असीमा चॅटर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

असीमा चॅटर्जी या भारतीय रसायनशास्त्रज्ञ होत. (जन्मः मृत्यु: नोव्हेंबर इ.स. २००६ )त्यांचे वडील डॉक्टर होते. कोलकाता युनिव्हर्सिटीतून असीमा चॅटर्जी यांनी इ.स. १९३८ साली सेंद्रीय रसायनशास्त्रात (ऑर्गनिक केमिस्ट्री) एम.एस्सी. ही पदवी घेतली होती. इ.स. १९४४ साली डॉ. पी. के. बोस यांच्या मार्गदर्शनाखाली डी.एस्सी. पदवी घेतली. भारतात कुठल्याही विद्यापीठात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिली स्त्री शास्त्रज्ञ होत. त्यांनी रसायनशास्त्राच्या औषधीविषयक, विश्लेषणात्मक व सेंद्रीय अशा तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे या विषयांवर चारशेहून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील बरेचसे लेखन पाठय़पुस्तकांत अंतर्भूत केले गेले आहेत. यांचे मुख्य कार्यक्षेत्र कोलकाता हेच राहिले.

जीवन[संपादन]

असीमा चॅटर्जी यांचे लग्न प्रख्यात फिजिकल केमिस्ट आणि बेंगॉल इंजिनिअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य वरदानंद चॅटर्जी यांच्याशी झाले होते. त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तसेच इतर ज्येष्ठ संशोधकांच्या प्रोत्साहनामुळेच हे कार्य करणे त्यांना शक्य झाले असे त्या मानत.

आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन[संपादन]

कारकीर्द[संपादन]

इ.स. १९५० साली भारतात परत येऊन असीमा चॅटर्जी यांनी भारतातील औषधी वनस्पती, विशेषत: त्यातील अल्कली व कुमारिन घटक यांच्या संदर्भात अभ्यास केला. कुमारिन हे रक्तातील गुठळीप्रतिबंधक द्रव्य आहे. हे हळदी मध्ये असते. इ.स. १९५४ साली त्या कोलकाता युनिव्हर्सिटीत प्रपाठक नेमल्या गेल्या. इ.स. १९६२ मध्ये त्यांना ‘खैरा- प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री’ हे अत्यंत मानाचे अध्यासनपद मिळाले. संपूर्ण भारतात विद्यापीठातले अध्यासन भूषविणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत.

विशेष योगदान[संपादन]

पेटंट[संपादन]

  • फेफरे, अपस्मार यांवर इलाज करणारे आयुर्वेदिक औषध ‘आयुष- ५६’ हे मार्सिली मिनाटा (इंग्रजी: Marsilie Minata) या वनस्पतीतून शोधले.
  • मलेरिया प्रतिबंधक औषध अल्स्टोनिया स्कोरिस (इंग्रजी: Alstonia Schoris),स्विर्शिया शिराता (इंग्रजी: Swrrtia Chirata), पिक्रॉप्मिझा कुरोआ(Picropmiza Kurroa) आणि सीसक्लिपिना क्रिस्टा (इंग्रजी: Ceasclpinna Crista) या वनस्पतींपासून शोधून काढले.

ही औषधे आजही विकली जात आहेत.

साहित्य संपादन[संपादन]

कोलकाता युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेले सहा खंडात्मक ‘भारतोद्भव वनौषधी’- ‘भारतात उगवणाऱ्या औषधी वनस्पती’ हे पुस्तक त्यांनी सुधारून संपादित केले. तसेच ट्रीटाइज ऑफ इंडियन मेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी : Treatise of Indian Medicinal Plants) या कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सहा खंडात्मक प्रकाशनाच्याही त्या प्रमुख संपादक होत्या.

पुरस्कार[संपादन]