Jump to content

आंद्रे एसिपेंको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंद्रे एवगेन्येविच एसिपेंको या पानावरून पुनर्निर्देशित)
आंद्रे एसिपेंको
२०२३ च्या ग्रँड स्विस स्पर्धेत एसिपेंको
पूर्ण नाव आंद्रे एवगेन्येविच एसिपेंको
देश रशिया रशिया (२०२२ पर्यंत)
फिडे (२०२२ पासून)
जन्म २२ मार्च, २००२ (2002-03-22) (वय: २३)
नोव्होचेरकास्क, रशिया
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २६९८ (क्र. ३४) (डिसेंबर २०२५)
सर्वोच्च गुणांकन २७२३ (मार्च २०२२)

आंद्रे एवगेन्येविच एसिपेंको (जन्म: २२ मार्च २००२) हा एक रशियाई बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. त्याने २०१२ मध्ये युरोपियन यू-१० बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा आणि २०१७ मध्ये युरोपियन यू-१६ आणि जागतिक यू-१६ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा जिंकले.

बुद्धिबळ कारकीर्द

[संपादन]

जानेवारी २०१९ मध्ये एसिपेंकोने टाटा स्टील चॅलेंजर्समध्ये भाग घेतला आणि ८½/१३ (+५–१=७) सह दुसरे स्थान पटकावले.[]

जानेवारी २०२१ मध्ये एसिपेंकोने टाटा स्टील मास्टर्समध्ये भाग घेतला. आठव्या फेरीत, त्याने विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला त्याच्या पहिल्या क्लासिकल सामना भेटीत हरवले व ८/१३ सह स्पर्धेत एकूण तिसरे स्थान पटकावले.[] २०२१ च्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या चौथ्या फेरीत, क्लासिकल खेळ आणि रॅपिड टायब्रेकमध्ये बरोबरी झाल्यानंतर, एसिपेंकोने त्यांच्या ब्लिट्झ टायब्रेकरमध्ये ग्रँडमास्टर डॅनिल दुबोव्हचा पराभव केला. त्यानंतर ब्लिट्झ टायब्रेकदरम्यान मॅग्नस कार्लसनने त्याला स्पर्धेच्या पाचव्या फेरीत बाद केले.

२०२३ मध्ये त्याने ग्रँड स्विस स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेदरम्यान त्याने व्हिन्सेंट काईमर आणि परहम मगसूदलू या उत्तम ग्रॅंडमास्टरांचा पराभव केला, परंतु शेवटच्या फेरीत अनिश गिरी कडून पराभूत झाल्यानंतर तो ७.५/११ सह तिसऱ्या स्थानावर राहिला. तो फक्त एका स्थानाने कँडिडेट्स स्पर्धेसाठी अपात्र ठरला.[]

डिसेंबर २०२४ मध्ये, एसिपेंकोने अंतिम फेरीत अर्जुन एरिगाईसीला बरोबरीत रोखल्यानंतर कतार मास्टर्स जिंकले, ७.५/९ गुणांसह एकमेव प्रथम क्रमांक पटकावला.[]

नोव्हेंबर २०२५ मध्ये, त्याने बुद्धिबळ विश्वचषकामध्ये भाग घेतला, जिथे तो पौया इदानी, निजात अबासोव, अलेक्झी ग्रेब्नीव, व्हिन्सेंट काईमर आणि सॅम शँकलँड यांना पराभूत करून उपांत्य फेरीत पोहोचला. उपांत्य फेरीत वेई यीने त्याला टायब्रेकमध्ये पराभूत केले, परंतु तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात तो पोहोचला, जिथे त्याने नोदिरबेक याकुब्बोएव्हला हरवले आणि या प्रकारे २०२६ कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ मॅक्गोर्टी, कोलिन (२०१९-०१-२८). "Tata Steel 2019, 13: Carlsen's Magnificent Seven". चेस.२४.
  2. ^ डॉगर्स, पीटर (२०२१-०१-२५). "Tata Steel Chess 2021: Esipenko Shocks Carlsen as Firouzja Grabs Sole Lead". चेस.कॉम.
  3. ^ शहीद, अहमद (२०२२-११-०६). "Victory for Valiant Vidit Gujrathi and R Vaishali at FIDE Grand Swiss 2023, Qualify to the Candidates 2024". चेसबेस इंडिया.
  4. ^ डॉगर्स, पीटर (२०२४-१२-१२). "Esipenko Wins Qatar Masters; Arjun Misses Chance To Catch Caruana In FIDE Circuit". चेस.कॉम (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "Tournament Bracket". worldcup2025.fide.com. २०२५-११-२६.