Jump to content

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक संघटन विमानतळ संकेत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
código de aeropuertos de OACI; Coduri de aeroport ICAO; بین الاقوامی شہری ہوا بازی تنظیم ہواگاہ رموز; код аеропорту ІКАО; 國際民航組織機場代碼; 国际民航组织机场代码; ICAO aeroport kodi; flughavena kodo de ICAO; ICAO kód; Kódigo di aeropuerto di ICAO; আইসিএও বিমানবন্দর কোড; code OACI des aéroports; ICAO aerodromski kodovi; 国际民航组织机场代码; आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक संघटन विमानतळ संकेत; ICAO valstu un teritoriju kodi; 国际民航组织机场代码; ICAO-flyplasskode; ICAO-flyplasskode; Kode palabuan udara ICAO; ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಗರಿಕ ವಿಮಾನಯಾನ ಸಂಸ್ಥೆ - ವಿಮಾನನಿಲ್ದಾಣ ಕೋಡ್; ICAO airport code; رمز مطار منظمة الطيران المدني الدولي; 國際民航組織機場代碼; ICAO-repülőtérazonosító; Aireportuen NAZE kodea; códigu d'aeropuertos d'OACI; Код аэропорта ИКАО; ICAO-Flughafencode; Kodi i aeroportit ICAO; ԻԿԱՕ օդանավակայանի կոդ; 國際民航組織機場代碼; აეროპორტის კოდი იკაო; ICAO空港コード; رمز مطار منظمه الطيران المدنى الدولى; קוד ICAO; अन्तर्राष्ट्रीय नागर विमानन संगठन विमानक्षेत्र कोड; 国际民航组织机场代码; ICAO-lentopaikkakoodi; Còdes aeropòrt ICAO; பன்னாட்டு குடிசார் வான்பயண அமைப்பு வானூர்தி நிலையக் குறியீடு; codice aeroportuale ICAO; 國際民航組織機場代碼; 國際民航組織機場代碼; 国际民航组织机场代码; kod lotniska ICAO; código aeroportuário ICAO; Internaitional Ceevil Aviation Organization airport code; ICAO aerodromski kodovi; بین الاقوامی شہری ہوا بازی تنظیم ایئرپورٹ کوڈ; ICAO oro uosto kodas; koda letališča ICAO; Kodigong pampaliparang ICAO; codi d'aeroports OACI; ICAO kodu; Kode bandar udara ICAO; Kodi ya ICAO; अन्तर्राष्ट्रिय नागरिक उड्डयन प्राधिकरण विमानस्थल कोड; ICAO-code; Код аэрапорта ІКАА; کد فرودگاهی ایکائو; 國際民航組織機場代碼; ICAO 공항 코드; ICAO-Code; ICAO lennujaamakood; κωδικός αεροδρομίου της ICAO; अन्तर्राष्ट्रिय नागरिक उड्डयन सङ्गठन विमानस्थल कोड; codice utilizzato per designare ogni aeroporto del mondo; বিশ্বজুড়ে বিমান চলাচলের সুবিধাগুলির জন্য চার-অক্ষরের কোড উপাধি; code de classement géographique à quatre lettres attribué à chaque aéroport dans le monde; Aireportuak izendatzeko lau karaktere alfanumerikoen kodea; Уникальный идентификатор аэропорта; four-letter code designating many airports around the world; vierstelliger Code zur Identifizierung von Flugplätzen; نوعی کد فرودگاهی; ICAO機場代碼・由4碼字母組成; štirimestna koda za identifikacijo letališča; 世界中の空港を一意に識別できる4文字のコード; czteroliterowy kod oznaczający wiele lotnisk na całym świecie; чотирилітерний унікальний індивідуальний ідентифікатор, що привласнюється аеропортам світу; cod de clasificare geografică din patru litere atribuit fiecărui aeroport din lume; Código de designación de aeropuertos compuesto de cuatro caracteres alfanuméricos; lentoasemille ja muille lentopaikoille annettava