आंतरराष्ट्रीय मराठी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


आंतरराष्ट्रीय मराठी भाषा[संपादन]

"आंतरराष्ट्रीय मराठी भाषा" मराठी हि इंग्लिश ,फ्रेंच,मॅनडारीन चायनीज प्रमाणे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय भाषा आहे . मुंबई या भारतीय गणराज्यातील प्रमुख व्यापारी केन्द्र असलेल्या शहराची अधिकृत आणि प्रमुख भाषा आहे जी महाराष्ट्र, गोवा, दिव दमन आणि दादरा नगर हवेलीत अधिकृत भाषा आहे . कराचीत ‘नारायण जगन्नाथ विद्यालय’ ही मराठी माध्यमाची शाळा २०१०-११ या वर्षीही सुरू आहे.

मराठीतून विषय समजावून देणारे खाजगी वर्ग इंग्लंड-अमेरिकेत २००८ पासून सुरू झाले आहेत.
मॉस्को नभोवाणी हे आकाशवाणी केंद्र गेली ५० वर्षांहून अधिक काळ रशियात सुरू आहे.
मॉस्को, सिडनी, दुबईसह ४४ मराठी आकाशवाणी केंद्रे भारताबाहेर आहेत. 

गेल्या काही वर्षात अमेरिकेसह अनेक देशात प्रत्येक आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी जाणणारा एकतरी अधिकारी असतो. थालिपीठ, पोळी पुरणपोळी, कांदेपोहे हे मराठमोळे पदार्थ परदेशातही काही उपाहारगृहात मिळू लागले आहेत. जर्मनीच्या हायडेलबर्ग विद्यापीठात मराठी विभाग आहे.

मॉरिशसच्या एका महाविद्यालयातील होमराजन गौरिया हे मराठी विभागाचे प्राध्यापक दरवर्षी पुण्यातील मराठी परिषदेला पंढरीच्या वारीप्रमाणे येतात. 

नोकरी-धंद्यानिमित्त १२५ देशात मराठी लोक राहतात. दररोज शेकडो जहाजांतून हजारो परदेशी खलाशी मुंबईला येतात. त्यापैकी अनेकजण मोडकी-तोडकी मराठी बोलायचा प्रयत्न करतात, प्रयत्नाने मराठी शिकतात. संगणक महाजाळ्यातून लाखो परदेशी लोक मराठी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आपण जसे महाराष्ट्रात फ्रेंच-जर्मन-रशियन शिकतो, तसे इतर देशांत स्वतःहून मराठी शिकणारे अनेक लोक आहेत. परदेशात सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर वगैरे मराठी लोक प्रसिद्ध आहेतच. दोन मराठी व्यक्ती मात्र जगात खूप प्रसिद्ध आहेत, त्या आहेत संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरू तुकाराम! पुण्यातील श्री गोखले याच्या मन्मन समूहाची उपकरणे हृदयशस्त्रक्रियेसाठी जगातील ५० हून अधिक देशात आवर्जून वापरली जातात. महाराष्ट्रातील शेतमाल जगभर जातो. कोकणचा हापूस तर महाराष्ट्राचा झेंडा जगभर मिरवतो आहेच(आपण उगाचच त्याच्या पेटीवर आल्फन्सो लिहितो, हापूस लिहिले तर त्याची चव कमी होणार नाही.) जागतिकीकरण करावे असा हेतू मनात न धरता परदेशी व मराठी लोकांकडून कळत-नकळत मराठी मुलुखाचे व भाषेचे जागतिकीकरण झाले त्याची ही थोडीशी उदाहरणे !