Jump to content

आधारभूत संरचना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आधारभूत संरचना ( इंग्लिश: infrastructure) किंवा पायाभूत सुविधा म्हणजे देश, प्रदेश इत्यादींना सेवा देणाऱ्या मूलभूत सुविधा आणि प्रणाली ज्या त्या क्षेत्रातील आर्थिक कामकाज आणि सामाजिक विकास सुरळीत चालण्यासाठी आवश्यक आहेत. उदाहरणार्थ, रस्ते, रेल्वे, पूल, बोगदे, पाणीपुरवठा यंत्रणा, गटार यंत्रणा, पॉवर ग्रीड्स आणि इतर सर्व यंत्रणा आणि सुविधा ज्या या क्षेत्रातील जीवनमान सुधारण्यात मूलभूत भूमिका बजावतात.