अॅन अनसर्टन ग्लोरी : इंडिया अॅन्ड इट्स कॉन्ट्रॅडिक्शन (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ॲन अनसर्टन ग्लोरी : इंडिया ॲन्ड इट्स कॉनट्रॅडिक्शन[१] हे डिन ड्रेज आणि अमर्त्य सेन लिखित पुस्तक लंडनच्या पेग्विन प्रकाशनाने २०१३ साली प्रकाशित केले आहे.

नागरिकांच्या विशेषतः गरीब लोकांकडे आणि स्त्रियांकडे लक्ष न दिल्यामुळे भारतामध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्यधे सुधारणा व्हावी यासाठी लोकांना विकासात सहभागी करून घेण्याशिवाय दुसरा उपाय नाही. शालेय शिक्षण, वैद्यकीय सुविधा या सारख्या सेवा/सुविधाआणि शुद्ध पाणी, वीज, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक स्वछता अश्या सोयी पुरवण्यातही कमतरता आहे.

प्रस्तावना[संपादन]

विकास हा कसा एकप्रकारचा अनिश्चित गौरव असला तरी त्याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे.असे असले तरी भारतासारख्या देशासंधर्भात विश्लेषणात्मक मांडणी करताना लेखकांनी विकासाच्या बाबतीतील विसंगतीचा अभ्यासपूर्ण आढावा यात मांडला आहे. दोन दशकांच्या वसाहतवादी राजवटीनंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. आणि लगेचच भारताने लोकशाही राजकीय व्यवस्था अंगीकृत केली. या व्यवस्थेत विचार स्वातंत्र्य, अनेकपक्ष पद्धती आणि पुरेपूर राजकीय स्वातंत्र्याचा समावेश होता. ब्रिटिश काळातील दुष्काळ अदृश्य झाले. "राज" पद्धतीतील आर्थिक साचलेपण जाऊन त्याची जागा आर्थिक प्रगतीने घेतली. गेल्या तीन दशकात आर्थिक व्यवस्था गतिमान झाली, आणि अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी बनली. नुकत्याच बसलेल्या एका जागतिक आर्थिक धक्क्यानंतरही भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील वेगवान अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेचा हा वेग राखणे आणि तो पर्यावरणदृष्ट्या अबाधित राहणे हे भारतासमोरील महत्त्वाचे आणि गाठता येऊ शकणारे ध्येय आहे. प्रस्तुत पुस्तकात अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ यांनी भारतातील समस्यांचा ऊहापोह केला आहे.


'प्रस्तुत पुस्तकात[संपादन]

१. अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ या भारतातील अर्थशास्त्रज्ञांनी भारतातील विकासाच्या संदर्भातील महत्त्वांच्या समस्यांचा ऊहापोह केला आहे.
२. सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवरील निराशाजनक कमतरतांविषयी केवळ सरकारचे धोरणात्मक बदल आवश्यक असे मत व्यक्त केले आहे.
3. नागरिकांच्या विशेषत: गरीब लोकांकडे आणि स्त्रियांकडे लक्ष न दिल्यामुळे भारतामध्ये या समस्या निर्माण झाल्या आहेत. लोकांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी लोकांना विकासात सहभागी करून घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले आहे. याशिवाय भारतात शालेय शिक्षण, वैद्यकीय सुविधा यांसारख्या सेवा/सुविधा आणि शुद्ध पाणी, वीज, मलनिस्सारण, वाहतूक व्यवस्था आणि सार्वजनिक स्वछता अश्या सोयी पुरवण्यातही कमतरता आहे.

