असित सेन (अभिनेता)
Appearance
विनोदी अभिनेता व दिग्दर्शक | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | मे १३, इ.स. १९१७ गोरखपूर | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | सप्टेंबर १८, इ.स. १९९३ | ||||
| कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||||
| नागरिकत्व |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था | |||||
| व्यवसाय | |||||
| |||||
असित सेन (१३ मे १९१७ - १८ सप्टेंबर १९९३) हे हिंदी सिनेमांचे हास्य अभितेना होते.[१] त्यांनी ४० वर्षे बॉलीवूड चित्रपटात विनोदी पात्राचे काम करून आपली ओळख निर्माण केली व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले.[२]
जीवन
[संपादन]सेन यांचा जन्म १३ मे १९१७ साली उत्तर प्रदेश मधील गोरखपूर शहरात झाला. त्यांना छायाचित्रणाची आवड होती. त्यांनी गोरखपूर मध्ये ‘सेन फोटो स्टुडिओ' नावाचा व्यवसाय सुरू केला.
सेन यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात बांग्ला नाटकांमधून केली. इ.स. १९५० मध्ये ते कलकत्त्याला सासरी गेले होते. तिथेच त्यांना एका नाटक कंपनीत अभिनयाचे काम मिळाले. नाटक सुरू झाल्यावर फिल्म निर्देशक विमल रॉय हे त्यांच्या अभिनयावर प्रभावित झाले.व त्यांना मुंबई ला घेऊन गेले._
- प्रमुख चित्रपट
- १९६३ - चांद और सुरज
- १९६५ - भूत बंगला
- १९६७ -नौनिहाल
- १९६८ -ब्रम्हचारी
- १९६९ -यकीन और आराधना
- १९७० -पुरब और पश्चिम, दुश्मन, मझली दीदी, बुढा मिल गया.
- १९७१ -मेरा गाव मेरा देश, आंनद, दूर का राही, अमरप्रेम.
- १९७२ -बॉम्बे टू गोवा, बालिका वधु
- १९७६ -बजरंगबली
- १९७७ -आनंदआश्रम
सेन यांनी २०० पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये विनोद अभिनेत्याचे काम केले.