nelikirjaiminen tunnus; four-letter code designating many airports around the world; kvarlitera flughavena kodo asignita de ICAO; repülőterek négy betűs azonosítója; உலக வானூர்தி நிலையங்களின் நான்கெழுத்து அடையாளம்; Indicatore di località ICAO; Codice ICAO; Indicatori di località ICAO; Codice aeroportuale ICAO; Liste des codes OACI; Code ICAO; Liste des codes OACI des aéroports; ICAO lennujaama kood; NAZE kodea; ICAO kodea; OACI kodea; códigu OACI; códigos OACI; Код ИКАО; आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाह्तुक संघटन विमानतळ कोड; आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक संघटन विमानतळ कोड; ICAO-Code; Código ICAO; International Civil Aviation Organization airport code; ICAO机场代码; ICAO代碼; 国际民航组织机场代码; ICAO機場代碼; ICAO airport code; ICAO codes; ICAO-codes; Internationale Luchthaven Leon M'ba; cod ICAO; referenčna koda letališča; koda ICAO; oznaka letališča ICAO; Código ICAO; Código OACI; código de aeropuertos de ICAO; código de aeropuertos OACI; código de aeropuertos ICAO; código aeroportuario OACI; código aeroportuario ICAO; código de aeropuerto OACI; código de aeropuerto ICAO; codigo de aeropuertos de OACI; Codigo ICAO; Codigo OACI; codigo de aeropuertos de ICAO; codigo de aeropuertos OACI; codigo de aeropuertos ICAO; codigo aeroportuario OACI; codigo aeroportuario ICAO; codigo de aeropuerto OACI; codigo de aeropuerto ICAO; код ІКАО; код ICAO; International Civil Aviation Organization airport code; International Civil Aviation Organization airport code; ICAO flyplasskode; Kode bandar udara ICAO; International Civil Aviation Organization airport code; کد ایکائو; فرودگاه ون فریت ملن; مکان‌یاب ICAO; مکان‌یاب ایکائو; کد فرودگاهی ICAO; International Civil Aviation Organization airport code; Codi ICAO; Codi OACI; ICAO-lentoasemakoodi; ICAO-lentokenttäkoodi; ICAO-lentopaikkatunnus; ICAO-lentoasematunnus; ICAO-lentokenttätunnus; International Civil Aviation Organization airport code; ICAO location indicator; رمز إيكاو; ICAO kód letiště; ICAO kodları; ICAO havaalanı kodu; ICAO location indicators; ICAO meydan kodu
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक संघटन विमानतळ संकेत 
four-letter code designating many airports around the world
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • location identifier
  • airport identification code
उपवर्ग
  • code
भाग
  • ICAO region prefix
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतूक संघटन विमानतळ संकेत तथा आयकाओ हा जगातील विमानतळांची ओळख पटवणारा चार अक्षरी-आकडी संकेत आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संघटना (आयसीएओ) द्वारे परिभाषित केलेले आणि आयसीएओ दस्तऐवज ७९१०: लोकेशन इंडिकेटर्स मध्ये त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होणारे हे संकेत विमान वाहतूक नियंत्रण आणि विमान उड्डाण नियोजन यांसाठी वापरले जातात.

