Jump to content

असीस कौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Asees Kaur; আসিস কৌর; Asees Kaur; Asees Kaur; Asees Kaur; असीस कौर; Asees Kaur; Asees Kaur; اسیس کور; اسیس کور; اسیس کور; アシーズ・カウル; അസീസ് കൌർ; Asees Kaur; Asees Kaur; असीस कौर; ᱚᱥᱤᱥ ᱠᱳᱨ; ਅਸੀਸ ਕੌਰ; Asees Kaur; أسيس كور; అసీస్ కౌర్; Asees Kaur; بھارتی پنجاب کی مشہور پنجابی گلوکارہ; penyanyi asal India; ureueng meujangeun asai India; Indiaas zangeres; cantante india; Indian singer (born 1988); amhránaí Indiach; ভাৰতীয় কণ্ঠশিল্পী; Indian singer (born 1988); مغنية هندية; ভারতীয় গায়িকা; baaŋa ŋun nyɛ paɣa
असीस कौर 
Indian singer (born 1988)
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखसप्टेंबर २६, इ.स. १९८८
पानिपत
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २०१६
नागरिकत्व
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q24702405
एमबीए ओळखण: a688593b-6cf2-46bd-84a8-632240f71265
आय.एम.डी.बी. दुवा: nm6024741
विकिडाटावर माहिती संपादित करा

असीस कौर (जन्म २६ सप्टेंबर १९८८) ही एक भारतीय गायिका आहे. तिने इंडियन आयडॉल आणि आवाज पंजाब दी यासह विविध गायन रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. २०२१ मध्ये, तनिष्क बागचीसह शेरशाह चित्रपटामधील तिचे "रातां लंबियां" हे गाणे खूप हिट झाले. तिने अनेक पुरस्कार जिंकले आहेत ज्यात २ फिल्मफेर पुरस्कार आणि एक आयफा पुरस्कार यांचा यांचा समावेश आहे. २०२१ व २०२२ मध्ये तिने लागोपाठ फिल्मफेर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार जिंकला. ("हुई मलंग", मलंग चित्रपट आणि "रातां लंबियां", शेरशाह चित्रपट)

कौरला खूप लहान वयातच पार्श्वगायिका बनण्याची इच्छा होती. तिने वयाच्या ५ व्या वर्षी गुरबानी गायला सुरुवात केली. तिने तमंचे चित्रपटाच्या "दिलदारा (रिप्राइज)" या सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून, तिने केसरी मधील "वे माही", ड्राइव्ह मधील "मखना", सिंबा मधील "बंदेया रे बंदेया" आणि "तेरे बिन", लवयात्री मधील "अख लड जावे" आणि "चोघाडा" आणि कपूर अँड सन्स मधील "बोलना" यासह अनेक बॉलीवूड गाण्यांवर विविध संगीतकारांसोबत काम केले आहे.[][][]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

कौर ही हरियाणामधील पानिपतची आहे. २६ सप्टेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या तिने वयाच्या ५ व्या वर्षी गाणे सुरू केले. तिच्या वडिलांनीच तिला गुरबानी पठणासाठी प्रोत्साहित केले. तिने स्वतः गुरबानी शिकली आणि स्पर्धांमध्ये पहिल्याच प्रयत्नात प्रशंसा मिळवली. ती बाल विकास पब्लिक स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे आणि तिनेएसडी (पीजी) कॉलेज मधून एम.कॉम. पूर्ण केले आहे.

१८ जून २०२३ रोजी, तिने मुंबईतील एका गुरुद्वारात पंजाबी संगीतकार गोल्डी सोहेल सोबत लग्न केले.[][][]

पुरस्कार

[संपादन]
वर्ष पुरस्कार गाणे चित्रपट श्रेणी निकाल संदर्भ.
२०१६ मिर्ची म्युझिक पुरस्कार " बोलना " कपूर अँड सन्स वर्षातील आगामी महिला गायिका विजयी [] []
"रंग रजा" बेईमान प्रेम नामांकन
२०१९ झी सिने पुरस्कार "अखं लड जावे" लवयात्री सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक नामांकन
२०२० झी सिने पुरस्कार "चंदीगड में" गुड न्यूज सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक नामांकन
२०२१ ६६ वे फिल्मफेर पुरस्कार "हुई मलंग" मलंग सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका विजयी []
२०२२ आयफा पुरस्कार "रातां लांबियां" शेरशाह सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका विजयी [१०]
६७ वे फिल्मफेर पुरस्कार सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका विजयी

संदर्भ

[संपादन]
  1. "Asees Kaur: We hadn't originally planned to release any music right now". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 30 May 2020. 9 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-06 रोजी पाहिले.
  2. "Asees Kaur | Episode 7 | The Love Laugh Live Show with Mandira Bedi | Full Interview". timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 9 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-06 रोजी पाहिले.
  3. "Check Out New Hindi Hit Lyrical Song Music Video – 'Hasina Pagal Deewani' Sung By Mika Singh and Asees Kaur Featuring Kiara Advani And Aditya Seal | Hindi Video Songs – Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 24 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-11-06 रोजी पाहिले.
  4. "'Raatan Lambiyaan' singer Asees Kaur to marry Goldie Sohel in Mumbai on THIS date". Bollywood Hungama. 16 June 2023. 16 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 June 2023 रोजी पाहिले.
  5. "Raatan Lambiyaan singer Asees Kaur to tie the knot with Goldie Sohel on 17 June: 'Exciting times ahead'". Hindustan Times. 16 June 2023. 17 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 18 June 2023 रोजी पाहिले.
  6. ANI News [मृत दुवा]
  7. "MMA Mirchi Music Awards". MMAMirchiMusicAwards. 29 March 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  8. "MMA Mirchi Music Awards". MMAMirchiMusicAwards. 2 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 March 2018 रोजी पाहिले.
  9. "Winners of the 66th Vimal Elaichi Filmfare Awards 2021". Filmfare. 28 March 2021. 28 March 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 April 2021 रोजी पाहिले.
  10. "IIFA Awards 2022 complete list of winners: Vicky Kaushal, Kriti Sanon win top acting honours". DNA India (इंग्रजी भाषेत). 5 June 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-06-05 रोजी पाहिले.