Jump to content

आग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वणवा

अग्नी ही ज्वलन या उष्माक्षेपी (उष्णता निर्माण करणाऱ्या) रासायनिक प्रक्रियेद्वारे इंधनाचे जलद ऑक्सिडीकरण होण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत उष्णता, प्रकाश आणि विविध अभिक्रिया उत्पादने निर्माण होतात.[][a]

ज्वाला हा अग्नीचा सर्वाधिक दृश्यमान भाग असून, इंधन त्याच्या प्रज्वलन बिंदू (Ignition point) तापमानापर्यंत पोहोचल्यावर होणाऱ्या ज्वलन अभिक्रियेमुळे त्या निर्माण होतात. हायड्रोकार्बन इंधनांच्या ज्वाला प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड, जलवाष्प, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांनी बनलेल्या असतात. तापमान पुरेसे जास्त असल्यास हे वायू आयनीकृत होऊन प्लाझ्मा तयार करू शकतात.[] ज्वालेचा रंग आणि तिची तीव्रता वापरल्या जाणाऱ्या इंधनाच्या प्रकारावर आणि सभोवतालच्या वायूंच्या संघटनावर अवलंबून असते.[]

अग्नीच्या सर्वसाधारण स्वरूपात मोठ्या प्रमाणावरील वणवा (Conflagration) निर्माण होण्याची क्षमता असते, ज्यामुळे कायमस्वरूपी भौतिक नुकसान होऊ शकते. अग्नीचा जगभरातील स्थलाधारित परिसंस्थांवर थेट परिणाम होतो. अग्नीचे काही फायदेही आहेत; तो वनस्पतींच्या वाढीस चालना देतो आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करतो. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे जीवित व मालमत्तेची हानी, वातावरणाचे प्रदूषण आणि जलप्रदूषण.[] अग्नीमुळे संरक्षक वनस्पती आच्छादन नष्ट झाल्यास मुसळधार पावसामुळे मृदाक्षरण होऊ शकते.[] वनस्पती जळल्यामुळे त्यांतील नायट्रोजन वातावरणात सोडला जातो; परंतु पोटॅशियम आणि फॉस्फरस यांसारखी इतर पोषकतत्त्वे राखेत राहतात आणि लवकरच पुन्हा मातीत मिसळली जातात.[][] नायट्रोजनच्या या नुकसानीमुळे जमिनीची सुपीकता दीर्घकाळासाठी कमी होते. तथापि, नायट्रोजन स्थिरीकरण करणाऱ्या वनस्पतींमुळे—उदा. क्लोव्हर, वाटाणा आणि शेंग यांसारख्या कृषी महत्त्वाच्या पिकांमुळे—तसेच प्राण्यांचा मलमूत्र, मृतदेहांचे विघटन आणि वीज यांसारख्या नैसर्गिक घटनांमुळे नायट्रोजनची भरपाई होऊ शकते.

अग्नी हा चार पारंपरिक तत्त्वांपैकी एक मानला जातो. मानवाच्या इतिहासभर अग्नीचा स्वयंपाक, उष्णता व प्रकाश निर्माण करणे, शेतीसाठी जमीन साफ करणे, संकेत देणे, प्रणोदन((propulsion)), धातुवितळन, धातुघडण, कचऱ्याचे भस्मीकरण, दाहसंस्कार, धार्मिक विधी, शस्त्रनिर्मिती आणि युद्धातील विध्वंस अशा अनेक उद्देशांसाठी वापर केला गेला आहे.

अग्नी रोखण्यासाठी, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी, त्याचा परिणाम कमी करण्यासाठी आणि तो विझवण्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि उपाययोजना विकसित करण्यात आल्या आहेत. या कार्यात व्यावसायिक अग्निशामक (Firefighters) महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, घरांमध्ये लागणाऱ्या बहुतांश आगी निष्काळजीपणे स्वयंपाक करताना लागतात, तर सिगारेट हेही एक प्रमुख कारण आहे. धूर संवेदक (Smoke detectors) आणि अग्निशामक स्प्रिंकलर प्रणाली (Fire sprinkler systems) यांमुळे घरगुती आगीमुळे होणारी हानी मोठ्या प्रमाणात कमी होते.[]

संदर्भ

[संपादन]

नोंदी

[संपादन]
  1. गंजणे किंवा पचन यांसारख्या संथ ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रिया या व्याख्येत समाविष्ट केलेल्या नाहीत.
  1. "Glossary of Wildland Fire Terminology" (PDF). National Wildfire Coordinating Group. October 2007. p. 70. 2008-08-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2008-12-18 रोजी पाहिले. Invalid |url-status=deviated (सहाय्य)
  2. Fukuyama, Takao; Mukai, Nodoka; Togawa, Gaku (1 November 2019). "Dynamic behaviours of a flame as plasma in a strong electric field". Scientific Reports. 9 (1): 15811. Bibcode:2019NatSR...915811F. doi:10.1038/s41598-019-50537-x. hdl:10069/39515. PMC 6825191. PMID 31676808.
  3. "Flame Colors as Chemical Indicators". 2014-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-04-01 रोजी पाहिले.
  4. Lentile, Leigh B.; Holden, Zachary A.; Smith, Alistair M. S.; Falkowski, Michael J.; Hudak, Andrew T.; Morgan, Penelope; Lewis, Sarah A.; Gessler, Paul E.; Benson, Nate C (2006). "Remote sensing techniques to assess active fire characteristics and post-fire effects". International Journal of Wildland Fire. 3 (15): 319–345. doi:10.1071/WF05097. S2CID 724358.
  5. Morris, S. E.; Moses, T. A. (1987). "Forest Fire and the Natural Soil Erosion Regime in the Colorado Front Range". Annals of the Association of American Geographers. 77 (2): 245–54. doi:10.1111/j.1467-8306.1987.tb00156.x. ISSN 0004-5608.
  6. "SCIENCE WATCH; Burning Plants Adding to Nitrogen". The New York Times (इंग्रजी भाषेत). 1990-08-14. ISSN 0362-4331. 2024-05-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-11-02 रोजी पाहिले.
  7. "How Do Wildfires Affect Soil? - Applied Earth Sciences" (इंग्रजी भाषेत). 2019-11-12. 2024-05-27 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-11-02 रोजी पाहिले.
  8. Al-Hajj, S.; et al. (2022). "Interventions for preventing residential fires in vulnerable neighbourhoods and Indigenous communities: A systematic review of the literature". International Journal of Environmental Research and Public Health. 19 (9): 5434. doi:10.3390/ijerph19095434. PMC 9100970 Check |pmc= value (सहाय्य). PMID 35564830 Check |pmid= value (सहाय्य).