या संकेतांचा वापर विमानतळांव्यतिरिक्त इतर विमानचालन सुविधा ओळखण्यासाठी देखील केला जातो; जसे की हवामान केंद्रे, आंतरराष्ट्रीय विमान सेवा केंद्रे किंवा प्रादेशिक नियंत्रण केंद्रे, इ.

इतिहास

[संपादन]

आयसीएओ विमानतळ संकेतांच्या शिफारसी २४ मार्च १९५९ रोजी स्वीकारण्यात आल्या आणि त्याच वर्षी १ ऑक्टोबर रोजी त्या अंमलात आल्या.[]

आयसीएओ संकेत विरुद्ध आयएटीए संकेत

[संपादन]

आयसीएओ संकेत हे तीन-अक्षरी आयएटीए संकेतांपासून वेगळे असतात. आयएटीए संकेतांचा वापर सामान्यतः विमान वेळापत्रक, आरक्षण आणि बॅगेज टॅगसाठी केला जातो. उदाहरणार्थ, लंडनच्या हिथ्रो विमानतळाचा आयएटीए संकेत LHR आहे आणि त्याचा आयसीएओ संकेत EGLL आहे.

सहसा आयएटीए संकेत हे विमानतळाच्या किंवा शहराच्या नावावरून घेतले जातात, तर आयसीएओ संकेतांचे वितरण प्रदेश आणि देशानुसार केले जाते. आयएटीए संकेतांच्या तुलनेत आयसीएओ संकेत अधिक विमानतळांना (व्यापक अर्थाने) दिलेले असतात; तसेच आयएटीए संकेत कधीकधी रेल्वे स्थानकांनाही दिले जातात. आयसीएओ संकेतांची निवड करण्याचे अधिकार अंशतः प्रत्येक देशातील प्राधिकरणांना सोपवलेले असतात, तर आयएटीए संकेतांना कोणतीही भौगोलिक रचना नसल्यामुळे त्यांचा निर्णय मध्यवर्ती स्तरावर आयएटीए द्वारेच घेतला जातो.

संकेत

[संपादन]

आयसीएओ संकेतातील पहिली एक किंवा दोन अक्षरे देश किंवा देशाचा मोठा प्रदेश दर्शवतात; उर्वरित अक्षरे विमानतळ ओळखण्यासाठी असतात, उदा., लंडनच्या हिथ्रो आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आयसीएओ संकेत EGLL आहे, ज्यातील EG हे तो विमानतळ युनायटेड किंगडममध्ये असल्याचे दर्शवते. याउलट, आयएटीए संकेतांतून भौगोलिक संदर्भाची माहिती मिळत नाही. उदाहरणार्थ, याच विमातळाचा आयएटीए संकेत LHR आहे, परंतु LHV हा युनायटेड स्टेट्समधील पेंसिल्व्हेनिया राज्यातील लॉक हेवन येथील विल्यम टी. पायपर मेमोरियल विमानतळ आहे. तरी सारखे दिसणारे संकेत असले तरी त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो.

राजकीय किंवा प्रशासकीय कारणांमुळे आयसीएओ संकेतांच्या प्रादेशिक संरचनेत काही अपवाद आहेत:

फॉकलंड बेटांवरील आरएएफ माउंट प्लेझंट या विमानतळाला EGYP हा संकेत देण्यात आला आहे. यावरून हा विमानतळ युनायटेड किंग्डममध्ये असल्यासारखे वाटते, परंतु जवळच असलेल्या नागरी पोर्ट स्टॅनले विमानतळाला SFAL हा संकेत दिला आहे, जो दक्षिण अमेरिकेच्या संकेतांशी सुसंगत आहे.

सेंट पिएर आणि मिकलॉन हे फ्रांसच्या नियंत्रणाखाली असल्याने तेथील विमानतळांना युरोपप्रमाणेच LFxx हे संकेत दिले आहेत.

कोसोवोला BKxx हा संकेत देण्यात आला आहे. ज्यामुळे तो त्याच्या भौगोलिक शेजाऱ्यांच्या (Lxxx) ऐवजी ग्रीनलँड आणि आइसलँडसोबत गटात येतो.

जेरुसलेम आंतरराष्ट्रीय विमानतळाला LLJR (इस्रायल) आणि OJJR (जॉर्डन) असे दोन्ही संकेत दिले गेले होते. कालांतराने हा विमानतळ बंदच पडला.

२०२६ मध्ये सुरू होणाऱ्या वेस्टर्न सिडनी विमानतळाचा आयसीएओ संकेत YSWS हा आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुसरे अक्षर सहसा विमानतळाच्या फ्लाईट इन्फॉर्मेशन रिजनशी संबंधित असते.

