अॅन्ड्रॉइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अँड्रॉईड
Android robot 2014.svg
Android logo (2014).svg
Android Oreo 8.1 screenshot.png
अँड्रॉईड ८.१ "ओरिओ"
अँड्रॉईड (संचालन प्रणाली)
मूळ लेखक गूगल, ओपन हॅन्डसेट अलायन्स
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २१ ऑक्टोबर २००८[१]
सद्य आवृत्ती ८.१ (ओरिओ)
(५ डिसेंबर २०१७[२])
सद्य अस्थिर आवृत्ती अँड्रॉईड पी (Android P)
भाषा (प्रणालीलेखन) सी, सी++, जावा
स्रोत पद्धती मिश्र (मुक्तस्त्रोत आणि गुप्तस्त्रोत)
प्लॅटफॉर्म ३२ आणि ६४ बिट ए.आर.एम, x८६ आणि x८६-६४
भाषा इंग्लिश (प्रमुख), १००+ (भाषांतरीत)
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
परवाना अपाचे २.०, ग्नू जीपीएल २.० (लिनक्स गाभा आणि त्यामधील बदलांसाठी)
संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड.कॉम

अँड्रॉईड (इंग्लिश: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे.[१] ॲन्ड्रॉइडमध्ये जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे.[३] २१ ऑक्टोबर २००८ ला ॲन्ड्रॉइडची प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ॲन्ड्रॉइड ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. ॲन्ड्रॉइड आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने ॲन्ड्रॉइडचा ॲपलच्या आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ॲपल, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) ॲन्ड्रॉइडवर चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.

इ.स. २०१० च्या शेवटी ॲन्ड्रॉइड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून ॲन्ड्रॉइडचे ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.[४][५]

ॲन्ड्रॉइड मुक्त स्रोत असल्यामुळे ॲन्ड्रॉइडचा विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. ॲन्ड्रॉइड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ॲप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.

आवृत्त्या[संपादन]

गूगलतर्फे अधिकृतरित्या ग्राहकांसाठी वितरीत केलेल्या अथवा करणार असणाऱ्या अँड्रॉईड आवृत्त्यांची यादी.[६]

नाव आवृत्ती सद्यस्थिती
कपकेक १.५ कालबाह्य
डोनट १.६ कालबाह्य
इक्लेअर २.० ते २.१ कालबाह्य
फ्रोयो २.२ ते २.२.३ कालबाह्य
जिंजरब्रेड २.३ ते २.३.७ कालबाह्य
हनीकोंब ३.० ते ३.२.६ कालबाह्य
आइस्क्रीम सॅन्‍डविच ४.० ते ४.०.४ कालबाह्य
जेली बीन ४.१ ते ४.३.१ कालबाह्य
किटकॅट ४.४ ते ४.४.४ कालबाह्य
लॉलीपॉप ५.० ते ५.१.१ कालबाह्य
मार्शमॅलो ६.० ते ६.०.१ समर्थित
नोगट ७.० ते ७.१.२ समर्थित
ओरिओ ८.० ते ८.१ समर्थित
पी (P) ९.० ते - अंतर्गत विकास आवृत्ती

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ "Android is now Open Source" (इंग्रजी मजकूर). 
  2. "Android 8.1 has arrived – here's everything it brings" (इंग्रजी मजकूर). 
  3. "Google's Android parts ways with Java industry group" (इंग्रजी मजकूर). 
  4. Tarmo Virki and Sinead Carew. "Google topples Symbian from smartphones top spot". Reuters (इंग्रजी मजकूर). 1 February 2011 रोजी पाहिले. 
  5. "Google's Android becomes the world's leading smart phone platform (Canalys research release: r2011013)". Canalys (इंग्रजी मजकूर). 31 January 2011. 1 February 2011 रोजी पाहिले. 
  6. https://www.android.com/

बाह्य दुवे[संपादन]