अॅनी नन्नली
अॅनी नन्नली - (जन्म १८ डिसेंबर १९३६ - मृत्यू २६ एप्रिल २०१७) [१] - या 'ईस्ट-वेस्ट कल्चरल सेंटर, लॉसएंजेलिस'च्या अध्यक्षा होत्या. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या अमेरिकन अनुयायी होत्या.[२]
जीवन व कार्य
[संपादन]अॅनी यांचे वास्तव्य मिसिसिपीतील हॅटीसबर्ग येथे होते. आई पियानो वादक असल्यामुळे अॅनी अगदी लहानवयातच संगीताकडे वळल्या. त्यांनी सदर्न मिसिसिपी विद्यापीठातून संगीतात पदवी प्राप्त केली आणि मॅनहॅटन स्कूल ऑफ म्युझिक आणि हंटर कॉलेज ऑपेरा विभागात शिक्षण घेतले होते.[१]
न्यू यॉर्क शहरात आल्यावर त्यांची संगीतातील कारकीर्द बहरली. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी "साउंड ऑफ म्युझिक" च्या पहिल्या ब्रॉडवे प्रॉडक्शनमध्ये एका ननची भूमिका केली होती आणि फ्लोरेन्स हेंडरसनसोबत राष्ट्रीय टूरिंग कंपनीतही त्या सहभागी झाल्या होत्या.त्या न्यू यॉर्क शहर, वुडस्टॉक आणि लॉस एंजेलिस येथे संगीत शिकवत असत.[२]
१९६८ मध्ये अॅनी, पती नारद (रिचर्ड एगनबर्गर) यांच्यासोबत पाँडिचेरीला श्रीमाताजींच्या दर्शनासाठी गेल्या. पुढील चार वर्षे त्यांनी भारतात व्यतीत केली आणि त्यानंतर अमेरिकेत राहून श्रीअरविंद आश्रम आणि ऑरोविलची सेवा केली.
अॅनी यांनी लॉसएंजेलिसमधील ईस्ट वेस्ट कल्चरल सेंटर (EWCC) च्या संस्थापक ज्योतिप्रिया (डॉ. ज्युडिथ टायबर्ग) तसेच न्यू यॉर्क येथे मातागिरी श्री अरबिंदो सेंटरची स्थापना करणारे सॅम स्पॅनियर आणि एरिक ह्यूजेस यांच्या समवेत कार्य केले होते. अॅनी यांनी मॅनहॅटनमधील श्री अरबिंदो इंटरनॅशनल सेंटरच्या कामकाजात देखील हातभार लावला होता. संस्थापक एलेनोर मॉन्टगोमेरी यांच्या निधनानंतर अॅनीने फाउंडेशन फॉर वर्ल्ड एज्युकेशनच्या पहिल्या बोर्ड सदस्य म्हणूनही काम केले.[३] या संस्थेमध्ये १९९९ पर्यंत सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली.[१]
१९९९ मध्ये, अॅनी या श्रीमाताजींच्या अनुयायांच्या मुलाखती घेण्यासाठी आश्रमात परत आल्या. आणि त्यातूनच द गोल्डन पाथ नावाचा बारा मुलाखतींचा संग्रह तयार झाला.
प्रकाशित लेखन
[संपादन]द गोल्डन पाथ (२००५) - श्रीमाताजींच्या शिष्यांच्या मुलाखती. - मुलाखतकार - अॅनी नन्नली [१][४]
पूरक
[संपादन]- होमेज टू अॅनी नन्नली - लेखक - नारद (रिचर्ड एगनबर्गर) [५]
- रिमेम्बरिंग द मदर - लेखिका - अॅनी नन्नली [६]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d auromaa (2017-05-01). "On The Golden Path - In Memoriam of Anie Nunnally". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.
- ^ a b "Anie Nunnally: In Memoriam by Julian Lines – Overman Foundation" (इंग्रजी भाषेत). 2017-05-12. 2025-03-09 रोजी पाहिले.
- ^ "Anie Nunnally". Foundation for World Education (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.
- ^ Visitor, Website (2018-06-24). "The Golden Path: Interviews with Disciples of Sri Aurobindo and The Mother from the Sri Aurobindo Ashram and Auroville". Auro e-Books (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.
- ^ "Homage to Anie by Narad (Richard Eggenberger)". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.
- ^ auromaa (2017-05-01). ""Remembering The Mother" by Anie Nunnally". AuroMaa (इंग्रजी भाषेत). 2025-03-10 रोजी पाहिले.