कॅनडा आणि अमेरिकेच्या मुख्य भूभागातील अनेक विमानतळांचे आयसीएओ संकेत हे त्यांच्या तीन-अक्षरी आयएटीए संकेतांच्या पुढे फक्त भौगोलिक उपसर्ग लावून तयार केले आहेत (उदा. YEG आणि CYEG हे दोन्ही एडमंटन आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आहेत, तर IAD आणि KIAD हे वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आहेत). हे साम्य अलास्का (PAxx), हवाई (PHxx) किंवा अमेरिकेच्या इतर प्रदेशांना लागू होत नाही. उदाहरणार्थ, माउइ येथील काहुलुई विमानतळाचा आयएटीए संकेत OGG आहे तर आयसीएओ संकेत PHOG आहे.

आयसीएओ विमानतळ संकेत I, J, X, किंवा Q या अक्षरांनी सुरू होत नाहीत. तथापि, मंगळावरील जेझेरो क्रेटरला JZRO हा विशेष आयसीएओ संकेत देण्यात आला आहे. यावरून काहींनी असा निष्कर्ष काढला की 'J' हे मंगळासाठीचे अक्षर असावे. आयसीएओने अधिकृतपणे तसे जाहीर केलेले नाही.[] 'I' अक्षराने सुरू होणारे संकेत (Ixx आणि Ixxx) अनेकदा रेडियो बीकन्स[मराठी शब्द सुचवा]सारख्या दिशादर्शन साधनांसाठी वापरले जातात, तर क्यू कोड आंतरराष्ट्रीय रेडियो दळणवळणासाठी राखीव आहे.

रशियामध्ये, 'X' हे लॅटिन अक्षर किंवा त्याचे सिरिलिक प्रतिरूप 'Ь' हे सरकारी, लष्करी आणि प्रायोगिक विमानतळांसाठी वापरले जाते. हे संकेत आयसीएओ संकेतांसारखेच असले तरी ते केवळ देशांतर्गत वापरासाठी आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जात नाहीत.[] ZZZZ हा एक आभासी संकेत आहे. हा संकेत आयसीएओ संकेत नसलेल्या विमानतळांसाठी फ्लाईट प्लॅनमध्ये वापरला जातो.

आयसीएओ संकेत वेळोवेळी अद्ययावत केले जातात. उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील विमानतळ पूर्वी जॅन स्मट्स आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जात असे तेव्हा त्याचा संकेत FAJS होता. जेव्हा त्याचे नाव बदलून ओ.आर. टॅम्बो आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले, तेव्हा त्याचा आयसीएओ संकेत FAOR असा अद्ययावत करण्यात आला.

काही विमानतळांना दोन आयसीएओ संकेत असतात, विशेषतः जेव्हा तो विमानतळ नागरी आणि लष्करी दोन्ही कारणांसाठी वापरला जातो. जर्मनीतील फ्रँकफर्ट विमानतळाला EDDF हा संकेत आहे, तर तेथील ऱ्हाईन-मेन वायुसेना तळाला बंद होईपर्यंत EDAF हा संकेत होता. बेल्जियममधील ब्रसेल्स विमानतळाचा नागरी भाग EBBR आहे, तर मेल्सब्रोक वायुसेना तळाला EBMB हा संकेत आहे. हे दोन्ही विमानतळ एकाच धावपट्टीचा आणि नियंत्रण यंत्रणेचा वापर करतात.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Foreword". Annex 15: Aeronautical Information Services (PDF) (इंग्रजी भाषेत) (16 ed.). Montreal: International Civil Aviation Organization. July 2018. p. x. ISBN 9789292584481. 19 April 2024 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 16 November 2024 रोजी पाहिले.
  2. "NASA's Ingenuity Mars Helicopter Succeeds in Historic First Flight". NASA. April 19, 2021. May 16, 2024 रोजी पाहिले.
  3. Index of four-character airfield codes in Russia