आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज (English: Acharya Tushar Bhosale or Turiyananda Maharaj ) हे वारकरी संप्रदायातील ख्यातनाम कीर्तनकार आहेत.
आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज | |
मूळ नाव | तुषार शालिग्राम भोसले |
जन्म | 16 नोव्हेंबर 1990 नाशिक |
उपास्यदैवत | विठ्ठल |
संप्रदाय | वारकरी संप्रदाय |
गुरू | जगन्नाथ महाराज पवार |
भाषा | मराठी भाषा |
साहित्यरचना | सत्संग, लेखक |
कार्य | प्रवचन, कीर्तन |
संबंधित तीर्थक्षेत्रे | पंढरपूर आळंदी पैठण |
व्यवसाय | प्रवचनकार, कीर्तनकार,बांधकाम व्यावसायिक,राजकारणी |
वडील | श्री.शालिग्राम पितांबर भोसले |
आई | विमलदेवी |
पत्नी | प्रिया |
विशेष माहिती | अद्वैत वेदान्त, ब्रम्हसूत्रभाष्य, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवद्गीता, यांचा गाढा अभ्यास |
आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज हे अद्वैत वेदान्ताचे गाढे अभ्यासक, तसेच उपनिषदे,ब्रम्हसूत्रभाष्य आणि ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, श्रीमद्भगवतगीता अशा श्रेष्ठ ग्रंथाचे अभ्यासक असून नामवंत युवा कीर्तनकार आहेत. ते काव्यतीर्थ आचार्य वेदान्तवाचस्पति जगन्नाथ महाराज पवार यांचे पट्टशिष्य आहेत.
आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज हे बी.ई.मेकॅनिकल आणि एम.ए (संस्कृत) असे उच्चविद्याविभूषित असून भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक (सरचिटणीस) आहेत.
अनुक्रमणिका
पदवीसंभार[संपादन]
विश्वविक्रमवीर - अखंड 365 दिवस व्याख्याने देण्याचा विश्वविक्रम. गोखले एज्युकेशन सोसायटी,नाशिक द्वारा सन 2007 मध्ये सन्मानित
शास्त्री - भारतीय विद्या भवन,मुंबई द्वारा सन 2012 मध्ये सन्मानित.
आचार्य - भारतीय विद्या भवन,मुंबई द्वारा सन 2014 मध्ये सन्मानित.
साहित्यसंपदा[संपादन]
आचार्य तुषार भोसले तथा तुरियानंद महाराज यांचे द्वारा लिखित व प्रकाशित साहित्य -
1) वक्त्यांनो तुमच्या वक्तृत्वासाठी ( वयाच्या 15 व्या वर्षी लिखित)
2) वेदानंद चरित्रामृत
3) पिंपळपान
4) सुवर्ण सौरभ
पदभार[संपादन]
अध्यक्ष - आचार्य श्री.ज.स.पवार श्री ज्ञानेश्वरी वाग्यज्ञ प्रतिष्ठान, नाशिक. देवगिरी चॅरिटेबल ट्रस्ट.
प्रदेश सहसंयोजक - भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी, महाराष्ट्र प्रदेश.
व्यक्तिगत जीवन[संपादन]
आचार्य तुषार भोसले हे दि. 21 नोव्हेंबर 2016 रोजी साक्री,धुळे येथील सौ.इंदुमती व श्री.देविदास माधवराव पाटील यांची कन्या "प्रिया" यांचेशी नाशिक येथे विवाहबद्ध झाले.