अ‍ॅडम स्मिथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अॅडम स्मिथ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अ‍ॅडम स्मिथ

ॲडम स्मिथ (जन्म - १६ जून १७२३, मृत्यू - १७ जुलै १७९०) हे स्कॉटलंडचे एक तत्त्वज्ञ होते. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्यांनी रचल्याचे मानले जाते. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या गावी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्यांचे १७७६ साली प्रसिद्ध झालेले "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानले जाते.तसेच त्याच्या व्याखेवरील टीका सुद्धा आहे.औद्योगिक क्रांतीने निर्मिलेल्या भांडवलशाहीतील बाजारपेठेची सर्व समीकरणे या त्याने ग्रंथात मांडली .भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यस्थेचा त्याने पुरस्कार केला , आधीच्या व्यापारावाद्यांच्या विरोधात तो होता .

अर्थशास्त्राला पूर्वी राजकीय अर्थशास्त्र असे म्हटले जात होते ,त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा नव्हता तर अर्थशास्त्र हा विषय १८ व्या शतकापर्यंत राज्यशास्त्राचा एक भाग मानला जात होता परंतु सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ सन १७७६ मध्ये आपला अर्थशास्त्रावरील प्रसिद्ध ग्रंथ 'राष्ट्राची संपत्ती ' लिहून अर्थशास्त्राला राज्यशास्त्रापासून वेगळे केले .व तेव्हापासून अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय म्हणून  मान्यता पावला ,म्हणून अ‍ॅडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असे मानले जाते


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.