अ.पां. देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: विश्वकोशीय अनूल्लेखता

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


डाॅ. अनंत पांडुरंग देशपांडे हे मराठीत प्रामुख्याने विज्ञानविषयक पुस्तके व लेख लिहिणारे लेखक आहेत. २०१८मध्ये ते मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह झाले.

अ.पां. देशपांडे हे मुळात इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअर. त्यांनी पुणे आणि मुंबई येथे चार कारखान्यांत मिळून ३५ वर्षे नोकरी केली. देशपांडे हे इ.स. १९७४पासून 'मराठी विज्ञान परिषदे'च्या मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह आहेत. परिषदेच्या सर्व प्रकारच्या वाढीत त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांनी 'नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्स' ही संस्था १९९७ साली स्थापन केली. ते त्‍या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते 'मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया'च्या घाटकोपर शाखेचे वीस वर्षांपासूनचे अध्यक्ष आहेत.

पुस्तके (लेखन व संपादन)[संपादन]

 • विज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर (चरित्र, सहलेखक - डाॅ. श्रीराम मनोहर)
 • अभियांत्रिकीचे जग (संपादित)
 • आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण (अनेक खंड, प्रत्येक खंडाचे अनेक भाग). : खंड ३ (विज्ञान तंत्रज्ञान आणि शि्षण), भाग १ - शिल्पकार चरित्रकोश (संपादित, सहसंपादक डाॅ बाळ फोंडके)
 • उपयोजित विज्ञान (संपादित)
 • कॅनडा (प्रवास वर्णन)
 • काडेपेटी आणि इतर विज्ञान खेळणी (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
 • घरगुती वापरातील १३० औषधी वनस्पती (माहितीपर)
 • टाकाऊतून शिकाऊ (अनुवादित, मूळ लेखक - अरविंद गुप्ता)
 • द्रव्यगुण विज्ञान, भाग १, २ (मराठी, इंग्रजी, सहलेखक - डाॅ. सुभाष रानडे, वैद्य रवी रा.जवळगेकर))
 • परिसर आणि स्वावलंबन (माहितीपर)
 • मराठी विज्ञान परिषद नाबाद ५१ (माहितीपर)
 • विज्ञानयात्री - डॉ. माधव गाडगीळ (चरित्र, व्यक्तिचित्रण)
 • विज्ञानयात्री - डॉ. माधव चितळे (चरित्र, व्यक्तिचित्रण)
 • मूलभूत विज्ञान (संपादित)
 • यंत्रमानव (संपादित कथासंग्रह, सहसंपादक - सुबोध जावडेकर)
 • डॉ. रघुनाथ माशेलकर : भारतीय बौद्धिक संपदेचा उद्गाता (चरित्र, व्यक्तिचित्रण)
 • विज्ञानयात्री - डॉ. वसंत गोवारीकर (चरित्र, व्यक्तिचित्रण)
 • विद्वज्जन
 • विज्ञान व तंत्रज्ञानविषयक प्रगती
 • विज्ञानिनी भाग १, २; (संपादित, या संग्रहात एक लेख डाॅ. मेघश्री दळवी यांचा आहे.
 • शंभर वनस्पती शास्त्रज्ञ (संपादित)
 • शेतीतज्ज्ञ - डॉ. आ. भै. जोशी (चरित्र)
 • स्वरयज्ञ - सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची पन्नास वर्षे (संपादित)

अ.पां देशपांडे यांनी लिहिलेल्या काही लेखांचे मथळे[संपादन]

 • ज्येष्ठराज जोशी – जगातील शंभर उत्कृष्ट संशोधकांतील एक
 • भालचंद्र उदगावकर समाजभान असणारा वैज्ञानिक