Jump to content

ॲव्होकाडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅव्होकाडो या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅव्होकॅडो
अ‍ॅव्होकॅडो फळ व झाडाची पाने, री-युनियन बेट
अ‍ॅव्होकॅडो फळ व झाडाची पाने, री-युनियन बेट

शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Angiosperms
जात: Magnoliids
वर्ग: Lauraceae
कुळ: Persea
जातकुळी: P. americana
L.

अ‍ॅव्होकॅडो (इंग्रजी: Avocado, अ‍ॅलिगेटर प्रअर, बटर फ्रूट, सोल्जर्स बटर; लॅटिन - पर्सिया अमेरिकाना; कुल - लॉरेसी). हे मूळचे मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील झाड आहे. अ‍ॅव्होकॅडोला आंब्यासारखेच एक बी असलेले मोठे फळ येते. भारतात कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवे, महाराष्ट्र (पुणे, खडकी, फलटण) इत्यादी ठिकाणी अ‍ॅव्होकॅडोची लागवड केली जाते.

अ‍ॅव्होकॅडो भारतामध्ये पहिल्यांदा १९४१ साली श्रीलंकेमधून आणून पुणे येथील गणेशखिंड फळ-बाग केंद्रात लावण्यात आले. हे फळझाड वर्षात ७५ ते १९० सेंमी. पावसाच्या समशीतोष्ण भागात व चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत जोमाने वाढते. अ‍ॅव्होकॅडोची लागवड ही रोपे किंवा कलमे एकामेकांपासून साडे सात ते नऊ मीटर अंतरावर लावून करतात. फळे येऊन ती तयार होण्यासाठी ऊनवाऱ्यापासून संरक्षण आणि पाणी व हवामानातील आर्द्रता यांची जरुरी असते. झाड ७ ते १० वर्षांचे होईपर्यंत त्याच्या जमिनीस टेकणाऱ्या फांद्या छाटून त्याला आकार देतात. राखलेल्या फांद्यांचे शेंडे कापत नाहीत; कापल्यास फळे लागत नाहीत.

अ‍ॅव्होकॅडोला फुले आल्यापासून सुमारे ५ महिन्यांनी फळे तयार होतात. तयार फळांतल्या गरात चरबीचे प्रमाण काही जातींत ७ ते १० आणि काहींत १५ ते २० टक्के असते. पुणे येथील अंजिरी (जांभळट) रंगाच्या फळातील गरात १७ टक्के तेल असते आणि अ, ब, क ही जीवनसत्त्वे व एक ते चार टक्के प्रथिने असतात.


संदर्भ[संपादन]