अॅझोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲझोलावरील मधमाशी
विज्ञान आश्रमातील ॲझोला प्रकल्प

ॲझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. ॲझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते फर्न[मराठी शब्द सुचवा] आहे. पशुपालनासाठी ॲझोला हे पिक महत्वाचे आहे. त्यासाठी ॲझोला उत्पादन घेणे आवश्यक ठरते.

दुधाळ जनावरांसाठी ॲझोला[संपादन]

ॲझोलाची किंमत सहसा चारा व इतर पदार्थांपेक्षा स्वस्त असते. जनावरांना सुलभतेने पचणारी उच्च प्रथिने आणि निम्न लीनिन कंटेंटयुक्त ॲझोला घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना देता येते; तसेच कोंबड्या, शेळ्या, मेंढया, डुकरे आणि ससे यांनाही देता येते. अत्यंत सोपे, अल्पखर्चिक व किफायतशीर असे ॲझोला उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनदेखील उपयुक्त ठरू शकते. दुधाळ जनावरांवर केलेल्या प्रयोगावरून हे सिद्ध झाले आहे कि, जेव्हा जनावरांना त्यांच्या रोजच्या खाद्यासोबत दीड ते दोन किलो ॲझोला दिला, तर दुधात दीड ते २ लिटर इतकी वाढ होते.[ संदर्भ हवा ] ॲझोला हे कोंबडीचेही खाद्यान्न आहे. जर बॉयलर कोंबडीला ॲझोला दिला, तर तिच्या अंडे देण्याच्या क्षमतेत वाढ होते.

ॲझोला काय आहे[संपादन]

ॲझोला हे जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते शैवाल आहे. निळे–हिरवे शैवाळ हे पाण्यात मुक्तपणे तरंगलेल्या अवस्थेत आढळते. नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो. पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्वे (अ आणि ब) असेच क्षारतत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ॲझोलामध्ये प्रथिनेचे प्रमाण २५ ते ३० टक्के, १०-१५ टक्के खनिज व ७-१२ टक्के प्रमाणात अमिनो आम्ल असतात. याचप्रमाणे ॲझोला मध्ये पिष्ठमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प आहे. ॲझोला हि वनस्पती गाय व म्हैस या व्यतिरिक्त शेळी, मेंढी, ससे, डुक्कर व कोंबडया यांनासुद्धा आपण खाऊ घालू शकतो. जनावरांचा प्रकार व त्याचे प्रतिजनावर प्रतिदिवस गाय व म्हैस (दीड ते दोन किलो) शेळी व मेंढी (३०० ते ४०० ग्रॅम) कोंबडी (२० ते ३० ग्रॅम)

ॲझोला गादी तयार करणे[संपादन]

ॲझोला गादी तयार करण्यासाठी ॲझोलाची एक जात, १ किलो शेण, ssp खत, मिनरल मिक्शर, इत्यादी. हे साहित्य आवश्यक आहे. तसेच फावडे, कुदळ, घमेलं, प्लास्टिक कागद, शेडनेट, बादली, इत्यादी साधनेही आवश्यक आहेत.

कृती

१) प्रथम ॲझोला गादी तयार करण्यासाठी जमिनीचे मोजमाप करून घेणे.

२) जिथे गादी तयार करायचा आहे तिथे आखणी करून घेणे.

३) ठरलेल्या मापानुसार गादी खोदुन घेणे. साधारण ठरलेले माप ७५×३×१ फूट असे खोदून घेणे.

(गादीचा आकार = ७५×३×१ फूट, मिनरल मिक्स्चर = ९० ग्रॅम, ssp खत = ९० ग्रॅम, शेण खत = ९ किलो, माती = ९ किलो) असे प्रमाण प्रती गादी वापरले.

४) गादी वर प्लास्टिक पेपर अंथरल्यानंतर त्यात माती चाळून पसरून घेणे.

५) त्यात शेणाचे पाणी ओतणे.

६) गादी पाण्याने भरून घेणे.

७) त्यामध्ये ssp खत मिक्स करून सोडणे.

८) तसेच मिनरल मिक्स्चरच्या पावडरचे पाणी करून ओतणे .

९) नंतर १ किलो ॲझोला धुवून पाण्यावर पसरवणे.

१०) ॲझोला एकावर एक येणार नाही याची दक्षता घेणे.

अनुमान[संपादन]

१) प्रती गादी दोन वेळा पाणी देवून आठवड्यात ॲझोला गादी पूर्ण भरते.

२) ॲझोला काढल्यास दोन-तीन दिवसात परत उगवतो.

निरीक्षण[संपादन]

१) ॲझोला सावलीत असताना पोपटी रंगाचा दिसतो व मोठा झाल्यावर हिरवा-करड्या रंगाचा दिसतो.

ॲझोलाचे फायदे[संपादन]

१) पशुखाद्याच्या खर्चात १५ ते २० टक्क्याची बचत

२) जनावरांत गुणवत्ता वृद्धी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते ,आरोग्य सुधारून आयुष्य वाढते .

३) ॲझोलाच्या वापरामुळे फॅट ,दुध व वजनात वाढ

४) पक्षी (बदक, इमू, लव्ही, आदि) खाद्यात मिश्रणस्वरुपात ॲझोलाचा वापर केल्यास मांसल कोंबडयांच्या वजनात वाढ

५) अंडी देण्याच्या प्रमाण वाढ, तसेच अंड्याच्या पृष्ठभाग चकचकीत होतो.

६) ॲझोलाच्या वाफ्यातून काढण्यात येणारे पाणी नत्रयुक्त व खजिनयुक्त असल्याने पिकांसाठी, झाडांसाठी वापरात येते.