपासली. बाळकृष्णबुवा चिखलीकर, उस्ताद शब्बू खॉं यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. प्रथम त्यांना क्‍लॅरोनेट तसेच व्हायोलिनवादनात रुची होती. नंतर मात्र हार्मोनिअम (म्हणजे बाजाची पेटी किंवा संवादिनी) हेच त्यांचे सर्वस्व बनले.

पुण्यात आल्यावर आप्पांचे दिवस पालटले. पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, पं. कुमार गंधर्व, पं. जसराज, किशोरी आमोणकर, माणिक वर्मा यांच्याशिवाय रोशनआरा बेगम, उस्ताद आमीर खॉं, बडे गुलाम अली अशा बुजुर्ग कलाकारांच्या साथीचा योग त्यांना मिळाला. गायकी अंगाने वादन हे आप्पांच्या संगीतसाथीचे केंद्र होते. केवळ गायनसाथीपुरते स्वतःला मर्यादित न ठेवता आप्पांनी आपले वादन "बहुविध पैलू'चे बनवले. त्यामुळेच पं. किशन महाराज, उस्ताद थिरकवॉं, हबीबुद्दीन, निजामुद्दीन खॉं, पं. सामता प्रसाद, उस्ताद अल्लारखॉं यांच्यासारख्या मान्यवर तबलावादकांनाही आप्पांची साथ हवीहवीशी वाटे.

नृत्य क्षेत्रात आप्पांनी ज्येष्ठ कथक नृत्यांगना रोहिणी भाटे व पं. बिरजू महाराज यांच्यासह कित्येकांना अनेक वर्षे साथ केली. तसेच स्वतंत्र हार्मोनिअमवादनाचे कार्यक्रमही आप्पा करीत. साथसंगतीच्या निमित्ताने आप्पांनी अनेक परदेशदौरे केले आणि विदेशी रसिकांचीही दाद मिळवली.

आप्पांच्या आठवणी आणि हार्मोनिअमवादनाविषयीचे विचार "सूर गवसलेली साथ' या पुस्तकात भारत गजेंद्रगडकर यांनी संकलित केले आहेत. आप्पांच्या वादनाच्या तसेच साथसंगतीच्या अनेक ध्वनिफिती आणि सीडी प्रकाशित झाल्या आहेत.

मरणापूर्वीची दहा वर्षे आप्पा अर्धांगवायूने आजारी होते. तरीही एका हाताने ते हार्मोनियमवादन करत असत आणि शिष्यमंडळी भाता वाजवत असत. त्यांचे शिष्य सुरेश फडतरे आणि हनुमंत फडतरे त्यांची सेवाशुश्रूषा त्यांच्या घरी राहून करत असत.

त्यांच्या मागे त्यांनी निर्माण केलेला मोठा शिष्यपरिवार आहे.

पुरस्कार[संपादन]

  • संगीत नाटक अकादमीने हार्मोनिअम क्षेत्रातला पहिला सन्मान आप्पांना देऊन त्यांचा गौरव केला होता.
  • अनंत भालेराव स्मृति पुरस्कार (२०११)
  • आप्पांच्या पत्‍नी म्हणजे किराणा घराण्याच्या लीलाताई जळगावकर (मृत्यू २२-४-१९९८) त्यांच्या स्मृत्यर्थ आप्पांनी "गानवर्धन'तर्फे पुरस्कार देण्याचा उपक्रम सुरू केला होता. ही संस्था आप्पांच्या नावाचा पुरस्कारही देते.

गानवर्धनतर्फे अप्पासाहेब जळगावकर स्मृती स्वर-लय-रत्‍न पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती[संपादन]

  • हार्मोनियमवादक पं. चिमोटे (२००९)
  • संवादिनीवादक पं. विश्‍वनाथ कान्हेरे (२०१०)
  • संवादिनीवादक आणि गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद मराठे (२०११)
  • संवादिनीवादक सुधीर नायक (२०१४)
  • हार्मोनियमवादक सीमा शिरोडकर (२०१६)