आदिनाथ हरवंदे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


आदिनाथ हरवंदे हे क्रीडाविषयक पुस्तके लिहिणारे एक मराठी लेखक आहेत.

हरवंदे हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील जांभारी गावचे असून ते 'औद्योगिक विकास व गुंतवणूक महामंडळात' एकतीस वर्षे कामास होते. ते जनसंपर्क विभाग प्रमुख या पदावरून २००२ साली निवृत्‍त झाले. त्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रमुख नियतकालिके आणि दिवाळी अंक यांमध्‍ये १९७५ पासून सातत्‍याने लेखन केले. क्रीडा क्षेत्र त्‍यांच्‍या विशेष आवडीचे. क्रिकेट परीक्षणासाठी त्‍यांनी देशांतर्गत आणि देशाबाहेर अनेक दौरे केले.

त्यांच्या पत्नीचे नाव गीता. त्यांनीही 'सॊळा संस्कार', 'श्रीकृष्ण स्थलयात्रा' नावाची काही धार्मिक/प्रवासवर्णात्मक पुस्तके आणि आवर्तन नावाची कादंबरी लिहिली आहे.

आदिनाथ हरवंदे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय क्रिकेट
 • खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी
 • चौसष्‍ट घरांचा बादशहा - विश्‍वनाथ आनंद
 • जिगीषा (कादंबरी)
 • धावपटू
 • लालबाग (कादंबरी, २०१३ साली ३री आवृत्ती)
 • विश्‍वचषक क्रिकेटचा जल्‍लोष
 • स्वकुळ साळी ज्ञातिगृह, श्रीक्षेत्र आळंदी : गौरवशाली इतिहास (संपादन)

आदिनाथ हरवंदे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • अखिल भारतीय बालकुमार साहित्य परिषदेचा बालवाङ्मय पुरस्कार. (२ सप्टेंबर २०१२)
 • सचिन तेंडुलकर याच्‍या हस्‍ते 'ज्‍येष्‍ठ क्रीडा पत्रकार' हा पुरस्‍कार
 • 'जिगीषा'ला कोकण मराठी साहित्य परिषदेचा 'र. वा. दिघे स्मृती' पुरस्कार (डिसेंबर २०१६)
 • ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचा ललित विभागातील पुरस्कार आदिनाथ हरवंदे यांच्या ‘जिगिषा’ आणि क्षितिज कुलकर्णी यांच्या ‘चिंब’ या कादंबऱ्यांना विभागून देण्यात आला.(१ जून २०१५)
 • मार्च २०१७मध्ये पुण्यात झालेल्या अखिल भारतीय स्वकुल साळी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद