अ फील्ड ऑफ वन्स ओन (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

'अ फिल्ड ऑफ वन्स ओन'[१] हे बीना अगरवाल लिखित पुस्तक केंब्रिज युनिव्हरसिटी प्रेस, न्यू यॉर्क यांनी १९९८ मध्ये प्रकाशित केले आहे. प्रस्तुत पुस्तकामध्ये बीना अगरवाल यांनी दक्षिण आशिया खंडातील स्त्रियांच्या जमिनीवरील हक्काविषयक मांडणी केलेली आहे.

प्रस्तावना[संपादन]

स्त्रियांच्या सक्षमीकरणाकरिता स्त्रियांची जमिनीवर असणारी मालकी आणि नियंत्रण हे महत्त्वाचे साधन आहे हा मुद्दा संपूर्ण पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत पुस्तकामधून जमिनीवरील हक्काविषयक असणारे कायदे आणि त्यांची अंमलबजावणी यांमधील दरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर स्त्रियांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवण्यात येणाऱ्या अडचणींवर भर देण्यात आला आहे. जसे की, पुरुष नातेवाईकांकडून होणारा विरोध, पुरुषकेंद्री आणि प्रशासकीय, कायदेशीर तसेच सार्वजनिक निर्णय मंडळातील पुरुषांचे वर्चस्व.

ठळक मुद्दे[संपादन]

बीना अगरवाल यांच्या मते, स्त्रियांना जमिनीवरील मालकी हक्क किंवा संपत्तीतील समान हक्क यांविषयक कायदे अस्तित्वात आले परंतू त्यांच्या अंमलबजावणीमध्ये लिंगभाव असमानता दिसून येते जसे की, १. पुरुषांपेक्षा कमी हिस्सा, २. स्त्रियांच्या कायदेशीर मालकी हक्कांवर विशिष्ट मर्यादा, ३. स्त्रियांवर वारसाहक्काने मिळालेल्या गोष्टींच्या वापरावर मर्यादा, ४. शेतजमिनीविषयक विशिष्ट लिंगभावी कल. तिसऱ्या प्रकरणामध्ये परंपरागत हक्क आणि व्यवहार यांविषयक मांडणी केलेली आहे. व्यवहारांचा लिंगभाव संबंधावर कशाप्रकारे परिणाम होतो आणि त्याचाच परिणाम संरचनात्मक दर्जावर होतो यावर भाष्य केलेले आहे लेखिकेने स्त्रियांच्या संपत्तीतील हक्क आणि विवाहविषयक रूढी यांच्यातील संबंध दर्शविला आहे. त्यांच्या मते जमिनीवर नातेसंबंधांचे नेहमीच प्रभुत्व असते. नंतरच्या प्रकरणांमध्ये कायदा आणि व्यवहार यांतील दरी समजून घेण्यासाठी अगरवाल यांनी आशिया खंडातील वेगवेळ्या देशांमधील प्रदेशांची तुलना केली आहे. प्रस्तुत पुस्तकातून कायदेशीर किंवा संपत्तीवरील हक्कांमध्ये स्त्रीयांविरोधी होणारी लिंगभावाधारित विषमता दाखवून देण्याचा प्रयत्न तर केलाच आहे. त्याचबरोबर स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये ही या प्रश्नावर ठोस सैद्धांतिक मांडणी करण्यावर येणाऱ्या मर्यादा ही दाखवून दिल्या आहेत.[२]

प्रतिसाद किंवा योगदान[संपादन]

अमर्त्य सेन यांच्या मते डॉ. अगरवाल यांनी प्रस्तुत पुस्तकामध्ये वारसा हक्कामध्ये होणाऱ्या असमानतेवर लक्ष वेधले आहे. जे त्यांनी या विषयासंदर्भात सखोल अभ्यास केलेला आहे. त्यातून आपल्याला दक्षिण आशिया आणि जगातील इतर महिला वंचित राहण्यामागील कारणीभूत घटक अधिक समजण्यास मदत होते.[१] एस. एस. शिवकुमार यांच्या मते, प्रस्तुत पुस्तक फक्त अकादमिक चर्चांवर भर देत नाही तर स्त्रियांच्या जमीनहक्काविषयकचा प्रश्न केंद्रस्थानी आणणे गरजेचे आहे हे धोरणकर्त्यांना पटवून देते.[३]

महत्त्वाच्या संकल्पना[संपादन]

लिंगभावाधारित विषमता, स्त्रीवादी सिद्धांकन

संदर्भ सूची[संपादन]

  1. a b Agarwal, Bina (1994). A Field of One's Own: Gender and Land Rights in South Asia (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9780521429269.
  2. ^ "Bringing Land Rights Centre-Stage". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 31 (9). 2015-06-05.
  3. ^ Sivakumar, S. S. (1996). "Review of A Field of One's Own". Sociological Bulletin. 45 (1): 97–101.