आर्थिक समृद्धी आणि मानवी विकास या संदर्भात जपान, दक्षिण कोरिया आणि चीन इत्यादि देशांचा एक विशिष्ट दृष्टिकोन आहे. त्या दृष्टिकोनाकडे दुर्लक्ष करून, भारताने सामाजिक आणि भौतिक सुविधांकडे पाठ फिरवल्यामुळे मानवी क्षमतांचा न केलेला विकास हा आर्थिक प्रगतीवर परिणाम करू शकतो. सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवरील निराशाजनक कमतरतांविषयी केवळ सरकारने धोरणात्मक बदल करून चालणार नाही. तर जनतेलाही यासंबधी स्पष्ट जाणीव असली पाहिजे, तरच ते योग्य ठरेल. अलीकडे, योजना आयोगाने 2011-12 या मध्ये दारिद्र्‍य रेषेखालील भारत 1.2 अब्ज लोकसंख्येच्या एक पेक्षा कमी तिमाहीत झाली की अंदाज जाहीर केला. ???? मिलेनियम डेव्हलपमेंट गोल संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) पासून ताज्या अहवालात 1990 आणि 2010 दरम्यान, जगभरातील गरिबी कमी आर्थिक वाढ परिणाम केले गेले आहे हे लक्षात येते. ???? येथील विषमतेमुळे सुस्थित लोकांची आयुष्य आणि मुद्दे यावरच चर्चा घडताना दिसते. ड्रेझ आणि सेन हे विषमतेचे समर्पक विश्लेषण करून लोकशाही पद्धतीतून बदल घडवून आणणे कसे शक्य आहे, ते दाखवून देतात. तसेच वर्ग, जात, लिंग, इत्यादींमधील विषमतेकडे लक्ष केंद्रित करतात. या दोघांनी देशातील स्त्रियांच्या एकूणच स्थितीचा व त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेतला आहे.[२]

लेखक सदर पुस्तकात देखील विकासाच्या बाबतीतील मुद्दे आणि अहवालांबरोबरच "फॅशन, सात्विक (?), बॉलीवूड आणि क्रिकेट" वर अधिक लक्ष केंद्रित करून अंतर्गत मीडियाच्या आवर्ती संदर्भ देतात. ???? अपरिपूर्ण समाजातील उणीवा हा विकासातील एक स्थिर प्रवाह आहे, याकडेही जाणीवपूर्वक लक्ष वेधून ते चिकित्सक मांडणी करतात. सर्वसामान्यांना रोजगार मिळवा म्हणून आणि नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा यासाठी राष्ट्रीय ग्रामीण हमी कायदा किंवा योजना सर्वांच्याच विकासाचा कार्यक्रम राष्ट्राने केला असला तरी त्यामध्ये असणारे वैविध्य लेखकांनी चिकित्सक दृष्टीने अभ्यासले आहे. ह्या पुस्तकातील अनेक प्रकरणांमध्ये अगदी त्या तथाकथित अहवालांमध्ये दारिद्र्‍यरेषेवर जगणार्‍या. लोकांचे जीवनमान कसे सुधारले आहे व हे थोड्यापार प्रमाणात आनंद देऊन जाणारे आहे अशी समाधान करणारी आकडेवारी उदाहरणे देऊन सांगितली आहे. पण त्यामध्ये वादग्रस्त काय आहे आणि काय नाही आहे हे स्पष्टपणे आर्थिक उदारीकरणाच्या गुणविशेषतेकडे जाऊ शकते जे 1990 पासून एक स्थिर गरिबी कमी झाली नाही हे दाखवून देते. ???? लेखकांनी अलीकडच्या वर्षांत ऑन मैदान काय बदल झालेत आणि काय बदल झाले नाहीत हे विविध उदाहरणांसहित, काही वर्षांच्या दरम्यानचा फरक सांगून व काही घटकांकडे कसे दुर्लक्ष झाले ते खूप अभ्यासपूर्ण मांडले आहे. जगतिकीकरणानंतरची एकूणच सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक जगण्याच्या पद्धतींमध्ये सातत्याने बदल होताना दिसत असले तरी त्याचे असमान वाटप मात्र सातत्याने होत आहे. अभिजन वर्गातील जे थोड्याफार फरकाने एककेंद्री होते. त्यामध्ये आत्ता मात्र बदल होताना दिसतात. अभिजन वर्गातील स्तररचना यासाठी पाहणे आवश्यक आहे. व त्यानुसार विकासाकडे वेगळ्या दृष्टीने कसे पहिले पाहिजे याचे विश्लेषण सदर पुस्तकात केले आहे.[३]

महत्त्वाच्या संकल्पना[संपादन]

विरोधाभासी वास्तव, भौतिक व्यवस्था, न.रे.गा, वसाहतवाद

संधर्भ सूची[संपादन]

  1. ^ Dreze, Jean; Sen, Amartya (2013-07-04). An Uncertain Glory: India and its Contradictions (इंग्रजी भाषेत). Penguin Books Limited. ISBN 9781846147623.
  2. ^ Thottam, Jyoti (2013-09-06). "'An Uncertain Glory,' by Jean Drèze and Amartya Sen". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2018-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ Chandrasekaran, Gayatri (2013-07-25). "Book Review | An Uncertain Glory: India and its Contradictions". https://www.livemint.com/. 2018-03-23 रोजी पाहिले. External link in |work= (सहाय्य)