आँखे (१९९३ चित्रपट)
1993 film by David Dhawan | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
आँखे हा १९९३ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे जो डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि अनीस बझ्मी यांनी लिहिलेला आहे. यात गोविंदा, चंकी पांडे, रागेश्वरी, रितू शिवपुरी, शिल्पा शिरोडकर, कादर खान, सदाशिव अमरापूरकर, शक्ती कपूर आणि राज बब्बर यांच्या भूमिका आहेत. गोविंदा, कादर खान आणि राज बब्बर हे दुहेरी भूमिकेत आहेत.
हा १९९३ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता.[१]तेलुगुमध्ये पोकिरी राजा (१९९५) या नावाने त्याचा रिमेक करण्यात आला.
हा चित्रपट १९७७ च्या कन्नड चित्रपट किट्टू पुट्टू [२] पासून प्रेरित असल्याचे वृत्त आहे. हा चित्रपट १९६७ च्या तमिळ चित्रपट अनुबावी राजा अनुबावी वरून देखिल प्रेरित होता. या चित्रपटाचा हिंदीमध्ये १९७३ मध्ये दो फूल या नावाने पुनर्निर्मिती करण्यात आली होती. हे १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या चंगू मंगू या मराठी चित्रपटावरून देखील रूपांतरित केले आहे.
३९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला ४ नामांकने मिळाली - सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (धवन), सर्वोत्कृष्ट अभिनेता (गोविंदा) आणि सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (खान).
संगीत
[संपादन]चित्रपटातील गीत इंदीवर यांनी लिहिले होते. गोविंदासाठी कुमार सानू यांनी आणि पांडेसाठी मोहम्मद अझीझ आणि सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.
| गाणे | गायक |
|---|---|
| "ओ लाल दुपट्टे वाली" | कुमार सानू, सुदेश भोसले, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक |
| "एक तमन्ना जीवन की" | कुमार सानू, आशा भोसले |
| "अंगना में बाबा" | कुमार सानू, साधना सरगम |
| "चौखट पे तुम्हारी हम" | कुमार सानू, मोहम्मद अजीज, सपना मुखर्जी |
| "बडे काम का बंदर" | कुमार सानू, मोहम्मद अझीझ, अरुण बक्षी |
पुरस्कार
[संपादन]- फिल्मफेर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार - पहलाज निहलानी (नामांकन)
- फिल्मफेर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार - डेव्हिड धवन (नामांकन)
- फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार - गोविंदा (नामांकन)
- फिल्मफेर सर्वोत्तम विनोदी भूमिकेतील पुरस्कार - कादर खान (नामांकन)
संदर्भ
[संपादन]- ↑ "Box Office 1993". Box Office India. रोजी मूळ पानापासून संग्रहित15 January 2013. 25 December 2016 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ↑ "रीडिफ.कॉम: David Dhawan's blue-eyed boys" Check
|url=value (सहाय्य). www.रीडिफ.कॉम.[permanent dead link]