Jump to content

आदिल जैनुलभाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदिल जैनुलभाई
शिक्षण आयआयटी मुंबई
हार्वर्ड बिझनेस स्कूल
पेशा नेटवर्क१८चे अध्यक्ष
भारतीय गुणवत्ता परिषदचे अध्यक्ष (QCI)
चेरमन ऑफ कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन (सीबीसी)


आदिल जैनुलभाई हे नेटवर्क१८ ग्रुपचे अध्यक्ष आहेत.[] ही रिलायन्स इंडस्ट्रीजची मास मीडिया उपकंपनी आहे.[] ते २०१४ पासून क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (क्यु सी आय) चे अध्यक्ष देखील आहेत.[][] त्यांची "मिशन कर्मयोगी" प्रकल्पासाठी सरकारने स्थापन केलेली क्षमता निर्माण आयोग (सी बी सी) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.[][] जैनुलभाई रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो आणि सिप्ला यांच्या बोर्डावर स्वतंत्र संचालक म्हणून काम्आ करत आहेत.[] तसेच ते वॉशिंग्टन, डी.सी. स्थित यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे सदस्य आहेत.[]

आदिल जैनुलभाई यांनी आयआयटी मुंबईमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यांनी व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीसाठी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सल्लागार मंडळात स्थान देण्यात आले होते. ते भारतातील हार्वर्ड बिझनेस स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आदिल जैनुलभाई १९७९ मध्ये युनायटेड स्टेट्समध्ये मॅकिन्से अँड कंपनीत रुजू झाले जेथे त्यांनी कंपनीच्या वॉशिंग्टन कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी मिनीयापोलिस कार्यालय सुरू केले. स.न. २००४ मध्ये, मॅकिन्से इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते भारतात परतले. कंपनीमध्ये, ते कंपनीचे पहिले परदेशी जन्मलेले प्रमुख रजत गुप्ता यांच्याशी जवळून संबंधित होते आणि त्यांचे आश्रयस्थान होते. जैनुलभाई यांनी २०१२ मध्ये मॅकिन्सेचा राजीनामा दिला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "I think once the trend reverses itself, it reverses for the better, says Arun Jaitley". Livemint (इंग्रजी भाषेत). 2017-12-06. 2021-06-14 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Network 18 shelves cartoonist Manjul's contract". The Telegraph (India). 12 June 2021. 2021-06-14 रोजी पाहिले.
  3. ^ a b c "Adil Zainulbhai: The makeover man". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2014-09-20. 2021-06-14 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Centre embarks on major reform drive in bureaucracy and civil services". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 2021-04-02. ISSN 0971-751X. 2021-06-14 रोजी पाहिले.
  5. ^ "Capacity Building Commission formed, Adil Zainulbhai appointed as chairman". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2021-04-02. 2021-06-14 रोजी पाहिले.
  6. ^ "QCI Chairman Adil Zainulbhai, others join USISPF Board". Business Standard (इंग्रजी भाषेत). 2019-05-20. 2021-06-14 रोजी पाहिले.